Sunday, 7 June 2015

याचा राष्ट्रासाठी काय फायदा..?


एम आय एम च्या ओवेसीने म्हणे कै. बाळासाहेबांच्या आणि गोपीनाथ रावांच्या स्मारकाला विरोध केलाय... हे म्हणजे असे झाले ज्यांची महाराष्ट्रात रहायची लायकी नाही त्यानी महाराष्ट्रीय उत्तुंग व्यक्तिमत्वावर बोलण्यासारखे झाले...
या एम आय एम वाल्याना एक प्रश्न-
या स्मारकाच्या ऐवजी मशीद राहिली असती तर विरोध करण्याची ताकद दाखवली असती का..?
की शेपुट घालुन पळाले असते..?
आणि ती आमच्या सारख्या हिंदू नागरिकांच्या करांच्या मुळे गोळा होणाऱ्या पैशातून अनुदान घेऊन हज यात्रा करणे, हे कसे काय चालते बुवा..? म्हणजे याचा राष्ट्रासाठी काय फायदा..?
सरकारी खर्चाने मारे टेर्या उडवत हज यात्रा करता, ते सरकारी अनुदान नको म्हणून मोर्चा, आंदोलने करा ना...
पुन्हा आमच्या हिंदू नागरिकांच्या करांच्या रूपाने गोळा होणाऱ्या पैशातून तुमचे ते  दहशतवादी कारखाने (मदरसे) आम्ही पोसतो, ते बंद करण्यासाठी वट वट  करा की...
आम्ही कै. बाळासाहेबांचे स्मारक बांधु नाहीतर गोपीनाथ रावांचे बांधु, तुम्हाला काय करायचे त्याचे..?
त्या तिकडे हैदराबादेत निजामाच्या वंशजांचे जे काही थडगे असतील आणि इथेही महाराष्ट्रात मोगलांची जी काही थडगी असतील ती उखडून फेकून टाकण्याची गरज आहे, त्यासाठी प्रयत्न करावे खुशाल एम आय एम वाल्यांनी... आणि ती जागा सरकार जमा करावी म्हणजे त्याचा लोककल्याणासाठी उपयोग करता येईल...

कै. गोपीनाथजी मुंडे आणि कै. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने हॉस्पिटल सुरु करायला हवे... आणि त्या शेजारीच स्मारक उभारायला हवे, ज्यातून भावी पिढीला देशप्रेमाची आणि जनसेवेची प्रेरणा मिळेल... कारण स्मारकांची जशी दुरवस्था होते तशी हॉस्पिटलची होत नाही... आणि हॉस्पिटलमुळे जनता जनार्दनाची सेवा होईल, जनतेच्या मना मनातही स्मारक उभे राहील... आणि ते दगडी स्मारकापेक्षा नक्कीच सुंदर असेल...

Saturday, 16 May 2015

त्यांना मुळापासून उखडून फेकायलाच हवे...!


इस्लामच्या नावाखाली जिहादची आरोळी देणाऱ्या जागतिक मुस्लिम संघटनांनी अमानुषतेचा कळस गाठला आहे. या तथाकथित शांतातावाद्यांनी रक्त मांसाचा सडा पाडला नाही असा एकही दिवस गेल्या काही वर्षात उजाडला नाही आणि उजाडतही नाही. निष्पाप, निरपराध, निरागस जीवांच्या रक्ताचा सडा पाडणे हा कसला धर्म, कसला जिहाद, कसली शांतता, हि कसली शिकवण.?

खरे म्हणजे हा तर अधर्मच म्हणायला हवा. पाकिस्तान, सिरीया, लिबिया, इराण, इराक आणि अजूनही कितीतरी देशात इस्लामी मुलतत्ववादी इतरांचे जीवन संपवण्याचा अमानुष, रानटी नंगानाच करत आहेत. हा संघर्ष मुस्लिम देशात मुस्लिम विरुद्ध मुस्लिम असाच मोठ्या प्रमाणत सुरु आहे, आणि जोडीला तेथील इतर धर्मियांना देखील निर्दयपणे ठार केले जात आहे. शिया आणि सुन्नी हा संघर्ष शेकडो वर्षापासून सुरु आहे. इस्लामी मुलतत्ववादी सुन्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या मुस्लिमाला मुस्लिम मानतच नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते सर्व काफिरच समजले जातात. आणि त्यांच्या मतानुसार काफिरांना मूळ इस्लाम कबुल केल्याशिवाय जगण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणून त्यांची राजरोस कत्तल करण्याचे एकमेव उद्दिष्ट या संघटनांनी आपल्या समोर ठेवले आहे.

'इसीस',  ‘जुन्दुल्लाह’ सारख्या इस्लामी कट्टरता वादी संघटना धर्माच्या नावावर अधर्मच करत आहेत. अत्यंत निर्दयीपणे डोक्यात गोळ्या घालून , महिलांना निर्दयपणे हालहाल करून, लहान मुलांना कापून, तुकडे करून, या संघटना त्याचे व्हिडीओ इंटरनेटवरून प्रसारित करण्याचे अमानवी चाळे करत आहेत.
इस्लाम जातपात मानत नाही, जातीभेद मानत नाही. इस्लाम हाच जगातील एकमेव सर्वसमावेशक धर्म आहे, असे डांगोरे इस्लामी अभ्यासक, इस्लामचे तत्त्ववेत्ते आणि मुल्लामौलवी नेहमीच पिटत असतात. हिंदूंची धर्मांतरे घडवण्यासाठीही अशा थापा मारल्या जातात. या सर्व थापाड्यांचे इस्लामी देशातील सुन्नी मुस्लिमा व्यतिरिक्त इतरांचे हत्याकांड यावर काय म्हणणे आहे, हेदेखील आता जगासमोर यायला हवे.

हिंदू धर्म जातीपातींमध्ये विखुरला गेला आहे, वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे नुकसान झाले हे खरेच, पण हिंदू धर्मातील जाती-पाती कधी अशा एकमेकांच्या रक्ताला चटावल्या नाहीत. एकमेकांच्या छाताडावर बसून आपल्याच धर्मबांधवांचे रक्त पिण्याचे क्रौर्य हिंदू धर्मात तरी कधी झालेले नाही. हिंदू धर्मातील जातीभेदावर बोट ठेवून धर्मांतरे घडवणार्‍या मुल्ला मौलवींनी आधी आपल्या बुडाखाली काय जळते आहे ते पाहावे.

मुळात शिया आणि सुन्नी हा संघर्षही काही नवीन नाही. (आता सुन्नी विरुद्ध इतर सर्व काफिर, त्यात हिंदू देखील आलेच) मोहंमद पैगंबरांच्या मृत्यूपासूनच हा रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष उद्या जगासाठी डोकेदुखी ठरू शकतो. भारतात देखील यांच्या पिलावळी आपले हातपाय पसरवण्यासाठी आतुर झालेल्या आहेत. भारतात देखील या धर्मांधांना असेच हत्याकांड करण्याची इच्छा आहे. अधून मधून त्यांचे हस्तक आपले विखारी दुर्विचार उधृत करून भारत अशांती माजवण्याचा प्रयत्न करतच असतात. या इस्लामी कट्टरता वाद्यांचा धोका वेळीच ओळखून दोन्ही पंथांतील धर्मांधांना नेस्तनाबूत करण्यासाठी जगभरातील देशांनी, भारतातील मुस्लिम संघटना तसेच राजकीय नेत्यांनी देखील पुढे येण्याची आवश्यकता आहे. वाढता इस्लामी दहशतवाद रोखण्यासाठी संयुक्त व्यूहरचना आखायला हवी. अन्यथा हा रक्तपात जगभर पसरेल.

केवळ मुस्लिम धर्मीय म्हणजे अल्पसंख्याक आणि त्यांच्या विरुद्ध बोलायचे नाही, अथवा शेपूट घालून बसायचे हे भारतीय राजकारण्यांनी टाळले पाहिजे. जे इस्लामी देशात सुरु आहे त्याचे लोण भारतातही पसरू शकते. हे संकट ओळखून कट्टरतावादी जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध आताच उपाय योजना करायला सुरुवात केली पाहिजे. या मानवी रूपातील अमानवांकडे मानवाधिकाराच्या  दृष्टीने पाहून देखील काही उपयोग नाहीच, कारण ते जर मानव असते तर त्यांनी इतर मानवांना संपवण्याचा प्रकार कधी केलाच नसत, ते अमानुष आहेत आणि त्यांच्याशी तसेच वागले तरच जगात मानवी समाजाचे अस्तित्व टिकेल, त्यांना (कट्टरता वादी) मुळापासून उखडून फेकायलाच हवे...!

<< संदर्भ -  सामना, अग्रलेख, १६/०५/२०१५ >>

Friday, 15 May 2015

मराठ्यांनो स्वतःच्या स्त्रियांचा अपमान करू घेऊ नका...!

" कुणबीण : मराठेशाहीतील स्त्री-गुलाम "

' कुणबी ' हा शब्द व्यवसायवाचक आहे . म्हणजे शेती करणारा तो कुणबी . पण हा शब्द जातीवाचकहि आहे . म्हणजे महाराष्ट्रात ' कुणबी ' नावाची जात आहे . उदा. मराठा कुणबी , कोकणी कुणबी , खानदेशी कुणबी , गुजराथी कुणबी वगैरे . या कुणब्याची बायको म्हणजे कुणबीण असा सरळ अर्थ होऊ शकतो . पण मराठेशाहीच्या कागदपत्रांत ' कुणबीण ' हा शब्द या अर्थाने येत नाही . तो ' स्त्री-गुलाम ' या अर्थाने येतो . या ' कुणबिणी ' चा कुणबी जातीच्या स्त्रियांशी काही संबंध नाही , हे ध्यानात घेतले पाहिजे .

जगाच्या पाठीवरील जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृतीत ' गुलामगिरी अथवा दास्यत्व ' याची पद्धत आढळते . मध्ययुगातही ती मोठ्या प्रमाणावर चालू राहिली . आधुनिक काळखंडात स्वत:ला सुसंस्कृत समजणार्या युरोपियनांनी आफ्रिका खंडातील लाखो , करोडो , निग्रोंना श्वापदांप्रमाणे पकडून त्यांचा अमेरिकेत व्यापार केल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे . हिंदुस्थानात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुलामांचा व्यापार होत नव्हता , हे खरे . पण गुलामगिरीची पद्धती राजरोसपणे ब्रिटीशांची सत्ता स्थिर होईपर्यंत चालू होती , हेही तितकेच खरे .
महाराष्ट्रापुरते सांगायचे झाल्यास पुरुष गुलामांपेक्षा स्त्री गुलामांची संख्या मोठी होती ; किबहुना स्त्री गुलामांची खरेदी-विक्री झाल्याच्या नोंदी जशा मराठी कागदपत्रांत अनेक मिळतात , तशा पुरुष गुलामांच्या मिळत नाहीत . पुरुष गुलामांना ' पोरगे ' असे म्हणत आणि त्यांचा जन्म स्त्रीगुलामांच्या म्हणजे कुणबिणींच्या पोटीच झालेला असे . अशा पोरग्यांच्या नोंदी मात्र मिळतात . असे पोरगे आपल्या आईबरोबर विकले जात आणि ते मात्र गुलाम समजले जात . पण त्यांची पुढची पिढी मात्र गुलाम समजली जात नसे . कुणबिणींचा व्यापार करणारे चारण , हेडे हे लोक असत . ते कुणबिणी जशा विकावयास आणत , तशा प्रकारे गुलाम विकावयास आणल्याच्या नोंदी मिळत नाहीत .

मराठी कागदपत्रांत कुणबीण , बटीक ह्या दोन्ही संज्ञा समान अर्थानेच वापरलेल्या दिसून येतात .
( मराठेशाहीचे अंतरंग - डॉ जयसिंगराव पवार )

कुटुंबातील दासी व्यभिचारिणी झाली की तीला बटिक अथवा कुणबीण म्हणत. पेशवाईच्या काळात राजे-रजवाडे, सरदार, श्रीमंत पुरुष आपल्या पदरी कुणबीणी अथवा बटकी बाळगत. पुर्वी दुष्काळ पडला म्हणजे माणसे हलाखीने आपली मुलेबाळे विकत. प्रत्येक सुखवस्तु माणसाकडे कुणबीण ही असायचीच, अशी प्रथा होती. परदेशी लोक भारतात आल्यावर त्यांनीही बटीक बाळगल्या आहेत. म्यलेटने ६५ रुपयांना एक कुणबीण खरेदी केली होती असा उल्लेख आहे. बटकी किंवा कुणबिणी राजेरजवाड्यांना व सरदारांना नजराना म्हणुनही दिल्या जात. हेडे-चारण ई. लोकांचा बटकी विकायचा व्यवसाय असे. (संदर्भ: भारतीय संस्कृती कोश, खंड दुसरा, पान ४५) येथेही कुणबिण कोणत्या एखाद्या विशिष्ट जातीची असे असा उल्लेख नाही.

"शेतकऱ्यांच्या बायका पुरूषांच्या बरोबरीने कामे करीत. मध्यम वर्गातील काही जातीच्या किंवा घराण्यातील स्त्रियांना अर्थार्जनासाठी बाहेर पडता येत नसे. देवांगना, गणिक  वगैरे वर्ग समाजात होते. तमाशातही भाग घेत. वाघ्या-मुरळी सर्व महाराष्ट्रात आढळत. कुणबिणी बाळगण्याची चाल महाराष्ट्रात होती."
संदर्भ : मराठी विश्वकोश, http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=1&limitstart=

"राज्यांतील अठरा मोठीं खातीं. यांच्या वर्गीकरणाचे तीन प्रकार आहेत, ते असे ( मोलस्वर्थ व  क्यांडी यांच्या कोशाप्रमाणें. ) : ( १ ) उष्टर; खबुतर; जनान; जवाहीर; जामदार; जिकीर; तालीम; तोफ; थट्टी; दप्तर; दारू; दिवान; नगार; पील; फरास; वंदी; मोदी; शिकार-असे अठरा खाने. ( २ ) तोप-पील; उष्टर; फरास; शिकार; रथ; जामदार; जवाहीर; जिराईत; नगार; दारू; वैद्य; लकड; इमारती; मुदबख; कुणबिणी; खाजगत; थट्टी येणेंप्रमाणे- ( ३ ) खजिना दफ्तर; जामदार; पील; जिराईत; अंबर; फरास; मुदबख; नगार; सरबत; आवदार; शिकार; तालीम; दारू, उष्टर; बकरे; तोप; तराफ.
(संदर्भ: केतकर ज्ञानकोश. http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1520-2012-10-22-07-21-32

अदिकल – अंबलवासी जातिसमूहापैकीं एक वर्ग-हे मूळचे ब्राह्मण आहेत असें म्हणतात; परंतु भद्रकालीच्या देवळामध्यें उपाध्यायाचें काम केल्याकारणानें व मांस आणि दारू यांचे नैवेद्य दाखविले म्हणून ते भ्रष्ट झाले. ते यज्ञोपवीत धारण करितात, क्षुद्र देवतांच्या देवळांमध्ये उपाध्यायाचें काम करतात, व दुसरीं देवळांतलीं कामें करतात. लग्न आणि वारसा या बाबतींत ते मक्कत्तयम नियमांप्रमाणें वागतात. ते वृद्धि व सुतक दहा दिवस पाळतात. दहा गायत्रीमंत्र जपतात; त्यांच्याच जातीचे लोक त्यांची भिक्षुकी करितात. त्यांच्या बायकांस आदियम्मा असें म्हणतात. नम्बुद्रि बायकांसारिखे दागिने या वापरतात पण बाहेर जातांना त्यांच्यासारखी ताडाची छत्री घेत नाहींत व त्यांचेप्रमाणें नायर कुणबीण बरोबर नेत नाहींत. [ Castes and Tribes of S. India. Census Report – Travancore (I9II) ]
http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1592-2012-10-23-05-13-48

 "ह्याशिवाय गुलामांचाही एक वर्ग होता. अनैतिक गुन्हे केलेल्या किंवा बेवारशी स्त्रिया, मुले, पुरूष इत्यादींना गुलाम समजत. पैकी स्त्रीला कुणबीन म्हणत. ती चांगल्या आचरणाने गुलामीतून मुक्त होई. शिवशाहीत व पेशवाईत २ ते २५ रूपयापर्यत कुणबीण विकत मिळे. त्या वेळी हिंदुस्थानात गुलामांची चाल होती.
संदर्भ : http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=&start=18

संत कान्होपात्राला बेदरच्या बादशहाने आपली ’कुणबीन" बनवायचा प्रयत्न केला होता. तो फसला. कान्होपात्रा कुणबी जातीची नव्हती.
संदर्भ: http://medievalsaint.blogspot.in/2014/03/saint-kanhopatra.html

वरील बाब पाहता कुणबिणी/बटीक ही एक संस्था होती, त्यात विशिष्ट जातीच्याच स्त्रीया असत असे कोठेही दिसत नाही. वेश्या आणि कुणबिणीतील पहरक हा कि कुणबीण ही विकत घेतलेली स्त्री असायची. आपत्तीमुळे स्वत:हुन विकणे, विकले जाणे, पळवुन नेवुन विकणे असे प्रकार होत होते. कुणबिणी विकत घेणारे ऐपत असणारे सर्वच समाजघटक होते. एकाच विशिष्ठ जातीचे लोक कुणबिणी बाळगत  असेही दिसत नाही. किंबहुना कुणबिणी बाळगणे ही तत्कालीन प्रतिष्ठेची बाब होती. शिवकालातही कुणबिणींच्या विक्र्या होत असेही दिसते. किंबहुना ही संस्था जगभरची आहे.

आता प्रश्न हा पडतो कि कुणबीण हा शब्द आला कोठुण? "कुणबी" या कृषीवलघटकाशी हा स्त्रीवाचक शब्द आल्याने कुणब्याच्या बायका-पोरीच कुणबिणी बनत असत असा अवमानकारक अर्थ निघणे व संताप येणे स्वाभाविक आहे. पण खरेच तसे आहे काय हे कुणबिण या शब्दाबाबत दिल्या गेलेल्या माहितींत कुणबिणी या कुणब्याच्या बायका असत असा निर्देश कोठेही नाही.

* गुलाम अथवा कुणबिणी कशा केल्या जात ?

रियासतकार सरदेसाई यांनी संपादित केलेल्या पेशवे दप्तराच्या आठव्या खंडात प्रस्तुत विषयावर एक अत्यंत महत्वाचा कागद प्रसिद्ध केला आहे . १८ व्या शतकात अनेक राज्ये हिदुस्थानात , विशेषत: दक्षिणेत , उदयास आली . त्यांच्यात एकसारख्या लढाया , लष्करी मोहिमा , मुलखाची लुटालुट होत असे . धारवाडचा कागद सांगतो की -
" लढाईत कोणी पुरुषास धरीत नाहीत व गावगना लुटीचे समईहि कोणी पुरुषास धरीत नाहीत . गावगना लुटीचे समई बायकास अगर मुलीस मात्र धरून आणितात . परंतु सलुकाने देत नाहीत . बायका व मुली लुटून आणिल्या त्या कुणबिणी होतात . त्यास देशी आल्यावर विकतात . पुरुष कोणी सलुखाने बोलीकरिता देतात अथवा मातबर पाहून बोली धरून आणितात . हे काही गुलामसारखे नव्हेत . बोलीच्या खंडाचा यैवज आल्यावर सोडतात " .
 ( पेशवे दप्तर , खंड ८ , पृ.३२ )

यावरून स्पष्ट होते कि परचक्राच्या वेळी गावेच्या गावे लुटली जात , त्यावेळी स्त्रियांना व मुलींना पकडून त्यांना गुलाम म्हणून विकले जाई . पुरुषांना खंडणीच्या लोभाने पकडले जाई . खंडणी भरली कि त्यांची सुटका होई .
याशिवाय एखाद्या स्त्रीवर बदकर्म केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास तिला सरकारमार्फत ' कुणबीण ' केले जाई . धारवाडचा कागद म्हणतो -
" शुद्र वगैरे नीच जातीची स्त्री छिनाल्यास सापडली असता , तिच्या भ्रतारास आगर तिजला दंड द्यावयास सामर्थ्य नसल्यास , विशेष प्रसिधीच्या ग्रहस्ताची नसल्यास , क्वचित कोठे येखादा मक्तेचा मामलदार कुणबीण करून कोठीत ठेऊन कोणास देत होता अथवा विकीत होता . यास शास्त्र नाही . जुलमाने कुणबीण करितात . शास्त्रांत कुणबीण करावी आसे नाही . काही दंड काही प्रायश्चित आसे आहे . त्यात दंडायैवजी कुणबीण करतात जुलमाने ."
( पेशवे दप्तर , खंड ८ , पृ.३२  )

त्याकाळी भयंकर दुष्काळ पडत . हजारो , लाखो माणसे अन्नाविना तडफडून मरत . अशा वेळी आईबाप आपली मुलेमुली विकत असत . अशी मुले मुली विकत घेणार्याच्या घरी गुलाम म्हणून राहत असत . अशा मुली मोठ्या झाल्या कि त्या कुणबिणी म्हणून घरीदारी काम करत .
 ( मराठेशाहीचे अंतरंग - डॉ . जयसिंगराव पवार )

* कुणबिणींचे दोन प्रकार : खासगी आणि सरकारी

समाजातील प्रतिष्ठीत लोक आपल्या घरकामासाठी बाजारातून एखादी गृहोपयोगी वस्तू आणावी , त्याप्रमाणे कुणबीण विकत आणत असत .

सरकारी कुणबिणी म्हणजे सरकारच्या मालकीच्या अथवा सरकारच्या ताब्यात असणार्या कुणबिणी .

* गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता ?

गोविंद पानसरे आपल्या ' शिवाजी कोण होता ? ' ह्या पुस्तकात Sarkar J.N . Shivaji and his times ,P.365 हा संदर्भ वापरून लिहितात -
" त्या काळात हिंदू व मुसलमान , राजेरजवाडे , इनामदार यांचा लढाईस जाताना जनानखाने , कुणबिणी व कलावंतिणी बरोबर नेण्याचा रिवाज होता . परमुलखातल्या स्त्रियांना बटकिणी बनवण्याचा अन भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता . त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता कि ,
" मोहिमेस जाताना कुणीही बटकिणी , कुणबिणी अगर कलावंतिणीस बरोबर घेऊ नये . कुणाही स्त्रीस बटकीण बनविता कामा नये . "
( गोविंद पानसरे - ' शिवाजी कोण होता ?' - तिसावे पुनर्मुद्रण २०१२ - पृ . १५ )

* डॉ . एस एन सेन यांनी १९२८ साली लिहिलेल्या The Military System of Marathas या ग्रंथात " ब्राउटन , Letters From a Maratha Camp , pp.-112-13 " हा संदर्भ वापरून पेशव्यांच्या लष्करी मोहिमे बद्दल सांगताना लिहितो -
" खाजगी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्याबरोबर त्यांच्या बायका आणि कुणबी , तसेच नर्तिका , जादुगार , वेश्या असत . "

सध्या काही समाजद्रोही मंडळी मराठा समाजाच्या स्त्रिया म्हणजेच कुणबिणी असा अर्थ घेऊन मराठा स्त्रियांना कुणबिणी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यातून ते आपल्याच समाजातील स्त्रियांचा, आपल्या पूर्वजांचा  अपमान करत आहेत, बदनाम करत आहेत. तसेच महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यामुळे विरोध करत असून, बाबासाहेबांना मराठा विरोधक आणि ब्राह्मण वाद पूजक ठरवत आहेत.  तरी मराठा समाजाने स्वतःच स्वतःच्या स्त्रियांचा या समाजद्रोही मंडळींच्या नादाला लागून अपमान करून घेऊ नये, आणि आपण ९६ कुळी, क्षत्रिय कुलवंत आहोत याचे भान ठेवून आपल्या स्त्रियांचा आणि पूर्वजांचा सन्मान करावा हि अपेक्षा.

<< या लेखातील संशोधन आणि लेखन हे श्री. संजय सोनवणी आणि श्री. राहुल रांजणगावकर यांनी आपल्या ब्लोग वर केलेले आहे. अधिक माहितीसाठी वाचकांनी खालील ब्लोगला भेट द्यावी हि विनंती. त्यांच्या लिंक येथे देत आहे.>>

1. http://sanjaysonawani.blogspot.in/2015/05/blog-post_7.html
2. http://jewatelte.blogspot.in/2015/05/blog-post_8.html

Thursday, 14 May 2015

देशी गाय आणि आर्थिक संपन्नतेचा मार्ग...!


महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकतेच एक विधान केले, आणि त्यावर गदारोळ देखील झाला.
"राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखणे कठीणच" असे ते विधान होय.
राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करूनही शेतकरी आत्महत्या रोखण्यात कोणालाही यश आलेले दिसत नाहीये. आता महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून शेतकऱ्याला आणखी खड्ड्यात घातल्याचे देखील बोलले जात आहे. परंतु या आधी याविषयी लेख लिहून मी गोपालनातून आर्थिक उन्नतीचा मार्ग, असा लेख लिहून त्याविषयी माहिती देखील दिलेली आहे.
नुकतेच जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ब्लोग वर एक लेख वाचला, त्यात त्यांनी भारतीय गायींच्या पालनातून आर्थिक दृष्ट्या संपन्न झालेल्या अशोक इंगवले यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. लेख आवडला त्या दृष्टीने आणखी बातम्या आणि विडीओज गोळा करण्यासाठी नेट वर शोध घेतला, एक दोन बातम्या आणि एक विडिओ एवढेच हाती लागले.
याविषयी जवळ जवळ सर्व माध्यमात बातमी येण्याची अपेक्षा होती, मात्र माध्यमांनी ती फोल ठरवली.
सातारा जिल्ह्यात माण तालुका आहे, माण तालुक्यात बिदाल नावाचे गाव आहे, तेथील अशोक इंगवले यांच्या देशी गायीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीतून आर्थिक उन्नती व कोट्यावधी रुपये कमावण्याची ही कहाणी आहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि सरकारने अशा व्यक्तींच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कार्य करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाही.
अशोक इंगवले म्हणतात,
"शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी; पण सुरवात थोडी थोडी करावी. सेंद्रिय शेती करताना पहिल्यांदा देशी गायी घरासमोर बांधा आणि मगच सेंद्रिय शेतीला सुरवात करा. देशी गाय ही आरोग्याचे प्रतीक मानली जाते. सेंद्रिय शेती करताना शेणखताचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. ही शेती करताना तुम्ही शेतीला जास्तीत जास्त वेळ द्या. शरीराने आणि मनानेही या शेतीत रमा.. तुम्हाला निश्‍चितपणे याचा फायदा दिसून येईल. देशी गायीच्या सान्निध्यात राहिल्यास अनेक अनुकूल परिणाम दिसून येतील. शास्त्रज्ञांनीही हे मान्य केले आहे. देशी गाय पालनासाठी अत्यंत सोपी आहे. शेतकरी जसे या गायीचे व्यवस्थापन करतील तशी ही गाय राहते. यामुळे पालनपोषणाला ही गाय सहज सुलभ आहे. शेती चॅलेंज म्हणून स्वीकारा. काही कालावधीनंतर त्याचे अनुकूल परिणाम आपोआप दिसतील."
भारतीय गायीचे मोल ब्राझिलसारख्या दक्षीण अमेरिकन देशाला उमगले असून, त्याच्यासह अनेक पुढारलेले देश  भारतीय देशी गायीच्या पैदाशीच्या मागे धावत असल्याची माहिती अशोक पोटतिडकीने देतो.
कृषी पदवीधर असलेल्या अशोकने नोकरीच्या मागे न लागता स्वतःची शेती करण्याचा निर्णय घेतला, सुरुवातीला आधुनिक पद्धतीने शेती केली मात्र त्यातून तोटाच तोटा झाल्याने तो देशी गायींच्या सहाय्याने सेंद्रिय शेतीकडे वळला आणि आज कोट्यावधी रुपयांचा मालक झाला आहे. आणि हे सर्व अशोकने केले ते माण सारख्या दुष्काळी भागात, हे विशेष होय.
महाराष्ट्र आणि भारतीय शेतकऱ्यांनी जर्सी अथवा इतर परदेशी गायींच्या मागे न लागता देशी गायी पाळणेच हितकारक आहे असे यातून स्पष्टपणे दिसते आहे. सरकारने आता देशी गाय संवर्धनासाठी उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. याविषयीची अधिक माहिती खालील विविध लिंक वरून मिळू शकेल.



Wednesday, 13 May 2015

बाबासाहेब, हिंदू कोड बिल आणि मनुस्मृती...!


बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे. पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊनच हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते.माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-
“ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.दोघांनीही मुलीचा चौथ्या हिश्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.
[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक।
स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:॥
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करे। ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]
बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्याही कारणाने का असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे. नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता.
प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो.त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला. आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते.त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले.
रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते.आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता.याबद्दल मला मुळीच शंका नाही.”
[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]
११जानेवारी १९५० ला मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्मृतीचा आधार घेतला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.
[समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]
समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.[जनता,१०-२-१९५१]
दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:-
“माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली. पण तसे म्हणणार्यांना माझे आव्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.
एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये?[जनता,३जानेवारी१९५३]

बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-
अध्याय ९मधील हे सर्व श्लोक आहेत:-
श्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक।
स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव: ॥
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें। ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.
श्लोक १२९-
यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा ।
तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत ॥
अर्थ:-मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है.तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?
श्लोक १३०:-जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है.
श्लोक १३२-मुलाच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.
श्लोक १३८-मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.
श्लोक८९-ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.
श्लोक १२-ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.
श्लोक१९१-सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.
श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धनसे प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.
श्लोक १९३-सहा प्रकारची स्त्री धने आहेत:-
१.विवाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले.
२.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले.
३.नवर्याने भेट म्हणून दिलेले.
४.वडिलांनी दिलेली.
५.आईने दिलेले.
६.भावाने दिलेले.
श्लोक १९४:-या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.
आर्यसमाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात:-ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्मृतीत प्रक्षिप्त श्लोक घुसवले.या प्रक्षिप्त स्लोकांसाठी मनुस दोषी ठरवता येणार नाही.
राजर्षि शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थप्रकाश ग्रंथात मनुस्मृतीतले ५१४ श्लोक आहेत,जे समतावादी आणि अंधश्रद्धारहित आहेत.
या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ते म्हणतात:-“बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ.या कामासाठीआपण त्याला मानधनही देऊ.गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो.त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले.त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले.आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ते म्हणतात:-“बाबासाहेबांनी मला एके दिवशी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून  काढ. या कामासाठी  आपण  त्याला  मानधनही  देवू. गुरुकुल कांगडी चे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो. त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भेटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासन ही दिले. त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला 'वीर अर्जुन' मध्ये प्रकाशित झाली. बाबासाहेबांनी स्वतः ते लेख वाचले आणि माझ्याकारावी पं. विद्यालंकार यांना ५००० रुपयांचे मानधनही पोहचते केले." {पान क्र. ८६-८७-२०१० ची आवृत्ती, बाबासाहब डा. आंबेडकर के संपर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, सम्यक प्रकाशन}
<< साभार >>

Sunday, 10 May 2015

शिवशाहीर...!

जेष्ठ शिव चरित्रकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. एका सच्चा शिवराय भक्ताला, त्यांच्या कार्याला मिळालेला हा पुरस्कार उल्लेखनीय आणि समर्थनीय आहे. परंतु काही मंडळी बाबासाहेबांना हा पुरस्कार देण्यावरून स्वार्थी विरोध करण्यात मश्गुल आहेत. या मंडळींना ब्राह्मण समाजातील व्यक्तींचा विरोध करण्याशिवाय दुसरे कोणतेही विधायक काम नसल्याने हे लोक सध्या आदरणीय बाबासाहेबांना विरोध करत आहेत. परंतु शिवराय, राजमाता जिजाऊ आणि मराठा समाजाची जेवढी बदनामी या लोकांनी केली असेल त्याला तोडच नाही.
अवघ्या विश्वाला वंदनीय असणाऱ्या छत्रपति शिवरायांना याच लोकांनी एका जातीत बंदिस्त केले, हे कार्य समर्थनीय म्हणायचे काय.?
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र घराघरात पोचवले असे म्हटले जाते. आता सात समुद्रापार देखील जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग होत आहेत. परंतु ज्यांचे स्वार्थच इतरांवर टीका करण्यावर अवलंबून आहेत ते पुरंदरेंना विरोध करणारच. यांचा विरोध पाहून असे वाटते की, शासनाने महाराष्ट्र भूषणच नव्हे तर प्रत्येक पुरस्कार देताना या समाजद्रोही लोकांना विचारूनच पुरस्कार द्यायला हवा की काय.? यांचा विरोध हा सर्व ब्राह्मण समाजाला आहे. यांना ब्राह्मण समाजाने केलेले उत्तम कार्य कधीही दिसत नाही.
बाबासाहेबांच्या लिखाणावर यांनी केलेले आरोप हे केवळ जातीय द्वेषातून केलेले आहेत आणि त्यांना कोणताही संदर्भ नाही. हे लोक इतिहास वाचताना संदर्भासहित न वाचता केवळ जातीय द्वेषातूनच वाचताना दिसतात. तसेच यांचा आणखी एक अट्टाहास असतो तो म्हणजे, "आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा" अर्थात आम्ही जो कल्पनाविलास करून जातीय द्वेषातून इतिहास लिहू तोच सर्वांनी खरा मानावा. या लोकांशी कोणीही चर्चा करू शकत नाही. कारण हे आपल्या पुस्तकात कत्तली करण्याचेच आवाहन करतात. हि मंडळी कायम इतरांना आरोपी म्हणूनच पुढे आणतात, समोरील व्यक्तीवर कसलाही संदर्भ न घेत गलिच्छ आरोप करायचे, इतिहासाचे आणि राष्ट्र पुरुषांचे विकृतीकरण करायचे हाच एक कलमी कार्यक्रम यांनी आता पर्यंत केलेला आहे. यांची वृत्तीच मुळी हम करे सो कायदा अशी आहे त्यामुळे इथे मतभेदांना अजिबात किंमत नाही.
बाबासाहेबांच्या लिखाणातील कुणबिणी या शब्दामुळे कुणबी समाजाचा अपमान होतो असे हि मंडळी म्हणत आहेत. मात्र इतिहास, भाषा, ऐतिहासिक संदर्भ आणि त्या त्या काळातील सामाजिक परिस्थिती याची कसलीही माहिती असूनही मान्य न करणारी ही जमात सारे काही जातीय चष्म्यातूनच पाहताना दिसते. कुणबीण
या शब्दाचा अर्थ देह विक्रय करणारी स्त्री अशा अर्थाने वापरात होता. कुणबीण म्हणजे कुणबी जातीची स्त्री नव्हे. कुणबीण या कोणत्याही जातीतील समाजातील स्त्रिया असत. तसेच पुरंदरेंच्या लेखनात मुस्लिम द्वेष आहे असाही आक्षेप ही समाजद्रोही मंडळी घेत आहेत. परंतु बाबासाहेबांनी मुस्लिम द्वेष या पुस्तकातून दाखवलेला नाही तर शिवरायांचे शत्रू मुस्लिम होते म्हणून तो शत्रुविरोध आहे. आता शत्रू मुस्लिम असेल तर तो दोष बाबासाहेबांचा म्हणायचं काय.? ब्राह्मण समाजाचा उदो उदो या पुस्तकात  केल्याचा  आणखी एक अपप्रचार हि मंडळी करत आहेत मात्र या  पुस्तकात ब्राह्मण समाजाच्या तत्कालीन दोषांवर भरघोस टीका केलेली आढळते.
बाबासाहेब पुरंदरे हे काही इतिहास संशोधक  नाहीत  असे त्यांनी स्वतः देखील सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी शिवचरित्र लिहिताना उपलब्ध ऐतिहासिक साधने, पुरावे, संदर्भ यांच्या सह हे पुस्तक लिहिले आहे, जर या समाज द्रोही लोकांना हे पटत नसेल तर त्यांनी स्वतः इतिहास संशोधन करावे. स्वतः खरा इतिहास लिहावा.
परंतु जे शिवराय आणि जिजाऊ साहेब यांचे नाव घेऊन विशिष्ट समाजातील स्त्रियांचा गलिच्छ भाषेत यथेच्छ अपमान करणारे व त्या समाजाच्या कत्तली करण्याचे उपाय सांगणारे इतिहास काय शोधणार. हे लोक केवळ आणि केवळ द्वेषच करतील.
जेम्स लेन प्रकरणी देखील बाबासाहेबांनी ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी प्रेसला पत्र लिहून लेनचे पुस्तक मागे घेण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे तो आरोप देखील निराधार आहे. तसेच लेनला पुस्तक लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी मदत केली असे जे सांगितले जाते ते खरे नाहीच. कारण लेनच्या पुस्तकात ब्राह्मण समाजावर देखील टीका केलेली आहे, आणि जर बाबासाहेब ब्राह्मणवादी असतील तर ते अशा पुस्तकाला कसे काय साहाय्य करतील.?

शेवटी एवढेच  सांगावेसे  वाटते  की नव्वदी पार केलेल्या एका शिवभक्ताच्या वयाचा जराही विचार न करता केवळ जातीय द्वेषातून विरोध करणारे यातून शिवरायांचा देखील अपमान करत आहेत. समाज यांना आता विचारात नाहीच, आणखी काही दिवसात हि मंडळी देखील इतिहास जमा होऊन जातील हे निश्चित...!

अधिक माहिती येथे मिळेल:
1.  http://sanjaysonawani.blogspot.in/2015/05/blog-post_6.html
2.  http://harinarke.blogspot.in/2015/05/blog-post.html
3.  http://jewatelte.blogspot.in/2015/05/blog-post_8.html
4.  http://drabhiram.blogspot.in/2015/05/blog-post_6.html

Wednesday, 29 April 2015

शिवरायांचे खरे शत्रू...!


आजकाल समाजद्रोही आणि इतिहासद्रोही संघटनांचे भलतेच पेव फुटले असून तद्दन विकृत, खोटा आणि दिशाभूल करणारा इतिहास पुस्तकांच्या व व्याख्यानांच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या माथी मारण्याचा क्रूर प्रकार ही लोकं करत आहेत. वास्तविक इतिहास, त्यातील सत्यता पडताळून न पाहता केवळ द्वेषाच्या आधारे विशिष्ट जातीसमुहाला टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध बहुजन समाजाला भडकवण्याचा हा प्रकार आपल्या सर्वांच्या प्रयत्न व सहकार्याने हाणून पाडण्याची आज खरे म्हणजे आवश्यकता आहे. कृष्णाजी भास्कर या अफझलखानाच्या वकीलापासून शिवरायांचे सर्व विरोधक हे ब्राह्मण असल्याचे सांगण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. परंतु ज्या ब्राह्मण योद्ध्यांनी शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली त्या बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, शिवरायांचे वकील बोकील, अष्टप्रधान मंडळातील ब्राह्मण मंत्री, शिवरायांचे स्वप्न साकार करणारे थोरले बाजीराव पेशवे, या सर्वांचे कर्तृत्व ही लोकं विसरून जाताहेत, आता यांना हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे की, शिवरायांचे खरे विरोधक हे ब्राह्मण नसून स्वकीयच होते.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेला ज्या मोरे, घोरपडे, गायकवाड, भोसले घराण्यांनी विरोध केला त्याबद्दल कोणी सरसकट मराठा समाजाला नावे ठेवत नाहीत त्याच प्रकारे सर्व ब्राह्मण समाजाला स्वराज्य विरोधक ठरवण्याचा अधिकार या समाजद्रोह्यांना कोणी दिला.?
अफझलखानाला फितूर झालेल्या मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, राजाजी घाटगे, केदाराजी खोपडे, खंडोजी खोपडे, बजाजी निंबाळकर या स्वकीयांमुळे संपूर्ण मराठ्यांना शिवराय विरोधक मानायचे काय.?
अफझलखान शिवरायांच्या कुलस्वामिनी तुळजापूर भवानी मंदिरातील मूर्तीची विटंबना करताना शांत बसलेले मराठे शिवरायकुलविरोधक म्हणायला हवेत का.?
शाहिस्तेखान स्वराज्य उध्वस्त करायला चाल करून आला त्यावेळी फितूर झालेला जसवंतराव कोकाटे नक्कीच शिवरायांचा मित्र नव्हता, म्हणजे मराठे शिवारांचे शत्रू होते असा त्याचा अर्थ होतो का.?
आपल्या स्वार्थासाठी आणि लालचीपनापायी दाभोळसारख्या वतनासाठी औरंगजेबाला फितूर होऊन आपल्या सख्या मेहुण्याला छत्रपती शंभूराजे यांना औरंग्याच्या ताब्यात देणारे गणोजी शिर्के तर मग छत्रपती संभाजी राजांचे हत्यारेच मानायला हवेत ना.?
स्वराज्य राजधानी रायगडचे दरवाजे उघडे टाकून महाराणी येसूबाई व शंभुपुत्र शाहू यांना औरंग्याच्या ताब्यात देणारे सूर्याजी पिसाळ काय मग स्वराज्य हितचिंतक होते का.?
आजकाल दलित तथा बुद्धांना आपलेसे करणारे ग्रामीण भागात सावकारी व पाटीलकीच्या जोरावर दलितांवर अत्याचार करणारे कोण आहेत.? मग कसले आलेय तुमचे बहुजन ऐक्य.?
 जेम्स लेन नावाच्या हरामखोर माणसास कृतज्ञता म्हणून पुस्तक अर्पण करणारे पुरुषोत्तम खेडेकर कोण आहेत.?
 जेम्स लेनने वास्तविक १५ लोकांचे आभार मानले असता केवळ १४ लोकांचा उल्लेख करणारे व १५ वा माणूस मुसलमान असल्याने त्याचा उल्लेख न करणारे लबाड लोक कोण आहेत.?
 छत्रपती शिवरायांना आपल्या पोवाड्यात दगलबाज व लुटारू म्हणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना शिवरायांच्या रांगेत बसविणारे कोण आहेत.? (महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. तरी त्यांच्या कार्याविषयी माझ्या मनात कसलाही द्वेष नाहीये. किंवा अपमानाचा उद्देश नाहीये.)
 ब्राह्मण समाजाविषयी तद्दन खोटे विकृत, वेडसर, बेजबाबदार, दिशाभूल करणारे लेखन व व्याख्यान देणारे कोण आहेत.?
 स्वामी समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, स्वातंत्र्यवीर सावरकर, थोरले बाजीराव पेशवे यांच्याविरुद्ध खोटा लबाडीचा विकृत आणि बदनामीकारक प्रचार करणारे कोण आहेत.?
 ब्राह्मण समाजातील घरातील स्त्रियांचा कामवासनेसाठी एखादा मराठा समाजातील माणूस पुरुष वेश्या म्हणून ठेवलेला असतो असे पुस्तकात लिहून ब्राह्मण स्त्रियांची व मराठा पुरुषांची बदनामी करणारा आणि ते पुस्तक जिजाऊ प्रकाशन या नावाने प्रसिद्ध करणारा पुरुषोत्तम कोण आहे.?
 जिजाऊच्या नावाने प्रकाशन संस्था काढून खोटारडी, विकृत, वेडसर पुस्तके प्रकाशित करून प्रत्यक्ष जीजामातेच्या शिकवणुकीचा अपमान करणारा कोण आहे.?
 शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक असताना तसेच गो-ब्राह्मण प्रतिपालक असताना त्यांची प्रतिमा मुसलमान धर्मरक्षक अशी करणारा कोण आहे.?
वरील घटना मधून एवढेच जाणवते की, खोटा, विकृत, वेडसर, कामुक इतिहास व मराठा समाजातील पुरुष आणि जिजामाता यांच्या विचारांचा अपमान करणे हेच एकमेव उद्देश या समाज द्रोही मंडळींचे आहे. यातून ते आपल्या आराध्य दैवतांची तर बदनामी करत आहेतच सोबतच संपूर्ण मराठा समाजाला एका हीन पातळीवर आणता आहेत. अशा प्रकारच्या विकृत लेखनाने शिवराय तथा महापुरुषांचा पराभव ही मंडळीच करत आहेत, हे आता तरी बहुजन समाजाने समजून घ्यायला हवे. या महापुरुषांचे स्वतःला वंशज म्हणवणारे शिवरायांचे कार्य कर्तृत्व झाकोलाण्याचा प्रयत्न करत असून अखिल विश्वाला मार्गदर्शक असणाऱ्या राजाला केवळ विशिष्ट जाती समूहापुरते मर्यादित करून त्यांची भव्यता खुजी करण्याचा प्रयत्न हे लोकं करत आहेत.
शिवरायांचे शत्रू हे केवळ एका समाजातील नव्हते तर ते सर्व समाजात कमी अधिक प्रमाणात होते. त्यामुळे ब्राह्मण समाज शिवराय विरोधक होता ही बतावणी करून काहीही साध्य होणार नाही कारण सत्यमेव जयते हेच सत्य आहे. शिवराय विरोधक हे कोण्या एका जातीचे नव्हते तर शिवराय विरोधक ते होते, ज्यांच्या निष्ठा औरंगजेब, निजाम अथवा शिवरायांव्यतीरिक्त इतर ठिकाणी होत्या...तेच खरे शिवराय विरोधक होते, कोणतीही जात नव्हे... आणि हा इतिहास कोणी कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी समाज द्रोह्यांच्या या  भूलथापांना कोणीही बळी पडणार नाही, यात किंचितही शंका नाही. कारण भावनिक मुद्द्यावर किंवा द्वेषाच्या आधारे जमवलेले कार्यकर्ते आणि समाज बांधव जेव्हा स्वतः सत्याचा पडताळा करतील तेव्हा या समाज द्रोही मंडळींना पाळता भुई थोडी होईल हे निश्चित.

Tuesday, 28 April 2015

झाले स्वप्न साकार शिवरायांचे...!



अपराजित योद्धा, मोगलांना सळो की पळो करून सोडणारा, छत्रपती शिवरायांचे स्वप्न साकार करणारा, जगातील सर्वश्रेष्ठ योद्ध्यांमध्ये अग्रणी असलेला, मराठा साम्राज्य पताका अटकेपार फडकावणारा एकमेव योद्धा म्हणजे श्रीमंत थोरला बाजीराव पेशवा... इतिहासाने आणि समाजानेही दुर्लक्षित केलेल्या अशा या युगपुरुषाचे कर्तृत्व गैरसमजामुळे नेहमीच झाकोळले गेले. पेशवाईत मस्तानीमुळे आणि नंतर ब्राह्मण असल्यामुळे...

आपल्या अजिंक्य युद्ध नीतीच्या जोरावर मोगलांच्या तोंडचे पाणी पळवणारा, कुशल सेनापती, छत्रपतींशी आयुष्यभर निष्ठा राखणारा बाजीराव, आज समाजाला, देशाला शिकवण्याची नितांत आवश्यकता आहे. मोगली बादशाहांच्या इतिहासाने पुस्तकांची पाने भरवनार्यांनी बाजीरावाला नेहमी बहुजन समाजापासून दूरच ठेवले आणि त्याला जातीमध्ये बंदिस्त केले. असे इतिहासकार खरे म्हणजे गुन्हेगारच होत. आपली संस्कृती, आपला राजा, आपला सेनापती यांचा इतिहास झाकून परकीयांचा उदो उदो करणाऱ्या इतिहासकारांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ते सापाच्या पिल्लांची भलामण करत आहेत आणि यामुळेच या देशाचे नुकसान झाले आहे, होत आहे आणि जोवर याविरुद्ध कोणी बोलणार, लिहिणार नाही तोवर हे असेच सुरु राहील.

अवघ्या ३९ वर्षाच्या उण्यापुऱ्या आयुष्यात वयाच्या २० व्या वर्षापासून रणांगण गाजवणारा बाजीराव खरेच कोणी समजून घेतलाच नाही. थोरला बाजीराव पेशवा यांनी आपल्या कारकिर्दीत एकही लढाई हरली नाही, ते सदैव अजिंक्य राहिले. छत्रपती शिवरायांचे उत्तर हिंदुस्थान हिंदवी स्वराज्यात आणण्याचे स्वप्न होते, याच ध्येयासाठी बाजीराव लढला आणि त्याने ते ध्येय अटकेपार झेंडा रोवून पूर्णही केले. मुगलांवर मराठेशाहीचा दबदबा निर्माण करणारा आणि संधी असूनही छत्रपतीपद नाकारणारा थोरला बाजीराव पेशवा होय. आयुष्याच्या शेवटपर्यंत बाजीरावाने सातारच्या गादीशी इमान राखले.
आपल्याला माहिती असलेला अथवा सांगितला जाणारा बाजीराव म्हणजे मस्तानीचा बाजीराव असेच सांगितले जाते, त्यांच्या रंगेलपणाच्या गोष्टीच मीठ मसाला लावून सांगितल्या जातात आणि बहुजन समाजही त्याला माना डोलवत प्रतिसाद देतो, हे खरे म्हणजे दुर्दैवच होय. सतत २० वर्षे रणांगण गाजवणारा, शिवरायांनी दाखवलेल्या वाटेने जात, त्या वाटेचा महामार्ग करणारा बाजीराव, आपल्या पराक्रमाच्या जोरावर अवाढव्य मोगलांना पराभूत करणारा बाजीराव नेहमीच विस्मृतीत ढकलण्याचा प्रयत्न आतापर्यंत होत आला आहे.

बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेवर अनेक लहान मोठ्या तर काही अतिरंजक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. टीव्ही मालीकांमधुन, अनेक कथा, कादंबऱ्यामधून रंगेल व शौकीन म्हणून बाजीरावांचे वर्णनही आले. लोकांना खरा इतिहास कधीच आवडत नाही. काहीतरी रंजक, मनोरंजनात्मक कहाणी तयार करून चुकीचा इतिहास गळी उतरविला की बरे वाटते. असल्या रंजक कहाण्यांमधून  बाजीरावाच्या पराक्रमी प्रतिमेचं प्रचंड नुकसान झाले आहे. अजेय योद्धा बाजूला राहून एक प्रेमवेडा, स्त्रीवेडा पेशवा तेवढाच आपल्यापुढे मांडला जातो. मस्तानी हे बाजीरावांच्या आयुष्यातलं शृंगारिक पर्व जरी असलं तरी त्यावरून बाजीरावाला छंदीफंदी, रंगेल ठरवणे म्हणजे स्वतःच्या पूर्वजांचा पराक्रमी इतिहास पुसण्यासारखेच ठरेल. खरे तर मस्तानी-बाजीराव हे प्रेमाचे प्रतिकच. एका यवनी-मुसलमानी स्त्रीवर त्याकाळात प्रेम करून सहचारीणीचा मान देण्याचे धाडस ‘बाजीराव’च करू शकेल. परकीय देशातील ढोंगी व्हैलेण्टाइन डे साजरा करणाऱ्यांनी ही गोष्ट नक्कीच ध्यानात घ्यावी.

इतिहास:

जन्म   :  इ.स. १८ ऑगस्ट १७००     मृत्यू    :  इ.स. २८ एप्रिल १७४०

श्रीमंत बाजीराव पेशवे :
बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा. तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या वर्षी काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या.  त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या  मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले.

थोरल्या बाजीरावांना पराभूत करणे त्यांच्या शत्रूला कधीही शक्य झाले नाही. हिंदवी स्वराज्य सैन्य, भिमथडीच्या तट्टांना नर्मदा, यमुनेचे पाणी पाजणारा बाजीराव हा पहिलाच योद्धा होय. बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली.

बाजीरावांचा हिंदुस्थानभर  मोठा दरारा होता. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला.
॥ श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान॥
अशी बाजीरावांची मुद्रा होती.

कुशल सेनापती:
बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची  १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला पूर्ण पराभूत करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा ‘स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं. बाजीराव शत्रूला स्वत:च्या स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर वाट पाहून कसलेल्या शिकाऱ्याप्रमाणे हमला करायचा. कदाचित पुढील काळात या युद्धतंत्राचा विसर पडल्यामुळे ‘पानिपता’सारखा प्रसंग ओढावला.  बाजीराव हे मोठे युद्धनीतीज्ञ होते.  म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला आपल्या सोयीच्या व मोक्याच्या ठिकाणी आणून हरविणे, त्यासाठी दबा धरून बसणे, सक्षम गुप्तचर यंत्रणा वापरणे आदी तंत्र छत्रपती शिवाजीमहाराजांसारखेच वापरले असल्याचे दिसून येते. बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होता की नाही याबाबत नक्कीच वाद नाही. शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्राचा ठसा बाजीरावांवर नक्कीच पडलेला होता.

घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती.  सहा फुट उंची असलेले बाजीराव हे उत्तम सेनापती होते. बुद्धी आणि शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव. घोड्यावरच्या बांधलेल्या  पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खात खात दौड करीत, सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही. त्यांच्याबरोबर जेवण करत असे. त्याच्या फौजा ७५ किलोमीटर प्रतीदिन या वेगाने जायच्या. घोड्यावर मोजकीच शिधा व शस्त्र असल्याने मराठा सैन्याची गतिमानता जास्त होती. सैन्याचा अंतर कापण्यासाठीचा हा वेग त्या काळातला सर्वोत्तम वेग होता.  त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. शत्रूला सुगावा लागायच्या आतच हल्ला झालेला असायचा. बाजीरावांची गुप्तचर यंत्रणा ही त्याची दुसरी मोठी बाजू. शत्रुच्या हालचालींबाबतची क्षणाक्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणाऱ्या नद्या, नद्यांचे चढ, उतार, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती असायची.

शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता.

बाजीरावाचा उल्लेख छत्रसाल बुंदेला याने अशा प्रकारे केला आहे,
 "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली.
त्याने बाजीरावाकडे मदतीची मागणी करताना गजांत मोक्षाचा हवाला दिला आहे, तो असा, "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥"  पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. आणि मोहम्मद खान बंगेश याचा पराभव केला.

मस्तानी :
बाजीरावाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मस्तानी.  पेशवे दप्तरातील पत्रांवरून तिचे नावे मस्तान कलावंत होते व बाजीरावांच्या (नानासाहेब) लग्नसमारंभात तिला नाचगाण्यासाठी आणण्यात आले होते. तर निजामाच्या नाटकशाळेतून बाजीरावाने तिला आणली अशीही एक आख्यायिका आहे. महंमदशहा बंगशपासून मुक्तता केल्याने छत्रसालनेच तिला बाजीरावाला अर्पण केली असेही म्हणतात. परंतु बाजीरावाने सहकारिणीचा दर्जा देऊ केल्यानंतरही अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागले. मस्तानीसारख्या यवन स्त्रीवर प्रेम करून तिला शनिवारवाड्यात आणणारा म्हणून ब्राह्मणांनी या पेशव्याला उपेक्षितच ठेवलं. काही ब्राह्मणांनी तसेच घरातील नातेवाईकांनी मस्तानी प्रकरणावरून  त्यांना आयुष्यभर छळले. हिंदुस्थानभर आपल्या नावाचा धाक बसविणारा बाजीराव घरच्या कुरघोड्यांना तोंड देऊ शकले नाही. पुण्यातल्या तत्कालीन ब्राह्मणांना तसेच खुद्द बाजीरावांच्या आईला व बंधू चिमाजी अप्पांना ते काही पटले नाही. मस्तानीपासून  समशेरबहाद्दर नावाचा मुलगाही झाला.  .


जाता जाता:
१७२९ साली महम्मद खान बंगशाचा पराभव केल्यानंतर बाजीरावाचा दबदबा संपूर्ण उत्तर भारतात निर्माण झाला. मातोश्री राधाबाई यांची काशीयात्रेची इच्छा होती, बाजीरावाने राधाबाईंना काशीयात्रेला पाठवून दिले. परंतु उत्तर हिंदुस्थानात तर राजपुतांमध्ये स्पर्धा लागली की, राधाबाईंचे आदरातिथ्य करावे. परंतु या सगळ्यावर कळस म्हणजे जेव्हा महम्मद बंगशाला राधाबाईंनी बाजीरावाचे पत्र दिले तेव्हा तर तो आनंदाने नाचुच लागली की, बाजीरावाने माझी आठवण ठेवली म्हणून आणि त्यानेच पुढे राधाबाईंची काशीयात्रा पूर्ण केली. आपण कल्पनाही करू शकत नाही की राधाबाईंच्या जवळ सैन्य वगैरे नसतानाही शत्रूच्या सुभेदाराने बाजीरावाच्या मातेची काशीयात्रा पूर्ण करून त्यांना पुण्याला आणून सोडले. तो दगाफटकाही करू शकत होता, पण बाजीरावाचा पराक्रमाच असा होता की बंगशाने त्याच्या वाटेला जाण्याचे साहस केले नाही. ही फार मोठी गोष्ट होती.

अशा या वीराचा मृत्यू २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदा नदीकाठी रावेर मुक्कामी झाला. शनिवार वाड्यासमोर असलेला बाजीरावाचा पुतळा सोडला तर त्याचे कुठेही भव्य स्मारक वगैरे नाहीये. जिथे त्याचा मृत्य झाला तिथे देखील त्याची समाधी मोठ्या हलाखीच्या अवस्थेत आहे. अफझलखानाच्या स्मारकाला विरोध न करणारे सरकार बाजीरावाचे प्रशस्त स्मारक कधी बांधेल का आणि त्याचा इतिहास शाळेपासून शिकवायला सुरु करेल का हाच खरा प्रश्न आहे.

काही ठळक घटना :
२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू
१८ आगस्ट  १७०० - बाजीरावांचा जन्म.
१७०७ - कैदेतून शाहूमहाराजांची सुटका.
बाळाजी विश्वनाथ - १७१३ ते १७२० पेशवाई प्रारंभ.
बाळाजी विश्वनाथ - १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
१७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली
१७२८ निजामाविरुद्ध पालखेडची लढाई
२८ एप्रिल १७४० ला रावेरखेड येथे मृत्यू
१७ डिसेंबर १७४० चिमाजी आप्पा एदलाबाद येथे मरण पावला.

Monday, 27 April 2015

दयासागर मिशनरी माझा...!



शुगर कोटेड प्रचारतंत्र नावाचा एक प्रकार असतो, ज्याला शुद्ध मराठीत साखरपेरणी म्हणतात. यात प्रचार करणारा असा काही गोड, मधाळ, रसाळ बोलून आपला माल खपवतो की, ऐकणाऱ्याला कधी समजतही नाही की आपण आपलेच इमान समोरच्या व्यक्तीच्या हाती दिले आहे. अशा प्रकारे प्रचार करण्यात जगभर पटाईत असलेली जमात म्हणजे मिशनरी...! दीन दुबळ्यांचे तारणहार, पतितांचे पालनहार म्हणून हि मंडळी आपली दुकाने मांडून बसतात येशु देवाच्या नावाने...
जगात जिथे जिथे गरीबी, दैन्य, दारिद्र्य, रोगराई, अस्मानी संकटे येतात-असतात तिथे ही मंडळी जाऊन पोहचतात आणि आपला शुगर कोटेड प्रचार सुरु करतात.
भारतात आलेला पहिला प्रचारक मिशनरी ते आता पर्यंतचे सारे प्रचारक मिशनरी  अशाच गोड, रसाळ बोलण्याने इथल्या समाजाला भुलवत राहिले. आणि त्याला गोंडस नाव दिले, मानवसेवेचे...! किती सुंदर शब्द आहे नाही, मानवसेवा, पण या सेवेमध्ये कोणता मेवा दडलाय हे जगाने कधी सांगितले नाही की कोणी त्याविरुद्ध बोलले तर त्याला जगूही दिले नाही.
लोकांच्या दुक्खावर पोसणारी हि मंडळी म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाणार्यातलाच प्रकार आहे.
भारतातील आदिवासी बहुल भाग, पूर्वोत्तर राज्ये, गोवा, केरळ, नागालैंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, बंगाल सारीकडे यांनी सुरुवातीला समाज सेवेच्या संस्था सुरु केल्या. रुग्णालये, शाळा, कृषी आधारित संस्था स्थापन केल्या. जनता जमू लागली की, कोणीतरी आलाय आपल्या कल्याणासाठी असे समजून. या सगळ्याचे मूळ कार्य काय तर मानवसेवा, पण याचं ध्येय कधी मानवसेवेच नव्हतंच हो... त्या खोटेपणाच्या आडून यांना आपला धर्म इथे वाढवायचा होता, पोसायचा होता...
जर तुम्हाला मानवसेवाच  करायची असेल तर तिथे येशूची प्रतिमा, मूर्ती कशाला ठेवता मग.? येशूच्या मुर्तीविनही मानवसेवा करता येऊ शकते... समाज सेवा करायला धर्माची आवश्यकता कशाला हवी यांना... आजार बरे करायला बायबल मधील वाक्ये आणि प्रार्थना कशाला हवीत यांना... तर येशूची मूर्ती, प्रतिमा का ठेवायची, तर त्यामागे शास्त्र आहे... जनतेला सेवा तर द्यायची पण जनतेने विचारले की, ही प्रतिमा कोणाची आहे, तर यांनी सांगायचे हि प्रतिमा देवाची आहे... जनता विचारणार कोणता देव, मग हे सांगणार येशुबाप्पा... आणि सांगणार आम्ही या देवाच्याच आज्ञेने येथे तुमच्या कल्याणासाठी आलोय... जनता, अरे व्वा, म्हणजे तुम्हाला या देवाने पाठवले... तर मग हा देव किती सुंदर असेल... मग मिशनरी म्हणणार हो देव सुंदर आहे, देव प्रीती आहे, देव दयासागर आहे... जनता भुलणार... मग हे मिशनरी लगेच तथाकथित मानवसेवेच्या संस्थेत प्रार्थना गायला सुरुवात करणार... जनता आपल्यावर कृपा करणार्याची प्रार्थना ऐकून क्षणभर तिथेच घुटमळणार, मग रोज येणार, आणि ही मिशनरी मंडळी यांना एके दिवशी बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करवून घेणार...
हे असेच चालत आलेय आजपर्यंत सारीकडे... शुगर कोटेड प्रचार... मानवसेवेच्या नावाखाली... अज्ञानी, अडाणी, रंजल्या, गांजल्या जीवांच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या ख्रिस्ती जाळ्यात ओढणारी ही दयासागर मिशनरी मंडळी...
ख्रिस्ती धर्म हा काही भारतीय धर्म नव्हे... मग ख्रिस्ती धर्माचे अनुयायी भारतात कसे तयार झाले, कशी वाढत आहे ख्रिस्ती लोकसंख्या... अशाच प्रकारे, शुगर कोटेड प्रचाराच्या जोरावर... जर मानवसेवा एवढे एकच यांचे कार्य असते तर मिशनर्यांनी मानवसेवा करून पुन्हा त्यांच्या देशात जायला हवे होते, चर्चेस बांधून भारतमातेच्या जीवावर जगायला कशाला हवे... जगातील सर्वात पाताळयंत्री, बेरकी मंडळी म्हणजे मिशनरी लोकं... उगाच नाही ख्रिश्चन लोकसंख्या एक नंबर आहे, अशा प्रकारेच जमवली आहे सगळी लोकसंख्या...
शुगर कोटेड प्रचार हा यांचा प्रमुख भाग आहे प्रचाराचा, धाक दडपशाही, जबरदस्ती अशा प्रकारे देखील ख्रिस्त्यांचा धर्म प्रसार सुरूच असतो... त्यातही मागे नाहीयेत मिशनरी... दयासागर दयासागर दयासागर मिशनरी...!!!

द ग्रेट फुले, शाहू, आंबेडकर...!


आज काल फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने समाजकार्याचा आव आणणाऱ्या तथाकथीत समतावादी प्रवृत्तीच्या मंडळींचा उपद्रव भलताच वाढला आहे. कोणतीही घटना असो कसलाही विचार न करता फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकावयाची हा एक कलमी कार्यक्रम या मंडळींनी हाती घेतला आहे. या लोकांमुळे इतर समाजाला फुले, शाहू, आंबेडकरांचे नेमके म्हणणे काय होते हेच समाजात नाहीये. यांच्यामुळे फुल, शाहू, आंबेडकर केवळ विशिष्ट समाजापुरतेच मर्यादित करण्याचा डाव या समतावाद्यांनी आखला आहे आणि बहुजन समाजातील काही तरुण यांच्या नडला लागून मुख्य समाजापासून दूर जात आहे.
काय म्हणणे होते फुले, शाहू, आंबेडकरांचे.? केवळ समता...! हा एवढा एकच उद्देश त्यांच्या आयुष्यात होता. माझ्या धर्मातील, समाजातील बहुजन वर्गाला इतर उच्चवर्णीय लोकाप्रमाणेच सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा हेच फुले, शाहू, आंबेडकरांनी वेळोवेळी सांगितले आहे. याचसाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि आपल्या समाजबांधवांसाठी कष्ट, त्रास, हाल-अपेष्टा सोसून न्याय मिळवून दिला. समता म्हणजे काय.? जसे इतर लोक जगतात त्याचप्रमाणे आम्हीही त्यांच्यासारखेच माणूस आहोत हे समजून आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे... आम्ही त्यांच्याहून कुणी वेगळे नाही आहोत, आम्हीही याच देशाचे नागरिक आहोत... आमचाही जगण्याचा सामान अधिकार आहे... याला समता म्हणतात...
परंतु आजकाल फुले, शाहू, आंबेडकरांच्या या हेतूला सुरुंग लावण्याचे भयानक कार्य काही समाजद्रोही मंडळींनी सुरु केले आहे. तर ही मंडळी काय करतात, तर आपल्या सभा, संमेलने, व्याख्याने, पुस्तके, मेळावे यातून केवळ द्वेष, विद्वेषाचे डोस बहुजन समाजाला देत असतात. इतर समाज कसा आमच्यापेक्षा वेगळा आहे किंवा आम्ही कसे त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे सांगण्याचा आटापिटा ही लोकं करत आहेत. म्हणजे ज्या फुले, शाहू, आंबेडकरांनी समतेचा उपदेश दिला तो नाकारून ही लोकं आता बहुजन समाजाला मुख्य प्रवाहापासून तोडण्याचे कार्य करत आहेत, आणि तेही फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन.!
महात्मा फुले यांनी कधीही असे नाही म्हटले की, आम्ही या समाजापासून वेगळे आहोत तर त्यांनी नेहमी असे सांगितले की, माझा बहुजन, दलित समाज हा इतर जातीतील लोकांसारखाच आहे, त्याला वेगळे समजू नका. शाहू महाराजही समतेचेच पुरस्कर्ते होते. त्यांनीही कधी असे नाही म्हटले की, माझ्या बहुजन, दलित, अस्पृश्य समाजाला वेगळे समजू नका तर त्याला आपल्यातलाच माना. आंबेडकरांचेही तसेच. मग आजकाल जी मंडळी या महापुरुषांच्या समतेच्या तत्वालाच हरताळ फासत आहेत, त्यांचे नेमके उद्देश तरी काय आहेत हेही बहुजनांनी समजून घेतले पाहिजे. ही मंडळी आपल्या केवळ स्वार्थापायी बहुजन समाजाला भडकवत असून आपले दुष्ट हेतू साध्य करण्याचे प्रयत्न करत आहेत. एखादा प्रयोग फसला तर नवीन प्रयोग करून बहुजन समाजाला आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत.
बहुजन समाजाचे दुर्दैव असे की, एकही नेता अथवा संघटना या समाजद्रोही लोकांविरुद्ध बोलत नाही. यामुळे या तथाकथी समतावादी लोकांचे फावत आहे. तोंडाची वाफ दवडताना समतेच्या बाता मारायच्या मात्र काम करताना बहुजन समाजाला मुख्य प्रवाहापासून तोडण्याचे काम करायचे असे यांचे सुरु आहे. माथी भडकावण्यासाठी छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, दादोजी कोंडदेव, पेशवाई असे भावनिक विषय घ्यायचे आणि काहीतरी खोटेनाटे सांगून चिथावणीखोर वक्तव्ये करायची की, आपला बहुजन तरुण लागलाच यांच्या नादाला. यातून बोलणार्याचा तत्कालीन राजकीय वा आर्थिक फायदा होतो. परंतु त्या तरुणांच्या हाती काय लागते. तर खोटेपणावर आधारलेलं तर्कट, जे कधीही सत्य नसतं तर या तथाकथित समतावाद्यांनी हवेत मारलेल्या गोळ्याच असतात.
आज बहुजन समाजात बेरोजगारी, खड्ड्यात जाणारी शेती, अल्प उत्पन्न असे गंभीर प्रश्न निर्माण झालेले असताना रोजगाराची, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची, उत्पन्नाच्या नव्या नव्या मार्गांची गरज आहे. रोजगारक्षम प्रकल्प हाती घेण्याची आवश्यकता आहे, शेतीला पूरक व्यवसायांचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे, घटती पाणी पातळी कशी स्थिर ठेवता येईल, त्यात कशी वाढ करता येईल, प्रक्रिया उद्योग, छोटे उद्योग उभारून बहुजन समाजातील तरुणांना, तरुणींना, विवाहित स्त्रियांना कसे सक्षम करता येईल हे सांगण्याची आणि तसे करवून घेण्याची आवश्यकता आहे...न की बहुजन समाजाची माथी भडकावून त्यांना द्वेषाचे डोस पाजून इतर समाजापासून तोडण्याची गरज आहे.! परंतु ज्यांना या तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घ्यायची आहे ती लोकं समाजविघातक कृत्यच करण्यात आपला वेळ वाया घालवत आहेत आणि दुर्दैवाने बहुजन समाजातील काही तरुण यांच्या नादी लागत आहे.
केवळ ब्राह्मण समाज, संघ, भाजप, शिवसेना, हिंदू संघटना यांच्या विरुद्ध विषारी वक्तव्ये करायची आणि पुढची गम्मत पहायची असे या लोकांचे महत्कार्य सुरु आहे. बहुजन समाजाने यांच्या दावणीला न लागता आपल्या स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाज बांधवांच्या उत्कर्षाचा मार्ग चोखाळायला हवा, द्वेष विद्वेषाचा नाही. फुले, शाहू, आंबेडकरांनी समानतेचे तत्व सांगितले म्हणून ते महात्मा, राजर्षी, महामानव झाले. त्यांनी द्वेषाचे तत्वज्ञान नाही सांगितले, जे आजकाल तथाकथी समतावादी सांगत फिरत आहेत. यामुळे हे लोकं महात्मा नव्हे तर दुरात्मे होताहेत आणि त्यांच्यामुळे बहुजन तरुणही त्यांच्यासारखाच होत आहे. प्रेम, विश्वास, सहिष्णुता, सलोख्याने जग जिंकता येते आणि द्वेष, मत्सर, इर्षा याने इवलासा जीव सुद्धा कोणाला आपल्या अंकित करता येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
संघ आंबेडकर जयंती साजरी करत नव्हता तर या मंडळींनी संघाला आंबेडकर विरोधी ठरवले, संघाने आंबेडकर जयंती साजरी केली तर त्याला संघाचा पब्लिसिटी स्टंट म्हणत ही मंडळी फिरत आहे. संघाने मातंग समाजातील व्यक्तींना पौरोहित्य प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली तर यांच्या पोटात गोळा उठला. कारण यांची दुकानदारीच केवळ विरोधासाठी विरोध आणि द्वेष यावर आधारित असल्याने या मंडळींना खरी समता नकोच आहे. त्याचमुळे या लोकांनी बहुजन तरुणाला द्वेषमुलक विचारसरणीचा गुलाम बनवण्याचा चंग बांधला आहे आणि काही तरुण याला बळी पडत आहेत.
यांचे हे द्वेषाचे काम हाणून पाडण्यासाठी यांच्याशी बहुजन समाजाने असहकार पुकारायला हवा. जी संघटना, पक्ष बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा आणि फुले, शाहू, आंबेडकरांनी सांगितलेल्या समतेच्या तत्वाचा पुरस्कार करेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज बहुजन समाजाने कार्य करण्याची आवश्यकता आहे. ब्रिगेड आणि तत्सम संघटना या केवळ द्वेषाची भावना समाजात वाढवत आहेत आणि हे समाजाच्या, देशाच्या ऐक्यासाठी हानिकारक आहे.
द ग्रेट फुले, शाहू, आंबेडकर हे समतेच्या तत्वामुळे महान झाले न की विषारी फुत्कारांमुळे. त्यामुळे बहुजन समाजाने द ग्रेट फुले, शाहू, आंबेडकर यांची समतेची तत्वे स्वीकारावी न की श्रीमंत पुरुषोत्तम कृत पुस्तकांतील, व्याख्यानांतील विषारी द्वेषाची तत्वे स्वीकारावी.

Sunday, 26 April 2015

शिवराज्याभिषेक आणि ब्राह्मणी काव्याची अफवा...!



(हा लेख विस्ताराने लिहिलेला असल्याने बराच मोठा झाला आहे, परंतु ज्यांना समाजद्रोही मनोवृत्तीच्या पिलावळीन्चे कटकारस्थान हाणून पाडायचे असेल त्यांनी जरूर हा लेख वाचावा ही कळकळीची विनंती व आपल्या मागच्या आणि पुढच्या पिढीसह स्वतःची देखील बदनामीकारक हानी होण्यापासून रक्षा करावी, ही विनंती.)
तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण समाज यांबद्दल सध्या काही विषवल्ली विखारी प्रचार करत असून समस्त ब्राह्मण समाज शिवरायविरोधक असल्याचा भ्रम समाजात निर्माण करत आहेत. केवळ द्वेषाने भरलेली यांची भाषणे, सभा, संमेलने आणि पुस्तके असून त्यांना संपूर्ण समजही असाच द्वेषभावना जोपासणारा हवा आहे. केवळ याच ध्येयासाठी ही मंडळी काम करत आहेत. परंतु बहुजन समाजाने यांच्या अपप्रचाराला बळी न पडता सत्याचीच बाजू घ्यावयास हवी आणि या समाजकंटकांना त्यांची लायकी दाखवून द्यावी असे वाटते.
"परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यामुळे कलियुगात क्षत्रिय उरलेले नाहीत त्यामुळे ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण उरले आहेत, त्यामुळे शिवाजी महाराज हे शुद्र आहेत आणि शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नाही" असा दावा करून छत्रपति शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला, त्यामुळे शिवरायांनी काशीहून गागाभट्ट पंडितला आणून राज्याभिषेक करवून घेतला.
हा खोडसाळ दावा आजपर्यंत प्रत्येकाने ऐकलेला-वाचलेला आहे, किंबहुना त्यावरून कितीतरी काळ ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात वादंग निर्माण झालेला आहे, परंतु असा वाद घालणारे ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर या दोघांनी या दाव्यात किती खरे आणि किती खोटे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. त्यामुळे हा वाद महाराष्ट्रात सतत प्रज्वलित राहिला आणि खेडेकर-कोकाटे यांच्यासारख्या तापल्या तव्यावर पोळी भाजणाऱ्या लेखकांनी या दाव्याला अजून हवा देऊन बहुजनांच्या मनात ब्राह्मण समाजाविषयी एक अढी निर्माण केली, आणि बहुजनांनीदेखील काही शहानिशा न करता या दाव्यावर विश्वास ठेवून खेडेकर-कोकाटे यांना जे पाहिजे ते साध्य करून दिले.
पण यातून मिळाले काय? तर पिढ्यानपिढ्या निर्माण झालेला गैरसमज आणि त्याहून महत्त्वाचा म्हणजे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असा ब्राह्मणद्वेष, जो अजूनही महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मेंदूत अक्षरशः धुमाकूळ घालतोय. आणि हाच ब्राह्मणद्वेष कमी करण्यासाठी प्रस्तुतचा लेख.
सर्वप्रथम शिवरायांच्या क्षत्रियत्वाची माहिती घेऊ -
सन १६५६ मध्ये शिवरायांनी चंद्रराव मोरे यांस लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, "राजे आम्ही, आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे". यावरून दिसून येते कि महाराजांना आपण राजे आहोत अर्थातच क्षत्रिय आहोत याची जाणीव याआधीपासूनच होती, पण त्यांना हे कळले कधी व कसे हे महत्त्वाचे आहे.
स्वतः शिवराय, त्यांचे कुटुंबीय (शहाजीराजे, बंधू संभाजी व जिजाऊसाहेब) व त्यांचे आप्तस्वकीय म्हणजेच अष्टप्रधान मंडळ यांना भोसले कुटुंबीय "सिसोदिया वंशीय राजपूत क्षत्रिय" असल्याचे अगदी पूर्वीपासूनच माहिती होते, याचा पुरावा मिळतो शहाजी राजांनी विजापूर दरबारला लिहिलेल्या पत्रात, एका मुस्लिम सरदाराने शहाजी राजांना राजपूत मानण्यास नकार दिला असता राजांनी त्या पत्रातून "आम्ही तो राजपूत" (आम्ही तर राजपूत) असे विजापूर दरबाराला ठणकावून सांगितले आहे, तसेच शहाजी राजांचा राजकवी 'जयराम पिंडे' याने "राधामाधवविलासचम्पू" या ग्रंथात शहाजी राजांना "सिसोदिया अवतंस" म्हणजे सिसोदिया वंशीय म्हटले आहे, आणि शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांना त्याने "क्षत्रियगोत्री" असे विशेषण लावले आहे. 
"राधामाधवविलासचम्पू" हा ग्रंथ जयरामने शिवरायांचे बंधू संभाजीराजे हे हयात असताना लिहिलेला आहे, साधारण सन १६५० अगोदर, याचा अर्थ असा होतो कि आपण शिवराय 'क्षत्रिय' कुळातले आहेत हे महाराष्ट्राला सन १६५० च्या अगोदर पासूनच माहिती होते, मग ऐन राज्याभिषेकाच्या वेळी एखादा ब्राह्मण त्यांच्या क्षत्रियत्वावर शंका कशाला आणि का घेईल?
यासंबंधी अजून एक पुरावा देता येतो, तो म्हणजे, 'कवी भूषण' याचा 'शिवराजभूषण' हा काव्यमय ग्रंथ, हा कवी भूषण सन १६६२ मध्ये स्वराज्यात आला, महाराज आग्र्याहून परत आल्यावर त्याने महाराजांच्या पराक्रमावर 'शिवराजभूषण' हा काव्यमय ग्रंथ रचण्यास सुरुवात केली, या ग्रंथात सुरुवातीलाच ४ थ्या ते १० व्या छंदात तो महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास सांगतो, तो म्हणतो, 
"सर्व पृथ्वीचे भूषण म्हणून सुर्यवंश प्रसिद्ध आहे…या वंशातील एका राजाने देवाला आपले सीस (शीर) अर्पण केल्याने त्यांच्या वंशाला 'सिसोदिया' असे नाव मिळाले…याच वंशात मालमकरंद (मालोजी) नावाचा पुरुष जन्मला…तो रणावर शिलेसारखा दृढ असल्याने त्याला 'भौंसिला' हे नाव मिळाले…त्याला पृथ्वीचे भूषण असा शहाजी नावाचा पुत्र झाला…" (मूळ ब्रज भाषा, इथे मराठी भाषांतर).
हा ग्रंथ सन १६६६ मध्ये रचण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच भोसले कुटुंबाची वंशावळ सांगितली गेली आहे, म्हणजे पूर्वीचा पुरावा एखाद्याने अमान्य केला तरी या पुराव्यानुसार, शिवाजी राजे 'क्षत्रिय' कुळातले होते हे राज्याभिषेकाच्या किमान ८ वर्षे अगोदरपासून महाराष्ट्राला माहिती होते, मग तरीसुद्धा एखादा ब्राह्मण नेमका राज्याभिषेकाच्या आधी महाराजांच्या क्षत्रियत्वावर प्रश्न निर्माण करतो असे होणे पूर्णतः अशक्य आहे.
आणि म्हणूनच हे पुरावे ग्राह्य धरून आपण म्हणू शकतो कि शिवरायांच्या क्षत्रियत्वावर शंका घेण्यासाठी कोणत्याही ब्राह्मणाकडे कोणतेही कारण नव्हते, म्हणूनच महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणत्याही ब्राह्मणाने विरोध केला नाही.
गागाभट्ट यांनाच राज्याभिषेक करण्यासाठी का बोलावण्यात आले?
पैठण येथे भट्ट घराणे नावाजलेले घराणे म्हणून ओळखले जात असे, १६ व्या शतकाच्या सुरुवातीस याच भट्ट घराण्यातील एक विद्वान गोविंदभट्ट हे काशीक्षेत्री स्थायिक झाले, तेथे त्यांच्या पिढीत गागाभट्ट यांचा जन्म झाला, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते, तसेच काशीतील त्यांच्या घराण्याची सत्ता असलेल्या एका विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गागाभट्टांची निवड झाली होती, यासोबतच काशीत भरवल्या जाणा-या विद्वतसभेत अग्रपूजेचा मानदेखील याच भट्ट घराण्याकडे होता. थोडक्यात, भट्ट घराणे हे आजच्या गांधी घराण्यासारखे अत्युच्च शिखरावर असलेले घराणे होते. 
सभासद बखरीत गागाभट्ट यांचे वर्णन "कलीयुगीचा ब्रह्मदेव" असे आहे, त्यांनी "कायस्थधर्मप्रदीप" हा ग्रंथ लिहून कायस्थ हेसुद्धा क्षत्रियच आहेत याचा निर्वाळा दिला, ज्याअर्थी त्यांना "कलीयुगीचा ब्रह्मदेव" पदवी दिली गेली त्याअर्थी त्यांचे विचार हे सर्व ब्राह्मणांसाठी पूज्य आणि ग्राह्य मानले जाणे स्वाभाविक आहे. 
कायस्थधर्मप्रदीप मधून त्यांनी कलियुगात क्षत्रिय आहेत हे दाखवून दिले होते, तसेच 'परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली त्यामुळे ब्राह्मण व शुद्र हे दोनच वर्ण उरले' या दाव्यालादेखील सुरुंग लावला, मग अशा विद्वान व पूज्य व्यक्तीच्या मताला विरोध करून "कलियुगात क्षत्रिय उरलेच नाहीत" असा दावा करण्याची आणि तो सिद्ध करण्याची ताकद कोणत्याच ब्राह्मणात नव्हती. मग महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी महाराजांना या दाव्याद्वारे विरोध केला असे कसे म्हणता येईल?
अनंतदेव भट्ट हे गागाभट्ट यांचे बंधू पैठणला राहत असत, गागाभट्ट कोकणात सन १६६३ मध्ये आले होते, तेव्हा सन १६६४ च्या सुरुवातीस त्यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून शेणवी जातींच्या लोकांच्या भांडणाचा निवाडा राजापुरात जाहीर सभेत करून दिला, त्यानंतर सन १६६९ ते १६७२ या काळात त्यांनी कायस्थ प्रभू जातीच्या लोकांचे निवाडेही करून दिले, महाराजांना त्यांच्याबद्दल बराच आदर होता, शेणवी जातीचा निवडा महाराजांना आवडला त्यामुळे त्या निवाड्यास महाराजांनी स्वतःहून प्रशस्ती (शिवप्रशस्ती) जोडली होती.
वरील सर्व कारणे, तसेच मूळ भट्ट घराण्याची महत्ता, हाती असलेले धार्मिक अधिकार, अत्युच्च विद्वत्ता व "परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली" यासारख्या खोडसाळ दाव्यांना योग्य पुराव्यानिशी खोडून काढणे, तसेच मूळ पीठ काशी येथे या घराण्याला व खुद्द गागाभट्ट यांना असलेला मान यामुळे राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्याचा मान गागाभट्ट यांना देण्यात आला होता.
गागाभट्ट इसवी सन १६७३ ला नाशिकला आले, तेव्हा महाराजांना त्यांच्या आगमनाची वार्ता कळली, गागाभट्ट तेथून पैठणला अनंतदेव भट्ट यांच्याकडे गेले तेव्हा महाराजांनी त्यांना रायगडावर येण्याचे निमंत्रण पाठवले व येण्यासाठी पालखीची सोय केली, म्हणजे याचा अर्थ असा होतो कि गागाभट्ट हे स्वतःहून काशीतून महाराष्ट्रात आले होते, व इथे आल्यावर त्यांना महाराजांकडून बोलावणे आले होते, त्यामुळे गागाभट्ट यांना काशीहून बोलावले हे असत्य असल्याचे सिद्ध होते. 
त्यानंतर गागाभट्ट सन १६७४ ला रायगडावर आले, तेव्हा त्यांना राज्याभिषेकाची कोणतीही कल्पना नव्हती मात्र भेटीत महाराजांनी त्यांना राज्याभिषेकाची कल्पना दिली, तेव्हा गागाभट्ट यांनी तिथी निश्चित केली व परत पैठणला आले, व तेथे त्यांनी राज्याभिषेकप्रयोग आणि तुलापुरुष दानविधी हे दोन ग्रंथ लिहिले व त्यानंतर राज्याभिषेकाची सिद्धता करण्यासाठी परत रायगडी आले.
जर गागाभट्ट यांना काशीमध्ये राज्याभिषेकाची बातमी कळली असती तर ते काशीहून तडक रायगडला आले असते व येतानाच दोन्ही ग्रंथ लिहून आणले असते, पण असे काही घडलेले दिसत नाही त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात पैठणला येईपर्यंत राज्याभिषेकाची कल्पना नव्हती हे सिद्ध होते.
ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला कि नाही?
"ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला" हा दावा कितीही राग निर्माण करणारा असला तरी त्यात काडीचेही तथ्य नाही, कारण तसा कोणताही पुरावा कोणत्याच ऐतिहासिक साधनात उपलब्ध नाही. विसाव्या शतकाच्या आधीच्या कोणत्याही ऐतिहासिक साधनात असा दावा केलेला दिसत नाही, २० व्या शतकाच्या आधी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषातून शिवरायांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारे बरेच साहित्य निर्माण झाले, त्यापैकी कोणत्याही साधनात अशाप्रकारचा दावा करण्यात आलेला नाही. 
मग प्रश्न असा पडतो कि,
या वादाला सुरुवात नेमकी कोणी आणि कधी केली?
दुसरा बाजीराव पेशव्याच्या कारकिर्दीत मराठी राज्यात व मुख्यतः पुण्यात ब्राह्मणांचे प्रस्थ प्रचंड प्रमाणात वाढले होते तसेच तत्कालीन (आताच्या नाही) ब्राह्मणांना स्वतःच्या जातीचा दुराभिमान निर्माण होऊ लागला, व इतर सर्व जाती शुद्र आहेत असा घोर गैरसमज हळूहळू निर्माण होऊ लागला, गागाभट्ट यांच्यासारखा सुधारणावादी विद्वान यावेळी अस्तित्वात नव्हता. त्यामुळे या गैरसमजाला चाप बसू शकला नाही, परंतु खुद्द छत्रपतींना शुद्र म्हणण्याची हिंमत अजून एकाही ब्राह्मणात नव्हती. त्यामुळे मराठा साम्राज्य असेस्तोवर हा वाद कधी पेटू शकला नाही.
पुढे सन १८१८ साली मराठा साम्राज्य नष्ट झाले, अशातच १८३२ साली, सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही असा दावा एका (सर्व नाही) ब्राह्मणाकडून निर्माण केला गेला, तेव्हा महाराजांनी वेदपाठशाळेत यावर जाहीर चर्चा घेऊन त्या ब्राह्मणाचा संपूर्ण पराभव केला, त्यामुळे क्षत्रिय हे शुद्र नाहीत या वादाला तेथेच लगाम बसला.
परंतु इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, 
'शिवाजी महाराज हे शुद्र होते' असा कोणताही दावा कोणत्याही ब्राह्मणाने केला नाही.
सन १८९६ साली सयाजीराव महाराजांच्या कारकिर्दीत या वादाने पुन्हा डोके वर काढले, महाराजांना त्यांच्या पुरोहिताने, "तुम्ही शुद्र आहात व तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही" असे सुनावले, तेव्हा महाराजांनी वेदोक्ताचाच आग्रह धरला, परंतु ब्रह्मवृंदाने तो मान्य केला नाही, यामुळे महाराजांनी त्यांची हकालपट्टी करून गुजराती-मारवाडी वगैरे देशावरच्या ब्राह्मणांना नेमून आपले क्षत्रियत्व सिद्ध करून वेदोक्ताचा आग्रह पुरा करून घेतला, त्यामुळे हा वाददेखील तिथेच शमला. 
आणि इथेदेखील, 
'शिवाजी महाराज हे शुद्र होते' असा कोणताही दावा कोणत्याही ब्राह्मणाने केला नाही.
परंतु, सन १८९९ साली राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत हा वाद पुन्हा उफाळून आला, आणि त्याने भयंकर रूप धारण केले, काही ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या 'वेदोक्त-क्षत्रिय नव्हे शुद्र' या वादाची जणू अंतिम लढाई असेच या काळाचे वर्णन करता येईल. सर्वांनी मिळून राजर्षी शाहू महाराज हे शुद्र आहेत व त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही असा दावा केला.
आणि याच काळात 'शिवाजी महाराज हे क्षत्रिय नसून शुद्र होते' असा अत्यंत चुकीचा दावा संपूर्ण इतिहासात सर्वात प्रथम याच काही ब्राह्मणांकडून मांडला गेला, आणि यासोबतच 'महाराजांच्या राज्याभिषेकाला तत्कालीन ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून गागाभट्ट यांना लाच देऊन बोलावण्यात आले' ही अफवा जन्माला आली. 
वास्तविक पाहता शाहू महाराज हे वेदांचे व वेदोक्ताचे अत्यंत चाहते होते, वेदाविषयीची आपली प्रीती त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून-लेखनातून दाखवून दिली होती, आर्यसमाजासोबत त्यांचे उत्तम संबंध होते, याची जाणीव ठेवूनतरी विरोधी ब्राह्मणांनी त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य करणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही आणि त्यामुळे त्यानंतर निर्माण झालेली अफवा कायमची ब्राह्मणांच्या कपाळी चिकटली.
हि अफवा ज्या विशिष्ट व्यक्तीने निर्माण केली ती व्यक्ती होती, कोल्हापूरचे शंकराचार्य "ब्रह्मनाळकर स्वामी",
इ.स. १९०३ मध्ये शंकराचार्यांनी महाड मुक्कामी, "शिवाजी क्षत्रिय नव्हताच. त्याने गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतलं. त्याच्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा स‌त्यानाश झाला." असे धादांत खोटे व बिनपुरावी उद्गार काढले.
आणि त्यांना प्रोफेसर विष्णू गोविंद विजापूरकर (करवीर ब्रह्मवृंदाचे तत्कालिन नेते) यांनी आपल्या ग्रंथमाला मासिकातील वेदोक्तप्रकरणावरील लेखातील विचार यातून पाठींबा दिला, त्यांनी लिहिले "शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने करून त्यांचा क्षत्रियकुलावतंस असा जयजयकार करणा-या गागाभट्टाला त्याच्या पातकाचं प्रायश्चित्त म्हणजे त्यास शौचकूपात पडून मृत्यू पत्करावा लागला."
आणि अशाप्रकारे छत्रपति शिवरायांचा, या दोघांकडून काहीही गरज नसताना वेदोक्त प्रकरणात समावेश केला गेला, त्यामुळे, ज्याअर्थी ब्राह्मणांनी शाहू महाराजांना वेदोक्त नाकारले त्याअर्थी त्यांनी शिवरायांनादेखील राज्याभिषेकाला नक्कीच विरोध केला असणार असा गैरसमज हळूहळू महाराष्ट्रात निर्माण होऊ लागला.
ज्याची परिणीती, "परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केल्यामुळे कलियुगात क्षत्रिय उरलेले नाहीत त्यामुळे ब्राम्हण आणि शुद्र हे दोनच वर्ण उरले आहेत, त्यामुळे शिवाजी महाराज हे शुद्र आहेत आणि शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नाही असा दावा करून छत्रपति शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला त्यामुळे शिवरायांनी काशीवरून गागाभट्टला आणून राज्याभिषेक करवून घेतला" या अफवेत-आरोपात झाली, ज्यायोगे ब्राह्मणांना वैचारीकदृष्ट्या लक्ष्य करण्याचे हत्यार खुद्द ब्राह्मणांच्या या दोघा नेत्यांनीच ब्राह्मण विरोधकांना मिळवून दिले.
परंतु, यात सर्वच ब्राह्मण शाहूंच्या विरुद्ध पक्षात होते का असा प्रश्न निर्माण होतो, तर त्याचे उत्तर नाही असेच देता येईल,
शाहूंना वेदोक्ताचा अधिकार नाकारणारे प्रा. विजापूरकर, शंकरशास्त्री गोखले, भाऊशास्त्री लेले, नारायणभट, राजोपाध्ये ई. ब्राह्मणच होते व या ब्राह्मणांच्या विरूद्धचे अर्थात शाहू महाराजांच्या बाजूचेही काही प्रमुख ब्राह्मणच होते, कृष्णाजी नारायण पंडित, स‌रन्यायाधीश विश्वनाथ बळवंत गोखले, स‌ावळाराम अमृतराव विचारे ई. 
सुरुवातीला लोकमान्य टिळक हेदेखील या वादात होते परंतु ५-११-१९०१ च्या केसरीत टिळक लिहीतात " …कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..." याद्वारे टिळकांनी या वादातून अंग काढून घेतले,
तसेच आधी महाराजांच्या विरुद्ध असणारे राजोपाध्ये कर्झनला पाठवलेल्या पत्रात म्हणतात, "वेदोक्ताची चळवळ या नावाने कही उपद्य्वापी लोक समाजात विसरल्या गेलेल्या जातीय तेढी पुन्हा पेटवून स्वत:चा फायदा होतो का ते पहत आहेत. लावालाव्या करून चुकीचे अर्थ सांगून छत्रपतींचे मन कलुषित केले गेले आहे. राजांविषयी आदर राखुन मी सांगतो की याने अन्यायकारक सामाजिक बिघाड झाला आहे."
हिंदुस्तान सरकारच्या सेक्रेटरीला मुंबई सरकारचा सेक्रेटरी सी.एच.हिल याने ३ मार्च १९०५ ला एक पत्र लिहिले त्याचा भावार्थ,
"कोल्हापुरचे महाराज हे क्षत्रिय आहेत हे राजोपाध्ये पत्रातच म्हणत आहेत आणि ते तसे म्हणत नाहित असे म्हणण्याचा काहिंचा प्रयत्न या वादाच्या मूळाशी आहे. राजोपाध्ये ४ थ्या उताऱ्यात म्हणतात, मराठी राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या वेळेपासून कोल्हापुरचे राजघराणे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार आहे , त्यात कोणताही वाद नाही."
म्हणजे 'शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला हि केवळ एक अफवाच आहे जी केवळ एका शतकाआधी वेदोक्त प्रकरणातून निर्माण झाली व त्यामुळे शिवकालातील ब्राह्मणांवर नसता डाग लागला हे यातून स्पष्ट होते.
पुढे या वादावर पडदा पडून, याच शंकराचार्यांनी, राजर्षी शाहू महाराज हे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचे अधिकार असल्याचे मान्य केले, परंतु त्यांनी निर्माण केलेल्या अफवेवर मात्र ते पडदा पाडू शकले नाहीत व ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला हि अफवा उत्तरोत्तर पसरतच राहिली. 
शिवकालातील ब्राह्मण व त्यांची मानसिकता -
शिवकालातील ब्राह्मणांची मानसिकता हि शिवरायांना विरोध करावा अशी खचितच नव्हती, किंबहुना ज्ञानाचे बहुसंख्य अधिकार हे त्यांच्या ताब्यात असल्याने त्यांचे स्थान जास्त कोणी हिरावून घेऊ शकत नव्हते त्यामुळे याला-त्याला विरोध करावा अशी मानसिकता त्यांची मुळीच नव्हती, झालेच तर अस्मानी सुलतानी संकटाने सर्वच हिंदू अगदीच पिचलेले होते, त्याला ब्राह्मण अपवाद कसे असतील? आणि विशेषतः ब्राह्मण हे धर्मप्रसारक-पुरोहित असल्याने त्यांना त्या काळात अनन्यसाधारण महत्त्व होते, प्रचंड मान होता, शिवरायांनी आपल्या अनेक पत्रात कुलदेवतेसोबतच गोब्राह्मणाची देखील आण घातली आहे हे याचे उत्तम उदाहरण आहे. 
मुसलमानांच्या दृष्टीकोनातुन इथले बौद्ध, जैन, शिख, पारसी हे सर्व शत्रु म्हणजे काफीर होते. या सर्व समाजातील धर्माचा धागा जिवंत ठेवणारा जो "पुरोहितवर्ग" तो त्या काळातील आक्रमक मुसलमानांचा प्रमुख टार्गेट होता.
अर्थातच आजच्याप्रमाणेच त्याकाळीसुद्धा हिंदू धर्म हाच भारतातील प्रमुख आणि सर्वात मोठा धर्म होता, आणि हा धर्म टिकवून ठेवणारे, धर्माची व्यवस्थित माहिती असणारे लोक म्हणजे हिंदू धर्माचे पुरोहित अर्थात ब्राह्मणवर्ग. त्यामुळेच भारतातील मुसलमानी आक्रमकांच्या तलवारीच्या टोकावर सर्वप्रथम ब्राह्मण लोक होते हे ही याठिकाणी लक्षात घ्या, हिंदु धर्मामधे "धर्म" वाचवण्यासाठी आग्रेसर असलेला ब्राह्मणवर्ग असल्यामुळे या वर्गावर मुसलमान लोकांचा नेहमीच डोळा होता कारण धर्म टिकवून ठेवणार्‍या समाजाचे खच्चीकरण केले असता इतर लोकांचे खच्चिकरण व्हायला सोपे जाते हा मानसशास्त्राचा अगदी सुरवातीचा नियम आहे. थोडक्यात हिंदु धर्मियांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठीचे मुसलमानांकडून जे प्रयत्न होत होते त्यामध्ये मुसलमानांद्वारा गोमांसभक्षण व ब्राह्मण समाजाची बाटवाबाटवी त्याचप्रमाणे मंदीरांची लुटालूट , जाळपोळ व मंदिरे उध्वस्त करणे अशाप्रकारची निति होती. ब्राह्मणाला बाटवणे हे त्यांच्यासाठी एक मोठे धर्मकार्य होते, आणि अशातच एखादा ब्राह्मण बाटला तर अजूनच अवघड व्हायचे. तो ज्याचा कुलोपाध्याय-कुलगुरू-पुरोहित असे त्यांच्यासाठी साहजिकच हा एक मोठा आघात असायचा, शिवाय जास्त कोणाला शुद्धीकरण विधी माहिती नसल्याने अजूनच कुचंबणा होत असे, कारण त्या ब्राह्मणाला स्वधर्मात परत येण्याचे सर्वच दरवाजे बंद होत असत. 
अशा काळात जर एखादी व्यक्ती स्वतः त्या संकटांना सामोरे जाऊन रयतेचे रक्षण करत असेल आणि स्वतःला राज्याभिषेक करवून घेत असेल तर त्याला या ब्राह्मणांकडून विरोध होणे निव्वळ अशक्य आहे, किंबहुना राज्याभिषेक होण्याच्या अगोदरदेखील कायस्थांची व ब्राह्मणांची साथ महाराजांना नेहमीच लाभत होती, एखाद्या ब्राह्मणाने विश्वासघात करून स्वराज्य सोडले असे उदाहरण सापडत नाही. मोरोपंत पिंगळे, सोनोपंत डबीर, अण्णाजी दत्तो यासारख्या ब्राह्मणांनी स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी अक्षरशः जीव ओवाळून टाकला होता, सोनोपंत डबीर यांची तर महाराजांनी सुवर्णतुला केली होती, मग असे असताना, सर्व मान-मरातब आणि स्थैर्य मिळत असताना एखादा ब्राह्मण महाराजांना राज्याभिषेकासाठी विरोध करेल काय? 
तसेच इंग्लिश फ्याक्टरी रेकॉर्ड्समध्ये अशी कितीतरी बातमीपत्रे आहेत ज्यातून दिसून येते कि राज्याभिषेकाच्या आणि शिवरायांच्या सामान्य हालचालींची बातमी खुद्द सरकारकुनांनासुद्धा नसे मग इतर सामान्य जन किंवा एखादा ब्राह्मण यांची काय कथा? हेन्री ओक्झीन्डेन हा इंग्रज प्रतिनिधी रायगडावर असताना, राज्याभिषेक नक्की कोणाचा होणार, शिवरायांचा कि त्यांच्या पुत्राचा? हेसुद्धा त्याला नीट माहिती नव्हते तसेच सिंहासन तयार होत होते याचीसुद्धा बातमी कुठे नव्हती, मग एखाद्या सामान्य ब्राह्मणाला याची माहिती कुठून मिळणार? तसेच रायगडावर फक्त कामापुरतेच लोक जात असत व परत पाचाडला मुक्कामास येत. गडावर फक्त किल्लेकारी मंडळी व महाराज नसले तर संभाजी महाराज व सरकारकून एवढेच लोक असत. ब्राह्मण भिक्षुकांची त्यावेळी गडावर किंवा पाचाडास वस्ती नव्हती, तेथे जेवढे लोक राहत ते नोकरदार मंडळींचे कुटुंबीय असत. आणि हे कुटुंबीय किंवा नोकरदार खुद्द महाराजांच्या विरुद्ध बोलतील अशी परिस्थिती त्यावेळी मुळीच नव्हती. त्यामुळे ब्राह्मणांनी महाराजांना जमावाने विरोध करणे हे केवळ अशक्य होते. राज्याभिषेकावेळी हजारभर ब्राह्मण जमवण्यासाठी महाराजांना दुरदुरच्या प्रांतातील ब्राह्मणांना बोलवावे लागले म्हणजे सामान्य ब्राह्मणांची संख्यादेखील फारशी नव्हती असे दिसून येते, आणि सोबतच त्यावेळी ब्राह्मण मंडळी मुलकी नोकर्यांच्या मागे असल्याने महाराजांना शुद्र संबोधून त्यांचा विरोध करणे हे ब्राह्मणांच्या शक्तीबाहेरचे काम होते. आणि म्हणूनच याद्वारेसुद्धा, संयुक्तिक कारण देऊन 'ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला नसल्याचे' सिद्ध करता येते.
महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला असे सांगणाऱ्या लोकांकडून एक तर्क मांडला जातो,
"राज्याभिषेक होण्याअगोदर स्वतःकडे राजेपद नसल्याने शिवरायांना ब्राह्मण आरोपींना-गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्याचे अधिकार नव्हते, राज्याभिषेकानंतर मात्र हे अधिकार महाराजांना प्राप्त होतील व राजे आपल्याला शासन करतील हे ब्राह्मणांना माहिती होते, म्हणून ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला".
परंतु हा तर्क मांडणारयांना एक लक्षात येत नाही, महाराजांना हे अधिकार प्राप्त होण्यापूर्वी धर्मपीठाकडे हे अधिकार होतेच, त्यामुळे राजा नसला तरी तेथून मात्र गुन्हेगार ब्राह्मणांना शासन होतच होते, म्हणजेच राज्याभिषेक होण्यापूर्वी गुन्हेगार ब्राह्मणांना शासन होत नव्हते असे काही नाही. तसेच महाराजांना हे अधिकार प्राप्त झाल्यानंतरसुद्धा धर्मपीठाचे अधिकार संपुष्टात आले नाहीत, ते तसेच राहिले. म्हणजे धर्मपीठ चालवणारे ब्राह्मण महाराजांना विरोध करतील असे दिसत नाही. मग असा तर्क मांडणाऱ्या लोकांकडून हा तर्क कोणत्या आधारावर मांडला जातो?
महाराजांचे आदरस्थान राहिलेले समर्थ रामदास स्वामी यांनीदेखील कधी राज्याभिषेकाला विरोध केल्याचे दिसत नाही, ते स्वतः जरी उपस्थित नसले तरी त्यांचे शिष्य कल्याणस्वामी हे राज्याभिषेकाला उपस्थित होते, तसेच रामदासस्वामी हे महाराजांच्या मुंजीला उपस्थित असल्याची नोंददेखील मिळते . शिवरायांच्या काळात अनेक ब्राह्मण आणि त्यासोबत खुद्द महाराजांचे अष्टप्रधान यांच्यासाठीदेखील रामदास हे आदरस्थान होते असे दिसून येते. "श्रीमान योगी" आणि "जाणता राजा" या शब्दात वर्णन करणारे रामदास स्वामी राज्याभिषेकाला अनुकूल होते असेच दिसून येते, तुळजाभवानी देवीला उद्देशून ते म्हणतात, "तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता". यावरून त्यांना हिंदूंच्या सार्वभौम राजाची आस लागलेली दिसून येते. मग ब्राह्मण जातीतील एवढा मोठा सत्पुरुषदेखील जर राज्याभिषेकाला अनुकूल होता तर इतर सामान्य ब्राह्मणांनी विरोध करण्याचे काहीही कारण सापडत नाही. यामुळे ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला नसल्याचे दिसून येते. आणि म्हणूनच ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केल्याचा कोणताही पुरावा सापडत नाही. 
ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला असे सांगणार्यांकडून एका विदेशी साधनाचा पुरावा म्हणून वापर केला जातो ते साधन म्हणजे 'वेंगुर्ल्याच्या एका डच वखारकाराने १३ ऑक्टोबर १६७४ साली पाठवलेल्या पत्रातील चार ओळी'. हा वखारवाला लिहितो, 
"…त्यांनी (पुरोहितांनी) त्याला (शिवाजींना) क्षत्रियत्वाचे अधिकार दिले व त्या जातीत बसवण्याची सिद्धता केली, पण त्याने (शिवाजींनी) ब्राह्मणी संस्कार आपणास करावे अशी मागणी केली, त्या विद्वान लोकांनी हि गोष्ट मात्र पूर्णपणे नाकारली, पण त्यांच्यातील मुख्याने तोही संस्कार विधिवत पूर्ण केला…" (मूळ इंग्रजी, इथे मराठी भाषांतर).
यातील "विद्वान लोकांनी ब्राह्मणी संस्कार नाकारले" याचा अर्थ काहीजण क्षत्रियत्व नाकारले असा घेतात, पण महाराजांचे क्षत्रियत्व आधीच मान्य झाले आहे, हे सुरुवातीच्या वाक्यातून लक्षात येऊ शकते. पण मग हे 'ब्राह्मणी संस्कार' (मूळ - Brahman Rule) म्हणजे नेमके काय असा प्रश्न उपस्थित होतो, तर, हे ब्राह्मणी संस्कार म्हणजेच 'मुंज'. शिवकाळात प्रामुख्याने धर्मसंस्कार लोप पावले होते. त्यामुळे मुंज हि बहुतकरून ब्राह्मणाचीच होत असे, परंतु शास्त्रानुसार मुंजीचा अधिकार ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य या तिघांनादेखील होता. परदेशी लोकांना याची माहिती असणे पूर्णतः अशक्य असल्याने या डचाने त्याची नोंद 'Brahman Rule' अर्थात 'ब्राह्मणी संस्कार' अशी केली आहे.
पण यातही पुढे, ब्राह्मणांनी मुंजीला नकार का दिला? असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो, तर याचे कारण क्षत्रियत्व-शूद्रत्व हे नसून "वय (Age)" हे आहे, कारण महाराजांचे क्षत्रियत्व आधीच मान्य झाले होते हे या व्यापाऱ्याच्या सुरुवातीच्या नोंदीवरून दिसून येते, शास्त्रानुसार वयाच्या केवळ २१ व्या वर्षापर्यंतच मुंज करता येते, त्यानंतर नाही, मग तो ब्राह्मण असो कि क्षत्रिय, परंतु राज्याभिषेक होईपर्यंत म्हणजे वयाच्या ४४ व्या वर्षापर्यंत महाराजांची मुंज झालेली नव्हती आणि त्याकाळी ब्राह्मण कर्मठ असल्याने त्यांनी महाराजांच्या मुंजीला विरोध केला, परंतु गागाभट्ट या सुधारणावादी विद्वानाने त्यासाठी प्रायश्चित्त शोधून काढले आणि त्यांच्या पदामुळे इतर सर्व ब्राह्मणांनी ते मान्यदेखील केले, आणि यानंतर महाराजांची 'वेदोक्त' मंत्र म्हणून विधिवत मुंज करण्यात आली. या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, संभाजी महाराज किंवा राजाराम महाराज यांच्या मुंजीला मात्र विरोध करण्यात आल्याची नोंद या डच व्यक्तीने केलेली नाही कारण त्यांचे वय मुंजीसाठी अनुकूल होते.
म्हणजेच 'ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला नाही' असे परदेशी साधनाचा वापर करून सिद्ध करता येते.
वरील सर्व लेखाचा निष्कर्ष काढता, 'ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला' हा दावाच खोटा असल्याचे व असत्याच्या पायावर उभा असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा दावा कितीही रंजक वाटला तरी तो खोटा आहे हे बहुजन समाजाने समजून घ्यावे व त्यावरून ब्राह्मणद्वेष करण्याचेदेखील सोडून द्यावे, कारण ब्राह्मणद्वेष करून ना बहुजनांना फायदा आहे ना ब्राह्मणांना, फायदा फक्त खेडेकर-कोकाटे यांच्यासारख्या आपल्या भावनांशी खेळणाऱ्या मंडळींनाच होतो, आणि म्हणूनच इतर समाजसुधारकांनी याबद्दल जास्त बोलणे थांबवलेले असले तरी हे जातीयवादी लेखक मात्र आपल्या द्वेषाच्या पुस्तकातून, भाषणांतून, सभा - संमेलनांतून सतत हे मांडत असतात आणि द्वेष निर्माण करत असतात हे बहुजन समाजाने समजून घेतले पाहिजे व त्याला अनुसरून अशी पुस्तके वाचणे थांबवले पाहिजे, यातच त्यांची उन्नती आहे हे निश्चित.

टीप - 
मोरोपंत पेशवे यांनी राज्याभिषेकाला विरोध केला असे बर्याच जणांचे म्हणणे असते, परंतु यातदेखील काहीच तथ्य नाही, कारण तसा पुरावा-संदर्भ कोणत्याच ऐतिहासिक साधनात नाही, कोकाटे यांनी आपल्या ब्राह्मणद्वेषी पुस्तकातून हि अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याविषयी न बोलणेच जास्त चांगले आहे.
जातीदंभ केवळ स‌नातनी ब्राह्मणांत होता असे मानण्याचे काही कारण नाही. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी पंडितांची महासभा घेऊन स‌र्व मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करून घेतले. पण मग त्यांनाही ही जातिश्रेष्ठत्वाची बाधा झाली. स‌र्व मराठे क्षत्रिय आहेत हे या पंडितसभेत मान्य झाल्यानंतर ते स्वतःस सिसोदे राजे भोसले असे म्हणवून घेऊ लागले आणि ग्वाल्हेरचे शिंदे, अक्कलकोटचे भोसले आणि बडोद्याचे गायकवाड यांना कुणबी म्हणून कमी लेखू लागले. "अलीकडे कुणबी वगैरे पैकेकरी होऊन या ज्ञातीत फितुर करून बाटवितात. (सोयरिका करतात) हे जाहल्यास धर्म राहणार नाही... हिंदुस्थानात शिंदे वगैरे कुणबी लोक आहेत त्यास ताकीद जाली पाहिजे... गायकवाडाची सोयरिक करू तरी कासीत मात्रागमन केल्याचे पातक" अशी छत्रपती प्रतापसिंहांची स‌मजूत होती.

-    या लेखासाठी जी पुस्तके वाचली आहेत तसेच जे ब्लॉग शोधले, वाचले आहेत, त्या सर्व ठिकाणचे संदर्भ काही काही वेळा जसेच्या तसे घेतले आहेत. केवळ सत्य-राष्ट्र-धर्मप्रचारार्थ आणि दंभ-ढोंग-पाखंडाच्या धिक्कारासाठीच याचा वापर केला आहे, कोणत्याही फायद्यासाठी याचा वापर केलेला नाही. तसेच त्या सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार, ज्यांच्यामुळे हा लिहिण्यासाठी मदत झाली.

संदर्भ:
<< http://vighnharta.blogspot.in/2013/06/blog-post.html >>
<< Tanmay Deshpande >>

Friday, 24 April 2015

बहुजनांचा आधार परशुराम...!


परशुराम या विष्णुच्या सहाव्या अवताराबद्दल अनेक गैरसमज आणि आरोप विनाकारण समाजात जोपासले जात आहेत आणि काही समाजशांतीद्वेष्टे मुखंड याला वारंवार खतपाणी घालताना दिसत आहेत.
भगवान परशुराम हे ब्राह्मण ऋषी कुळात जन्माला आलेले थोर तपस्वी होत आणि त्यांनी क्षत्रियांचा संहार केला, त्यामुळे ते केवळ ब्राह्मण समाजाचेच देव व क्षत्रियांचे संहारक अशी त्यांची प्रतिमा काही भेदभाव पसरविणाऱ्या दुष्ट शक्ति वारंवार मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतात आणि दुर्दैवाने आपलेच काही बांधव या भ्रमास खरे मानून प्रत्यक्ष भगवंताच्या अवतारास जातीत बंदिस्त करू पाहतात. खरे म्हणजे वर्ण व्यवस्था हा एक पूर्ण वेगळाच विषय आहे. जात म्हणून जो काही प्रकार सध्या अस्तित्वात आहे, त्यापेक्षा वर्णव्यवस्था निश्चितच वेगळी व्यवस्था होती.
भगवान विष्णूंचे जे विविध अवतार झाले त्याच्या मुळाशी जात किंवा तथाकथित जातीभेद, उच्च नीच भेदभाव असे काही कारण नसून केवळ अधर्माचा नाश, धर्म स्थापना आणि भक्तांवर कृपा हीच कारणे दिसतात.
कूर्म किंवा मत्स्य अवतारात – मनुष्यरुपात अवतार घेण्याऐवजी कासव आणि मत्स्य रूप हे पृथ्वी वाचविण्यास उपकारक ठरले होते. याशिवाय वेगवेगळ्या असुरांना दिलेल्या वरदानामुळे त्यांचा नाश होईल अशा रुपात भगवंत अवतार घेतात. नृसिंह अवतारात तर प्रभू केवळ खांबातून प्रकट झाले, तेही न मनुष्य न प्राणी अशा रुपात. अवतारांचे मूळ कारण बघितल्यास या सगळ्या कथांमध्ये (कुणी खऱ्या मानो वा न मानो) कुठल्याही जातीचे वर्चस्व निर्माण करण्याचा उद्देश मात्र मुळीच नाही. कारण, परमेश्वरास भेद हा कसा मान्य असेल.? परमेश्वर सर्वव्यापी असून लीला म्हणून काही देह धारण करतो, त्याने त्याचे सर्वव्यापित्व बदलत नाही. त्यामुळे परशुराम म्हणजे केवळ ब्राह्मणांचे देव असे म्हणणे म्हणजे सनातन संस्कृतीबद्दल अज्ञानाचे लक्षण आहे.

परशुरामावर केले जाणारे काही प्रमुख आरोप म्हणजे:
१) परशुरामाने स्वतःच्या आईची हत्या केली.
२) परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. एकदा क्षत्रिय नष्ट झाल्यावर पुन्हा कुठून आले.?
३) परशुराम क्षत्रिय द्वेष्टा होता.
४) परशुराम पृथ्वीवरील पहिला आतंकवादी होता.
५) कर्ण क्षत्रिय होता म्हणून परशुरामाने त्याला शाप दिला.
याची सविस्तर कारणमीमांसा खाली केलेली आहे.
१) परशुरामाने स्वतःच्या आईची हत्या केली.
भारत अथवा जगात सर्वत्र पितृसत्ताक संस्कृती अधिक काळापासून अस्तित्वात आहे. घर, कुटुंब, समाज, राज्यव्यवस्था या सर्व ठिकाणी पुरुषसत्ता आजही अस्तित्वात असलेली दिसते. परशुरामाचा कालखंड तपासून बघितला तर त्याकाळी देखील पुरुषसत्ताक पद्धती अस्तित्वात होती.
परशुरामाने आई रेणुकेचे शीर कापले याची कथा अशा प्रकारे सांगितली जाते की, ऋषी जमदग्नी यज्ञ कार्यासाठी बसले असता त्यांनी रेणुकेला  यज्ञासाठी पाणी आणण्यासाठी नदीवर पाठवले. परंतु नदीत चित्ररथ गंधर्व आपल्या स्त्रीयांसह जलक्रीडा करत असताना रेणुका तिथे मोहित होऊन निश्चल झाली व पाणी जमदग्नी ऋषींना देण्याचे विसरली. झाला प्रकार ऋषी जमदग्नींनी जाणताच ते क्रोधीत झाले. (ज्यांना यावर आक्षेप असेल त्यांनी आपल्या पत्नींनी असे कृत्य केले तर काय केले असते याचे उत्तर द्यावे) रेणुका पुन्हा आश्रमात आल्यावर त्यांनी पाचही पुत्रांना रेणुकेचे शीर कापण्यास सांगितले. परंतु चार पुत्रांनी त्यांची अवज्ञा केली. त्यामुळे ऋषींनी त्यांना निश्चल केले. परशुरामाने पित्याची आज्ञा मान्य केली आणि आईचे शीर धडावेगळे केले. आज्ञा मान्य केल्याने जमदग्नी ऋषींनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा आई रेणुका पुन्हा जीवित व्हावी आणि चारही बंधू पुन्हा चल व्हावेत असे वर परशुरामाने मागितले.
आता या कथेत आक्षेपार्ह काय आहे.? पूर्वीच्या काळी पितृआज्ञा ही प्रमाण मानली जाई. पित्याने केलेली आज्ञा मग ती चांगली असो अथवा वाईट तिचे पालन केले जाई. हा पुरुषसत्ताक संस्कृतीचा प्रभाव असू शकतो. रामाने देखील पितृआज्ञेचे पालन केल्याचे दिसते. त्याकाळी स्त्रीची योनिशुचिता हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होता. स्त्रीने परपुरुषाकडे नजर वर करून पाहू नये असा दंडक होता. मग इथे तर रेणुका भ्रमामुळे केवळ त्या गंधर्वाच्या जलक्रीडा – प्रणयाराधणेकडे आकर्षित झाली होती, मोहित झाली होती. हा फार मोठा अपराध समजला गेला. (आजही जे यावर आक्षेप घेतील त्या तथाकथित बुद्धिवंत आणि विचारवंतांनी स्वतः आपआपल्या पत्नीसह दुसऱ्या पुरुषाची जलक्रीडा प्रणय क्रीडा खुशाल पहावी व काय वाटते ते समाजाला सांगावे.) आता मृत्युदंडच का या गोष्टीवर.? तर याचे उत्तर एकाच क्रोध. समाजात विविध स्वभावाची माणसे आपल्याला नेहमी दिसतात. काही माणसे छोट्याशा गोष्टीमुळे क्रोधाविष्ट होतात तर काही माणसे कितीही मोठी गोष्ट झाली तरी त्यांना अजिबात क्रोध येत नाही. जमदग्नी ऋषींची जन्मकथा पहिली तर त्यांच्या क्रोधाचे मुल त्यांच्या जन्मकथेत आहे. त्यामुळे परशुरामाला त्यांनी रेणुकेला मृत्युदंड देण्यास सांगितले.
परशुरामाने आज्ञापालन का केले, हे आधीच सांगितले आहे. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी ५ – ५० वर्षापुर्वीचा काळ  आठवावा, वडिलांची आज्ञा घरातील सर्व पाळतच होते. कारण पुरुषसत्ताक पद्धती आणि पुरुष हाच घरातील कर्ताधर्ता असायचा.
२) परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. एकदा क्षत्रिय नष्ट झाल्यावर पुन्हा कुठून आले.?
भगवान परशुरामांचा जन्म हरिश्चंद्रकालीन विश्वामित्र ऋषींच्या नंतरचा मानला जातो. याच काळी क्षत्रियांच्या शाखा दोन कुळात विभागल्या गेल्या. एक सुर्यवंश आणि दुसरा चंद्रवंश. चान्द्रवान्शियांचे राज्य संपूर्ण भारतभर पसरलेले होते. हैहय अर्जुन  हा चंद्रवंशी होता. यांना यदुवंशी या नावाने देखील ओळखले जाते. महिष्मती नरेश कार्तवीर्य अर्जुन याच वंशाचे वंशज होत. भृगु ऋषि या चंद्रवंशाचे राजगुरू होते. जमदग्नी राजगुरू परंपरेने कार्तवीर्य अर्जुनाच्या दरबारात कार्यरत होते. परंतु अनीतीला विरोध करण्याच्या कारणावरून कार्तवीर्य अर्जुन आणि जमदग्नी ऋषी या दोघात मतभेत झाले. परिणामस्वरुप जमदग्नी महिष्मति राज्य सोडून निघून गेले. यावर रुष्ट होऊन कार्तवीर्य अर्जुन बहाणा करून अचानक जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला. ऋषि जमदग्नी आणि पत्नी रेणुकेने त्याचा आदर सत्कार केला. परंतु स्वैराचारी अर्जुन युद्धाच्या उन्मादात होता. कार्तवीर्य अर्जुनाने ऋषींची कामधेनु गाय चोरून नेली, आश्रम नष्ट केला. यावेळी अनेक ब्राह्मणांनी कान्यकुब्ज प्रदेशाचा राजा गाधी याचा आश्रय घेतला. परशुराम जेव्हा यात्रेवरून परत आले तर आई रेनुकेने झालेला अन्याय परशुरामाला सांगितला. या घटनेमुळे परशुराम क्रोधीत होऊन त्याने प्रतिज्ञा केली की हैहय क्षत्रिय वंशाचा मी सर्वनाश करील. या उद्दिष्टासाठी परशुरामाने पुढील  सामरिक रणनीतीला अंजाम दिला. दोन वर्ष सतत परशुरामाने अशा सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राज्यांची यात्रा केली जे हैहय वंशीय राजांच्या विरुद्ध होते. वाणी चातुर्य आणि नेतृत्व दक्षतेमुळे अधिकाधिक चंद्रवंशी राजांनी आपले समर्थन परशुरामाला देऊ केले. आपल्या आपल्या सेना आणि शस्र्ते त्यांनी परशुरामाच्या सहय्यातार्थ दिले. तेव्हा या महायुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. यामध्ये परशुरामाला अवंतिका प्रदेशातील यादव, विदर्भाचे शर्यत यादव, पंचनद प्रदेशातील दृह यादव कान्यकुब्ज, कन्नौज येथील गाधीवंशीय, आर्यावर्त सम्राट सुदास सूर्यवंशी, गांगेय प्रदेशाचा काशिराज, गांधार नरेश मांधाता, अविस्थान – अफगाणिस्थान, मुजावत हिंदुकुश, मेरू पामीर, श्री – सिरीया, पराशुपूर  पारस फारस, सुसतर् -पंजक्षीर उत्तर कुरु –चीनी सुतुर्किस्तान- वल्क, आर्याण –र्इरान देवलोक बिहार तथा सप्तसिंधू प्रदेश, संथाल परगना ते बंगाल तथा आसाम पर्यंतच्या राजांनी परशुरामाचे नेतृत्व मान्य केले व या महायुद्धात सहभ घेतला. (हे सर्व क्षत्रिय होते). आणि उरलेल्या क्षत्रिय शाखा चेदि -चंदेरी नरेश, कौशिक यादव, रेवत तुर्वसु, अनूप, रोचमान यांनी कार्तवीर्य अर्जुनाच्या बाजूने युद्ध केले. या भीषण युद्ध कार्तवीर्य अर्जुन आणे त्याच्या कुळातील सर्व लोक मारले गेले. युद्धात अर्जुनाच्या बाजूने जे लढले त्यांचा समूळ नाश झाला. भारतवर्षातील हे एवढे मोठे युद्ध होते की परशुरामाने अहंकारी, उन्मत्त क्षत्रिय राजांचा विनाश करून लोहित क्षेत्र, अरुणाचल येथे ब्रहम्पुत्र नदी मध्ये आपला परशु धुतला. नंतर येथे पाच कुंड  बनवले गेले. जे आजही अस्तित्वात आहेत.
वाल्मिकींनी त्याला 'क्षात्रविमर्दन' न म्हणता 'राजविमर्दन' म्हटले आहे. यावरून असे स्पष्ट होते कि परशुरामाने सर्व क्षत्रियांचा संहार केला नाही तर केवळ अधर्मी क्षत्रियांचा सर्वनाश केला आहे. तसेच त्याने क्षत्रिय स्त्रियांना स्पर्श देखील केला नाही आणि ज्या स्त्रिया गर्भवती होत्या त्यांची संताने पुन्हा त्या वंशाचे प्रतिनिधित्व करू लागली.
कामधेनु चोरणे हा मुद्दा इतका मोठा अधर्म का ठरला आणि भगवान परशुराम क्रोधीत का झाले, याचाही विचार करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत गाय ही आई मानलेली आहे, केवळ एक प्राणी नव्हे मातेचा क्रय विक्रय होत नसतो. सहस्त्रार्जुनाने कामधेनु धनाच्या बदल्यात विकत घेण्याचा प्रयत्न आणि जमदग्नी ऋषींनी हे मानले नाही तर गायीचे हरण केले, गाय असहाय्य होती, दु:खी होती. तरीही केवळ सत्ताधारी असल्यामुळे आपण करतो ते योग्यच असे मानून अर्जुनाने हे कृत्य केले. (आजही सरकार काही गोष्टी संपादन करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला जनता विरोध करते). जे हिंदू बांधव गायीना कसायांना केवळ अर्थ लोभामुळे विकतात, त्यांनीही हा इतिहास विचारात घ्यावा. सहस्त्रार्जुन पुत्रांनी मदांध होऊन ऋषीहत्येचे पातक केले. हा मुद्दा पुन्हा एकदा सांगतो जातीचा नाहीये. सत्तेत मदांध झालेले अनेक क्रूर राजे होऊन गेले आणि आजही असे राज्यकर्ते आहेत. राजाने प्रजेचे रक्षण पिता ज्याप्रमाणे पुत्रांचे रक्षण करतो, त्याप्रमाणे करणे हे राजाचे कर्तव्य आहे. पण जर राजाच भक्षक बनला तर प्रजेने काय करावे.? ज्या राजाच्या विश्वासावर प्रजा आनंदाने निश्चिंत राहते, त्या राजानेच त्या असहाय्य प्रजेवर अन्याय सुरु केला, लूट सुरु केली तर प्रजेने प्रतिकार करावा की करू नये.?
आज आपल्याला भ्रष्टाचाराविरुद्ध जी चीड आहे, ती का आहे.? ती जातीवर अवलंबून आहे की अन्यायाविरुद्ध आहे.?
भगवान परशुराम क्रोधीत का झाले आणि त्यांनी अधार्मिकांचा संहार का केला – याचे उत्तर आजच्या आपल्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या रागातच आहे आणि शासन करूनही सुधारणार नाही अशा पातळीवर जेव्हा अधर्म सुरु होतो तेव्हा अधार्मिकाचा संहार करावा लागतो आणि ज्या पद्धतीने भगवान परशुरामांनी अधार्मिकांचा संहार केला ते पाहता असे दिसते त्याकाळी खूप राजे मदांध झाले आणि म्हणूनच विष्णूंचा अवतार झाला.
३) परशुराम क्षत्रिय द्वेष्टा होता.
भगवान परशुराम हे क्षत्रियांचे शत्रू होते, असा जो भ्रम पसरविला जातो, तो पूर्णपणे खोटा आहे. रामायणात असे उल्लेख आहेत की ज्यावरून सिद्ध होते, परशुराम हे राजा दशरथ आणि राजा जनक यांच्याकडे नेहमी जायचे.
ते पण नेहमीच परशुरामाचे आदरातिथ्य करायचे आणि भगवान त्यांना आशीर्वाद ही द्यायचे. याचे स्पष्ट उदाहरण सीतास्वयंवर आहे, ज्यात अनेक राजे होते. जर भगवान परशुरामांनी सर्व क्षत्रियांना मारले असते तर हे सगळे राजे तेव्हा आनंदाने राज्य कसे करत होते.? पण प्रभू त्याच्यावर प्रसन्न होते कारण ते धर्मपूर्वक राज्य करत होते आणि प्रभू रामचन्द्रांशी भेट होईपर्यंत परशुरामांचे अवतारकार्य सुरु होते. अर्थात अधार्मिकांविरुद्ध युद्ध सुरूच होते. तरीही धर्मपूर्वक राज्य करणारे राजे तेव्हा होतेच.
महाभारतातील उल्लेखाप्रमाणे राजर्षी होत्रवाहन जे अंबेचे आजोबा होते, ते भगवान परशुरामांचे प्रिय सखा होते आणि स्वतः भगवान त्यांना भेटायला गेले होते. अंबेचे दुक्ख पाहून भगवान परशुरामांनी अम्बेस न्याय मिळावा म्हणून आणि तिचे दुक्ख दूर व्हावे म्हणून भीष्मांशी युद्ध सुद्धा केले होते.
ह्या सगळ्यातून मला हेच समजले की, परमेश्वर नेहमीच अधर्माविरुद्ध लढण्यास अवतार घेतो आणि आपल्यालाही अन्याय, अत्याचार व अधर्म यांच्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. याच भगवंताने ब्राह्मणकुळात जन्म घेतलेल्या परंतु अधर्मी असलेल्या रावणाचा वध केला, याच परमेश्वराने महाभारतात कौरवांचा संहार करविला. त्यामुळे परमेश्वर अधर्माविरुद्ध आहे, जातीचे बंधन त्याला नाही. तसेच अन्याय सहन करणारी अहिंसा ही अन्याय आणि अधर्म वाढविणारी आहे. त्यामुळे अन्याय व अधर्माचा प्रतीकार केलाच पाहिजे.
४) परशुराम पृथ्वीवरील पहिला आतंकवादी होता.
परशुराम हा केवळ आणि केवळ आततायी व द्युष्ट दुराचारी क्षत्रियांचा विरोधक होता. तसेच परशुराम हा समाज सुधारणा आणि जनतेला रोजगारक्षम बनविणारा  नायक देखील आहे. केरळ, कच्छ, आणि कोकण क्षेत्रात परशुरामाने समुद्रात बुडालेली शेतीयोग्य जमीन शेती कसण्यासाठी पुन्हा तयार केली, आणि पशूंच्या सहाय्याने जंगलांना दूर करून जमिनीला शेती कसण्यायोग्य करवली. कार्तवीर्य अर्जुन व हैहय वंश विनाशानंतर परशुरामाने समाज सुधारणेसाठी कृषी प्रकल्पांचे कार्य केले. केरळ, कोकण, मलबार आणि कछ या ठिकाणाची अशी भूमी समुद्रातून बाहेर काढली जी कृषी साठी उपयुक्त ठरू शकते. या वेळी  कश्यप ऋषी आणि इंद्र समुद्री पाण्याला बाहेर काढण्याच्या तंत्रात निपुण होते.  परशुरामाने याच क्षेत्रामध्ये परशूच्या सहाय्याने रचनात्मक कार्य केले. शुद्र समजल्या जाणाऱ्या लोकांना त्याने वने कापण्याच्या कामासाठी जुंपले आणि सुपीक जमीन तयार करून धान्याची पैदावर केली. याच शूद्रांना परशुरामाने शिक्षित व दीक्षित केले व त्यांना ब्राह्मण करवले. (वर्ण व्यवस्था जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारलेली असल्याचे सत्य उदाहरण) तसेच त्यांना यज्ञोपवीत संस्काराने जोडले आणि त्याकाळी जे दुराचारी व आचरण हीन ब्राह्मण होते त्यांना शुद्र घोषित केले, त्यांचा सामाजिक बहिष्कार केला. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी हजारो युवक युवतींचा विवाह केला. परशुरामाच्या द्वारे अक्षय तृतीयेला सामुहिक विवाह केल्या जाण्याच्या कारणाने या दिवशी विना मुहूर्त पाहता विवाह करण्याची परंपरा आजही पाळली जाते.
परशुरामाचे अंत्योदयाचे प्रकल्प अनुकरणीय आणि अनोखे आहेत. ज्यांना रेखांकित करणे आवश्यक आहे. भगवान परशुराम यांचा काळ एवढा प्राचीन आहे कि त्याचे एकाएकी आकलन करणे अशक्य आहे.
५) कर्ण क्षत्रिय होता म्हणून परशुरामाने त्याला शाप दिला.
कर्ण आणि परशुराम यांची कथा महाभारतात येते. परशुरामाने केवळ ब्राह्मण युवकाला शस्त्र विद्या देण्याची प्रतिज्ञा केली होती. (भीष्म क्षत्रियाने  ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली म्हणून तो नपुंसक ठरत नाही) परंतु कर्णाने परशुरामाकडून ब्राह्मण असल्याचे खोटे सांगून विद्या ग्रहण केली. हे जेव्हा परशुरामाला समजले तेव्हा त्याने त्याला शाप दिला.
पूर्वीच्या काळी गुरु शिष्य यांतील नाते संबंध हे पारदर्शक असत. शिष्याने गुरुपासून कोणतीही गोष्ट लपवू नये असा सामाजिक संकेत असे. आजपासून १००-१५० वर्षापर्यंतही हा संकेत व्यवस्थित पाळला जात असे. गुरु पासून शिष्याने एखादी गोष्ट लपवली तर गुरु नाराज होई, क्रोधीत होत असे आणि शिक्षा करत असत. शाळेतील जुने दिवस आठवले तर यातील अर्थ कळेल. त्यामुळे कर्ण खोटे बोलला त्याची शिक्षा म्हणून परशुरामाने त्याला शाप दिला न कि तो ब्राह्मण नसल्याने दिला. त्यामुळे हा आरोप देखील निराधार आहे.

वरील घटनांवरून समजते की, परशुराम हा अन्यायाविरुद्ध लढणारा, गरीब जनतेला साहाय्य करणारा, कृषी संस्कृती व रोजगार संस्कृती वाढवणारा, आज्ञाधारक पुत्र, अधर्म संहारक असा युगपुरुष होता.
तो बहुजनांचा आधार होता शत्रू नव्हे. अपप्रचार करणाऱ्यांनी मेंदू असल्यासारखे बोलले, वागले, लिहिले तर चांगलेच. नाहीतर जनता जनार्दन  अशा नीच आणि ढोंगी, पाखंडी समाज कंटकांना त्यांचे थोबाड रंगवून त्यांची लायकी काय आहे ते दाखवल्याशिवाय  स्वस्थ नाही बसणार.
संदर्भ:
१. वाल्मिकी रामायण
२. व्यास कृत महाभारत
३. परशुराम - विजया जहागीरदार