चेहर्यावर गंभीर आणि चिंतायुक्त भाव, अंगात सलवार कुर्ता, हातात पूजा केल्याचा धागा बांधलेला आणि ‘सा.विवेकच्या’ च्या कार्यालयामध्ये येऊन आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणारे पाकिस्तानचे हिंदू क्रिकेटर दानिश कनेरिया! पाकिस्तानकडून खेळताना ६१ कसोटींमध्ये २६१ बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणारे चौथे गोलंदाज. आणि आता मॅचफिक्सिंगच्या आरोपांमुळे दानिश कनेरिया संघाबाहेर गेले आहेत.

महेश पुराणिक, मुंबई, दि.४: कनेरिया यांना गोलंदाजी करताना भल्याभल्या फलंदाजांना आपल्या गुगलीने चित केले, पण आज नियतीने फिक्सिंंगची अशी काही गुगली टाकली की, त्यामुळे दानिश यांची संपूर्ण कारकीर्दच ’क्लीन बोल्ड’ झाली आहे. भारतात आईच्या इच्छेखातर केवळ धार्मिक स्थळांना भेटी देऊन पूजा करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. ’बीसीसीआय’ने माझ्या फिक्सिंगप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी नव्हे, तर नवनिर्वाचित अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. बाकी माध्यमांनी मसाला मिळावा म्हणून उठविलेल्या वावड्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दानिश कनेरियांशी संवाद साधताना त्यांच्यावर झालेल्या मॅचफिक्सिंगच्या आरोपांबाबत बोलणे आवश्यकच होते. याबाबत त्यांच्याशी बोलताना त्यांनी ‘पाकिस्तान ’क्रिकेट बोर्ड’ ‘इंग्लंड क्रिकेट’बोर्डाच्या दबावात असल्याने त्यांनी या प्रकरणात मला पाठिंबा दिला नाही. ‘पीसीबी‘ निर्णय घ्यायला समर्थ नाही. ‘बीसीसीआय’ किंवा ‘इसीबी’ जसा खेळाडूंना पाठिंबा देतात तसे ‘पीसीबी‘ देत नाही, असे ‘पीसीबी’च्या वर्तनावर त्यांनी सांगितले.

हिंदू असल्यामुळे तुमच्याशी भेदभाव झाला का, यावर दानिश म्हणाले, ‘‘ज्या वेळी माझ्यावर फिक्सिंगचा आरोप नव्हता त्या वेळी मला त्यांनी भरपूर मॅचेसमध्ये खेळवले, पण एकदिवसीय सामन्यापासून लांबच ठेवले. माझी फिल्डिंग चांगली नाही, असेही सांगितले, पण कोणत्या पाक खेळाडूची फिल्डिंग चांगली आहे? कोणाचीच नाही. शिवाय मी हिंदू, पाकसाठी खेळतोय, चांगल्या विकेट्स घेतोय, दोन्हीकडे चांगले खेळलो तर मी मोठा होईल, त्यामुळे मला नसेल खेळवले.’’
फिक्सिंगप्रकरणी आरोप झाल्यानंतर ‘पीसीबी’ने मदत केली का, असेे विचारल्यावर त्यांनी या वेळी भेदभाव केल्याचे कबूल केले. ‘पीसीबी’ने माझ्याबाबत हात वर केले आणि मोहम्मद आमीर, आसिफ, सलमान बट्ट यांच्या बाजूने मात्र पुरेपूर प्रयत्न केले. भेदभाव जो आहे तो इथे बोर्डाने माझ्याशी नक्कीच केला. मला कायदेशीर मदत देण्याऐवजी हा तुमचा पर्सनल मॅटर आहे, असे सांगितले. ज्या संघाची मी दहा वर्षे सेवा केली, त्यांनी माझ्या कठीण काळात मला वार्यावर सोडले. ‘पीसीबी’तील केवळ इंझमामउल हाक आणि रशीद लतीफ यांनी मला सहकार्य केले, पण त्यांच्यावर जी लोकं आहेत त्यांनी कसलेही सहकार्य केले नाही.’’

मोहम्मद आमीर, आसिफ आणि सलमान बट्ट या फिक्सिंगचा आरोप असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंविषयी ते म्हणाले, ‘‘या तिघांना स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या तिघांच्या रुममधून पैसे, व्हिडिओज आणि मेसेजेस मिळाले होते, त्यांचे अकाऊंट पकडले होते. पण माझ्या विरुद्ध त्यांना कोणताही पुरावा मिळाला नाही, कारण मी कशातही सहभागी नव्हतो. म्हणून मला पोलिसांनी ’एनएफए’ देऊन दोषमुक्तही केले होते. पण क्रिकेटरपैकी एकाने माझे नाव घेतल्याने केवळ ऐकीव माहितीच्या आधारे ‘ईसीबी’ने मी त्यात सहभागी असल्याचे जाहीर केले. या प्रकरणाच्या ’ओपन एन्डेड’ सुनावणीची मी केलेली मागणीही अमान्य केली. एवढेच नव्हे, तर मी निर्दोष असल्याचे माझ्या समर्थनार्थ पुरावेसुद्धा दिले. पण त्यांनी माझे न ऐकता स्वतःचेच म्हणणे पुढे रेटले.
मी फिक्सिंगमध्ये दोन हजार पौंडची लाच घेतल्याचे म्हटले जाते, पण जिथे माझा पगारच १५० हजार पौंड होता, तिथे मी दोन हजार पौंडांची लाच कशी घेईल? ज्या अनु भटचे नाव याच्याशी नेहमी जोडले जाते त्याच्याशी माझी ओळख ‘पीसीबी’नेच जमैकामध्ये करून दिली होती. पण ‘पीसीबी’चा भांडाफोड होईल, म्हणून ते मला जाणूनबुजून मदत करत नाहीत. ‘आयसीसी’ने दिलेले क्लेअरन्ससुद्धा माझ्याकडे आहेत. पण मी हिंदू असल्याने पीसीबीने माझ्या बाजूने पाठिंब्यासाठी काहीही केले नाही. ‘गोर्यांच्या फोडा आणि राज्य करा’ या नीतीप्रमाणे ‘ईसीबी’ने केले आणि ‘पीसीबी’नेही मला दूर लोटले.’’
तुमच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असे तुम्ही म्हणता, तरीही तुमच्यावर आजीवन बंदी आणि ज्यांनी फिक्सिंग केली त्यांच्यावर मात्र फक्त पाच वर्षांची बंदी, यावर तुम्हाला काय वाटते असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘ज्या लोकांनी फिक्सिंग केली त्यांच्यावर फक्त पाच वर्षांची बंदी घातली, पण मी काहीही केलेले नसताना माझ्यावर आजीवन बंदी घातली. हे चुकीचे आहे. मी याबाबत नंतर पाकिस्तानी पंतप्रधानांनाही पत्र लिहिले, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावरच ‘पीसीबी’च्या शहरयार खान यांनी तर टीव्हीवर सांगितले की, आमचे हात बांधलेले असल्याने आम्ही काही करू शकत नाही. पण हेे हात कोणी बांधलेत हेही त्यांनी सांगायला हवे होते. याचाही एकदाचा उलगडा झालाच पाहिजे.’’

हिंदू असल्याने पाकिस्तानी नागरिकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, हे विचारता कनेरिया यांनी पाकिस्तानी लोकांची मात्र भरपुर स्तुती केली. ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानच्या जनतेने माझ्याशी कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी मला भरपूर प्रेम, आदर, सन्मान दिला. आजही मला त्यांच्याकडून मी कुठेही गेल्यास नेहमी प्रेमच मिळते.’’
आता शशांक मनोहर ‘आयसीसी’चे अध्यक्ष झाले आहेत, त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार आहात का, असे विचारल्यावर कनेरिया यांनी होकार दिला. तसेच ‘बीसीसीआय’ म्हणजे क्रिकेट’ आणि ‘क्रिकेट म्हणजे बीसीसीआय’ असेही मिश्किल हास्य करत म्हणाले.

पाकिस्तानमधून अनेक हिंदू भारतात स्थलांतर करत आहेत, तुमचाही असाच विचार आहे काय, या प्रश्नावर मात्र कनेरिया यांनी सध्यातरी तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच लहानपणापासून माझी पाकिस्तानकडून खेळण्याची जिद्द होती. आज मी जो काही आहे तो केवळ पाकिस्तानमुळे पाकिस्तामुळेच पैसा, प्रसिद्धी, आदर, मिळाला, त्यामुळे मी पाकिस्तान सोडणार नाही,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment