Monday, 7 March 2016

राज्याभिषेक आणि क्षत्रीय...


पर्णालपर्वतग्रहणाख्यानाच्या चौथ्या अध्यायात "अत्यंत आनंदित झालेल्या पंधरा कवींनी आणि त्यांनी वाढवलेल्या ब्राह्मणांनी मोठ्या प्रेमाने गायलेली आपली कीर्ती सावकाशपणे ऐकत ऐकत महाराज (म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ) पालखीतून उतरले "असा उल्लेख येतो , बहुदा ही शिवस्तुती म्हणजेच अनुपुराण / शिवभारत असावे कारण कवींद्र परमानंद हे इसवी सन १६६४ साली गागाभटांना राजापूर येथे भेटल्याचा उल्लेख आहेच ,तसेच शिवभारतात शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना "जो राजगडचा अधिपती जो पृथ्वीवर राज्य करत आहे "असे शब्द वापरले आहेत. इथे शिवाजीमहाराजांना रायगडचा अधिपती म्हटलेले नाही ,तसेच पर्णालपर्वत ग्रहणाख्यान मध्ये १६७२चा प्रसंग रंगवताना शिवस्तुतीचा उल्लेख याला पूरक आणि योग्य ठरतो. थोडक्यात शिवभारत हे इसवी सनाच्या १६७४ पूर्वी रचले गेले असे म्हणावयास पुरावे मिळतात.
इसवी सन १६७४ लक्षात घेण्याचे कारण म्हणजे ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे , आणि यात ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला असा जावईशोध अनेक जणानी लावला ,आणि त्याचे कारण पृथ्वीवर क्षत्रिय नसल्याने ब्राह्मणांनी त्याला विरोध केला असे सांगितले जाते (अर्थात तसा कोणताही पुरावा आजपर्यंत उपलब्ध नाही ), आता शिवाभाराताची कालनिश्चिती ही १६७४ च्या पूर्वी आहे हे वर सांगितले आहे ,आता याच शिवभारताच्या ५ व्या अध्यायाच्या श्लोक संख्या ३४ पासून पुढे पृथ्वीमाता ब्रह्मदेवाला आपले गाऱ्हाणे सांगत असून यात पृथ्वीची तत्कालीन परिस्थिती मांडली आहे ,आता श्लोक ४० पासून ४३ मध्ये हे हृदयद्रावक वास्तव लिहिले आहे ,त्यात स्पष्ट उल्लेख आहे "क्षत्रिय लयास चालले आहेत ". आता काविन्द्रानी इथे चालू वर्तमान काळ वापरला असून ,क्षत्रियांची ताकद क्षीण होत चालली आहे असे म्हटले आहे ,अन्यथा त्यांनी क्षत्रिय पृथ्वीवर नाही असे म्हटले असते , परंतु तसे त्यांनी म्हटलेले नाही.
त्यामुळे या पुराव्यांवरून सहज सिध्द होते की , पृथ्वीवर क्षत्रिय नव्हते म्हणून ब्राह्मणांनी राज्याभिषेक करावयास विरोध केला या आरोपात तथ्य नसून ,तो निव्वळ जावईशोध असेच म्हणावे लागेल
शिवराम कार्लेकर ,पुणे
संदर्भ :- शिवभारत
पर्णालपर्वतग्रहणाख्यान

मनुस्मृती बद्दलचे वास्तव...


आजकाल हिंदू धर्माला आणि वैदिक संस्कृतीला मानणाऱ्या लोकांना मनुवादी म्हणायची Fashion आली आहे अशा महाभागांना काही साधे प्रश्न !!!!
१.मनुवादी मनुवादी म्हणून उर बडवून घेणार्यांनी मनु ब्राह्मण नव्हता तर क्षत्रिय होता हे आपणास माहित आहे काय??
२.खर तर जर्मनी सारख्या अनेक देशांनी त्यांची राज्यघटना तयार करताना मनुस्मृतीचा आधार घेतला आहे हे आपणास ठाऊक आहे काय???
३.संस्कृत ग्रंथ हे सूत्ररूपात असतात याचा अर्थ ती सूत्रे समजून देणारा लायक गुरु असला कि त्यांचा खरा अर्थ कळतो, हे महाभाग जी उदाहरणे देतात ती एकूण ग्रंथाच्या १% एवढीही नाहीत पूर्ण मनुस्मृती वाचली कि सहज कळते कि मनुने समाजाच्या प्रत्येक अंगाचा किती सूक्ष्म अभ्यास केला होता ....
आपण मनुस्मृती चा अभ्यास कोणत्या गुरूंकडे घेतलात ते सांगावे...आपण बाजारातली प्रत घेऊन वाचली असेल तर वर्तमानपत्रातले आरोग्य विषयक लेख वाचून एखाद्याने 'मी डॉक्टर आहे ' असे म्हणण्यासारखे आहे....
४.एकाच प्रकारची चूक जर ब्राह्मण आणि शूद्राने केली तर ब्राह्मणाला शुद्रापेक्षा शंभर पटीने अधिक कडक शिक्षा करावी असे सांगितलेले आपण वाचले नाही वाटते...
५.वयोवृद्ध शूद्राला राजाने तसेच ब्राह्मणांनी देखील सन्मान द्यावा असे देखील मनुस्मृतीच सांगते ....
६.मनुने सांगितलेले वर्ण हे जन्मानुरूप नव्हते तर कर्मानुरूप होते म्हणजे शुद्राच्या पोटी जर हुशार मुलगा जन्माला आला तर तो वेदांचे शिक्षण घेऊन ब्राह्मण होत असे तसेच कोणताही व्यक्ती धर्मकार्य करून ऋषी होत असे ..... महर्षी व्यास, वाल्मिकी ऋषी, आचार्य चरक, आचार्य सुश्रुत, आचार्य कान्कायान अशी शेकडो उदाहरणे याबाबत सांगता येतात जे जन्माने ब्राह्मण नव्हते पण त्यांना हिंदू धर्माने निसंकोच ऋषीपद दिले ज्यात कित्येक चांडाळ आदि कनिष्ठोत्तम कनिष्ठ वर्णाचे होते ....
आणि या महान ऋषीनी सांगितलेले महान तत्वज्ञान आज हिंदू संस्कृतीची ओळख आहे ज्यात ब्राह्मण हा शब्द फार अपवादाने येतो....
७.मनुस्मृती हि तत्कालीन शासन पद्धती आहे जिचा काळ शेकडो वर्षांपूर्वीचा आहे आता उन्हाळ्यातले कपडे हिवाळ्यात जसे चालत नाहीत तसेच एवढे जुने शासन आताच्या काळात फक्त संदर्भ म्हणून वापरा एवढेच काय ते अभ्यासकांचे म्हणणे आहे हर जरी कळले तरी पुरेसे आहे ....

"ढोंगी पुरोगामीत्व"

================================
सध्या आधुनिक म्हणवनार्या व्यक्तींकडून एक लोभस पोस्ट फिरवली जातेय. गणेशउत्सव हा एक "ब्राह्मणी कावा" आहे. ब्राह्मणांचे पोट भरावे, म्हणून हे सारे थाट
रचले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ह्या काव्याला बळी पडू नये.. आणि बरेच काही. ते त्यांच्या एकाकी आणि द्वेषी वृत्तीने विचार करतात आणि अविचारानांना आधुनिक विचारांच लेबल लावून त्याला "पुरोगामी" अस गोंडस नाव देतात, व ते अविचार बाजारात खपवायला निघतात. मनातला द्वेष, ब्राह्मणविरोधी वृत्ती ह्या गोष्टीमुळे कुठलाही विषय त्रयस्थ भूमिकेतून हातळणे त्यांना जमत नसावं किंवा असे विचार मांडून चारचौघात त्यांच्या तथाकथित ढोंगी आधुनिकतेची वाहवा होत असेल, म्हणून ते कुठलाही विषय "ब्राह्मण" ह्या विषया भोवती ओढून आणत असावे.
महाराष्ट्र हा तसा आधुनिक राज्यांच्या गणणेत येणारा आहे. ही आधुनिक मंडळी "३१ डिसेंबर, गटारी" हे सण म्हणजे लोकांचे 'सांविधानिक हक्क' असल्या सारखे बोंबलतात. ३१ डिसेंबर च्या पार्ट्यासाठी मद्य, मांसाहार ह्या गोष्टींसाठी हॉटेल, बार ह्यांना खास रात्री उशिरा पर्यंत सेवा देण्याची परवानगी मिळते. तेव्हा हे "31st" सारखे अर्थ नसलेले सण म्हणजे हॉटेल, बार मालकांचे पैसे कमवण्याचे धंदे असून, ते बंद व्हावेत अस म्हणणारा कोणी पुरोगामी माझ्या काही पाहण्यात नाही. वाढदिवसाला हॉटेलातली पार्टी, केक ह्या गोष्टी देखील "हॉटेली कावा" आहे, त्याला बळी पडू नये असे देखील कोणी पुरोगामी म्हणतांना कधी दिसला नाही. त्या वेळेस त्या खर्चापेक्षा त्यांचा आनंद अधिक मोलाचा ह्यांना वाटतो, मग आमच्या उत्सवातल्या आनंदाच, उत्सवाच, आमच्या पवित्र भावनांच काय ? ते ब्राह्मणी कावे कसे ठरतात ?
दुसरी बाजू म्हणजे, कुठल्याही पुरोहिताकडून गणपती बसवायलाच हवा अस काही बंधन नाही, किंवा गणपती न बसवल्यास फाशी, जन्मठेप आहे असा देखील फतवा काढण्याची हुकुमी पद्धत आमच्या धर्मात नाही. गणपती आणून प्राणप्रतिष्ठापनेचा विधी न करताच, त्याला आपल मानून पूजन करणारे देखील अनेक आहेत. आम्हाला गणपती बसवायला वेळ नाही, सवड नाही किंवा ते पटत नाही अस म्हणर्याना संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग तरी देखील हा ब्राह्माणांचा पोट भरण्यासाठीचा बामणी कावा कसा ठरतो ?
मूळत: कोण, कश्यामुळे कमावतो हा प्रश्नच उत्सवांच्या बाबतीत उपस्थित करणच चुकीच आहे. कुठलाही उत्सव, सण हा सगळ्यांनी एक यावं, एकामेकाची दुखे-सुखे वाटून घ्यावीत, आनंद, जल्लोष साजरा करावा ह्याच उद्देशाने केला जातो. कोण कसा कमवतोय ह्या पेक्षा त्या सणातून लोक किती आनंद घेताय, एक होताय वा जल्लोष साजरा करताय ह्याचा विचार प्रथमता प्राधान्य देणारा ठरतो. ती गोष्ट गणेश उत्सवाच्या बाबतीत अगदी चोख घडतेय. लोक अगदी आनंदात गणेशाच्या मूर्ती च स्वागत करतात. जेवायला सुद्धा एकत्र न बसणारा परीवार, सकाळ-संध्याकाळ ची आरती, प्रसाद अगदी आनंदाने एकत्र येवून करतो. दूरदूरचे राहणारे मित्र, भाऊ एकत्र येतात, दहा दिवसासाठी का होईना पण एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद घेतात. इकडे मंडळे आपला पाहुणा म्हणून दिवस रात्र कष्ट घेवून साऱ्या गोष्टीच नियोजन करतात. सार जस व्हावं तसच..
पण प्रकृतीचा हा नियमच आहे, जिथे योग्य, खर असत तिथे खोटेपणा, अयोग्यता असतेच. ह्या उत्सवाला सुद्धा काळिमा लागलेलीच आहे. काही मंडळातले जुगार, मद्य हे प्रकार बर्याच ठिकाणी दिसतात. जे सर्वार्थाने चुकीचेच आहेत. पण तो कलंक काही फक्त गणेश उत्सवावरचाच नाही. तो गैरप्रकार होवू नये, शिवाय पर्यावरणाला धरूनच आपल्या बेताने आणि मताने गणेश उत्सव व्हायला हवेत. पण ह्याला कावे वगेरे म्हणणार्यांनी त्यांच्या द्वेष्ट्या वृत्तीला आवर घालावा. कोण खर आणि कोण भंपक हे समजण्या इतकी सर्व महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे..
गणपती बाप्पा मोरया !!

संभाजी ब्रिगेडला काही प्रश्न...


१)ब्राह्मणांनी इतिहास plan करून रामदास
आणि कोंडदेव या ब्राह्मणांना घुसडले.....त्यांनी खोटा इतिहास लिहिला.....मानुया मग जे ब्राह्मण
इतके हीन कृत्य करू शकतात त्याच
ब्राह्मणांनी लिहिलेल्या शिवचरित्रावर तुमचा विश्वास
कसा????छत्रपती शिवाजी नावाचे थोर
राजे महाराष्ट्रात झाले हा इतिहास ब्राह्मणांनीच
लिहिला....कारण तेंवा खेडेकर गायकवाड तर नवतेच आणि त्यांचे
पूर्वज ब्राह्मणांच्या अन्यायाखाली दबून गेले
होते....मग हा पण इतिहास खोटा मानायचा का????
२)तुम्ही जी मराठी भाषा (प्राकृत
भाषा)
मानता ती मराठी भाषा सुद्धासंस्कृत
या ब्राह्मणांच्या भाषेपासून तयार झाली आहे....हे
तुम्हाला कसे काय चालते???
३)तुम्ही मुसलमानांना ब्राह्मणांपेक्षा चांगले
म्हणता....ते तुमचे मूलनिवासी बंधूआहेत असे
म्हणता मग किती मुस्लिमांनी शिवधर्म
स्वीकारला?????
४)तुम्हाला दासबोध या ग्रंथात अध्यात्माचा प्रसार केला म्हणून
तो ग्रंथ जाळायचा आहे मग संतश्रेष्ठ
तुकारामांनी त्यांच्या अभंगात
भौतीक्वादाचा पुरस्कार केला आहे का??
५)अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता त्याने
राजांवर हल्ला केला व राजांनी त्याला मारले म्हणून
आखी ब्राह्मण जात दोषी मग याच
न्यायाने अफजल खानच्या सैन्यात असलेल्या ८०%
मराठा सैन्याबद्दलकाय??
६)रामदास हे फितूर होते ते आदिल्शाहाचे हेर होते कारण ते
जावळी या मोरे यांच्या प्रांतात राहायचे.......फितूर,हेर
हे स्वतःच्या भागात राहत असतात का? हा साधा नियम तुम्हाला कळत
नाही का????
७)रामदास स्वामी हेर असते तर
त्यांना राजांनी सज्जन गडावर वास्तव्य कसे काय
करू दिले असते???का राजांना ते हेर होते हे कळलेच
नाही????
८)बाजीराव
हा धनाजी आणि बाळाजी भटाच्या बायकोचा मुलगा असा इतिहास
मा मो देशमुख सांगतात......यात नेमकी कोणाचे
अवमूल्यन होत आहे?????आपल्या कारकुनाच्या बायकोबरोबर संग
करणारे धनाजी असा इतिहास लिहून
तुम्ही त्यांचेच अवमूल्यन करत आहात.......
९)तुकाराम स्वामींना ब्राह्मणांनी मारले
मग हे १० कोसावर राहणाऱ्या शिवाजी महाराजांना कसे
कळले नाही?????
१०)आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम
घ्यावा हा अभंग त्यांनी आधीच
कसा काय लिहून ठेवला......त्यांना स्वप्न पडले होते का????
कि आता आपला खून होणार आहे.....
.
११)सावरकर
यांनी माफीनामा लिहिलाम्हणून ते
देशद्रोही.....मग असे हजार
माफीनामे लिहिणारे गांधी नेहरू
देशप्रेमी कसे काय???१९४२
साली आम्ही ब्रिटिशाना पाठींबा देऊ
असे लिहून दिल्यामुळेच सर्व पुढारी सुटले
त्याबद्दल काय????
१२)बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्यात सावरकरांच्या धाकट्या बंधूनी मदत केली आहे....हे
तुम्हाला मान्य आहे का?
१३)शिवधर्मात पत्रिका बघून मुहूर्तावर लग्न लावले जाते का????
१४)शिवाजी महाराज हे
कुणबी मराठा होते त्यामुळे त्यांना ९६
कुली मराठ्यांचा विरोध
होता.....त्या वेळी निराजी पंतानी शिवाजी महाराज
क्षत्रिय होते हे सिद्ध केले......मग
शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी विरोध
केला असे म्हणता येईल का?
१५)सध्या किती लोक
शिवधर्मी आहेत???जे २
कोटी शिवधर्मी होणार होते त्यांचे काय
झाले?
१६)ब्राह्मण हे युरेनेशिअन आहेत ते उपरे आहेत.....मग
सावरकरांनी ने मजसी ने.....
हि कविता काय उत्तर ध्रुवावरच्या बर्फाळ डोंगरांना उद्देशून
लिहिली होती का?????
१७)आंबेडकर यांच्या मते आर्य हे भारतीयाच
आहेत........मग तुम्ही त्यांचे ऐकणार
का खेडेकरचे???
१८) ब्राह्मण मागासलेले असतात...त्यांचे विचार पुढारलेले
नसतात.......मग सावरकर, जयप्रकाश नारायण, नाना गोरे, एस एम
जोशी, आगरकर,पु.ल देशपांडे यांच्या लिखाणाबद्दल
काय?????किंवा हल्लीचे अनिस चे दाभोळकर,अच्युत
गोडबोले, नारळीकर हे काय मागासलेले विचार मांडतात
का?
१९)चार्वाक हे सुधा ऋषी होते म्हणजेच ब्राह्मण
होते....मग तुम्हाला त्यांचे विचार कसे चालतात???
२०)पेशव्यांनी शिवाजी महाराजांचे राज्य
बुडवले असा तुमचा आरोप आहे.........मग पेशवे राज्य बुडवत
असताना छत्रपतींचे वंशज डोळ्यावर
पट्टी लाऊन बसले होते का????
त्यांनी पेशव्यांना पदच्युत का केले
नाही?????
२१)तुकारामांच्या ज्ञानियांचा राजा....या ज्ञानेश्वरांवरच्या अभंगाबद्दल काय???
२२)संभाजी राजाना मनुस्मृतीप्रमाने
ब्राह्मणांनी मारले.....कारण ते संस्कृत
शिकले......पण त्यांना संस्कृत शिकवणारे व त्यांच्याबरोबर तेवढेच
हाल हाल होऊन मारणारे कवी कलश हे ब्राह्मणच
होते आता कवी कलशांची जात
बदलायची का????
२३)कोकाटे
सावरकरांना त्यांनी बोटीच्या port hole
मधून उडी मारली म्हणून
संडासवीर म्हणतात......पण कोकाटे साहेब
उडी कशातून मारली या पेक्षा कुठे
मारली हे महत्वाचे
असते.........तुम्ही मारून
दाखवता का आम्हाला मोर्सेलीस च्या खार्या पाण्यात
उडी????
बिनडोक ब्रिगेडि

'ब्राह्मणांनाच शिव्या का ?'

'ब्राह्मणांनाच शिव्या का ?'
(आवडले म्हणून, मिळाले तसे पाठवले)
एका जुन्या जाणत्या मराठा व्यक्तीचे ब्राह्मणांविषयीचे स्पष्ट विचार. खालील लेख दैनिक हिंदुस्थान, अमरावती मध्ये सोमवार दिनांक २५.०५.२००९ (पृष्ठ ११) या दिवशी, "ब्राह्मणांनाच शिव्या का" या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला होता. लेख लिहिणा-या व्यक्तीचे नाव आहे - श्री. साहेबराव घोगरे, माजी सचिव - अमरावती जिल्हा व मराठा महासंघ, अमरावती. (लेखक मराठा असून त्यांचे वय पासष्टीच्या पुढचे आहे (६५+), म्हणजेच कदाचित हा लेख वाचणा-या सर्वांपेक्षा त्यांनी चार पावसाळे जास्त पाहीले आहेत, तेव्हा ब्रिगेडी लोकांनी ऊगाचच त्रागा करून त्यांना शिवीगाळ करू नये, कारण आपल्या सर्वांपेक्षा विचारांनी आणि वयाने ते जेष्ठ आहेत.)
"ब्राह्मणांनाच शिव्या का ?"
आजकाल काही विशिष्ट समाजाची, संघटनांची, साहित्य परिषदेची, साहित्य संमेलनांची सुरुवात ब्राह्मण समाजावर टीका करूनच नव्हे तर त्यांना शिव्या देऊन होते. या अशा लोकांची ब्राह्मणांना शिव्या देण्याची जणू काही फॅशन (Fashion) झाली आहे. हि अत्यंत दुर्दैवी बाब तर आहेच शिवाय घृणास्पद कृत्यही आहे. फुटीचे विषय पसरविणारे काही विशिष्ट पुढारी या महाराष्ट्रात व देशात हि द्वेषपेरणी सतत करीत असतात. ब्राह्मणांनी दलितांना त्रास दिला, त्यांनी मराठ्यांचा, शिवाजी महाराजांचा इतिहास बदलून टाकला वगैरे नेहेमीचे ताशेरे देणेच सुरूच असते. आमचा मराठा समाज तर आजकाल याचे भांडवल करत असतो. मराठा समाजाला ब्राह्मण समाजापासून काही त्रास झाला हि गोष्ट मी माझ्या सदुसष्ट (६७) वर्षांच्या काळात पहिली नाही.
शिवाजी महाराजांच्याजवळ कोणताही जातीभेद, धर्मभेद नव्हता हि गोष्ट सर्वश्रूत आहे. त्यांचे दरबारी ब्राह्मणांचे विशिष्ट स्थान होते, आदर होता. आज ब्राह्मणविरोधी लोक त्यांना बदनाम करण्यासाठी इतिहास बदलू पाहत आहेत. जेथे ब्राह्मणांच नाव आलं तो इतिहास खोटा अशी भ्रामक कल्पना जनतेमध्ये निर्माण करीत आहेत. ब्राह्मण इतिहासकारांकडून कदाचित एखादी चूक झाली असेलही त्याचा एवढा बाऊ कशाला? त्यापेक्षा या देशातील देवदेवतांच्या मूर्ती, देवळं, मूल्यवान शिल्प याची कोणी तोडफोड केली, कोहिनूर हिरा कोण घेऊन पळाला याची चर्चा का होत नाही ?
आजच्या मराठी साहित्यिकांनी तर प्राचीन व दर्जेदार साहित्यावर टिकेच झोड उठवून उच्छाद मांडला आहे. साहित्य हि मनाला आनंद देणारी कलाकृती असते. त्याची विशिष्ट भाषाशैली असते. ती मनाला विलक्षण सुखावून सोडते. पण ते साहित्य आजच्या लेखकांना नको आहे. केवळ उपाशी पोट आणि दलित हे दोनच शब्द त्यांच्या साहित्याची देन आहे.
आज या लोकांना सावरकर, पु.ल., कुसुमाग्रज, करंदीकर, खांडेकर आठवत नाहीत. त्यांची प्रतिभाही कळत नाही. आज उपाशी पोटाचा आणि काही विशिष्ट जमातीवर कथित अत्याचाराचा खोटा डंका वाजवणारे नवलेखक जन्माला येत आहेत.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळातील दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास यांचेवर अनेक टीकाकारांची झोड असते. त्यांचे मतानुसार एकवेळ दादोजी आणि रामदास महाराजांचे गुरु नसले तरी दादोजींनी काही कोणावर अत्याचार केले नाहीत. कुणाला दगाफटकाहि केला नाही. रामदासाचा दासबोध पचविण्याचे सामर्थ्य आजच्या अनेकात नाही. त्यामुळे ते तसे बोलणारच.
या उलट महाराजांना दगाफटका करणारा अफझलखान, दोनदा जीवदान दिल्यानंतरही पृथ्वीराज चव्हाणास धोका करून मारणारा महंमद घोरी मात्र यांना आठवत नाही. स्वातंत्र्याचा संग्राम असो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद असो, ब्राह्मण पुढारीच यात अग्रेसर होते. नुसते अग्रेसर नाही तर त्यांनी काळेपाणी भोगले, ते फासावर गेले. टिळक, सावरकरांच्या त्यागाला तर सीमा नाही. कलेक्टर जॅक्सन (Jackson) ची हत्या करून सतराव्या वर्षी फाशीवर जाणारा अनंत कान्हेरे, कर्नल रँड (Rand) ची हत्या करणारे चाफेकर बंधूही हसत हसत फासावर लटकले. कोण होते ते ? संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणपणाने लढणारे सेनापती बापट, नानासाहेब गोरे, एस.एम., आचार्य अत्रे, दंडवते, अहिल्या रांगणेकर, गोदावरी परुळेकर आणि असंख्य ब्राह्मणच होते. दिग्गज कामगार नेते, दिग्गज साहित्यिक, दिग्गज पत्रकार, वक्ता दशसहस्त्रेषु सारखे शेवाळकर कोण होते व आहेत? पण यासारख्या देशभक्त व देशाची संस्कृती जपणा-या लोकांवरच टीका होते हे बरे नाही. ब्राह्मणांमध्ये एकाच दोष असला तर हाच कि ते आपल्या समाजात अधिक मिसळतात. गुणांची मात्र ते खाण आहेत, त्यांच्यापासून कोणालाही तोटा नाही.
१) ब्राह्मणाला कितीही शिव्या घाला, तुमच्यावर अट्रोसिटी (Atrocity) दाखल होत नाही.
२) त्यांच्यामुळे कुणाच्याही शिक्षणातील, नोकरीतील रिझर्वेशनवर परिणाम होत नाही.
३) ब्राह्मण कुटुंबात स्त्रियांच्यावर अत्याचार होत नाहीत. त्यांच्या बायका जाळून मरत नाहीत. घटस्फोट होत नाहीत.
४) ते देशी दारू पिवून धिंगाणा घालत नाहीत.
५) चोरी, दरोडा, हत्या, लुटमार, चेन स्नाचिंग (Chain Snatching), मारपीट यामध्ये जोशी, कुलकर्णी, देशपांडे यांची नावे नसतात.
६) बोलण्यात सभ्यता व सुसंस्कृतपणा आहे.
७) कार्यालयीन कामकाजात इतरांपेक्षा तरबेज आहेत. नियमांचे ज्ञान इतरांपेक्षा अधिक असून बर्याच प्रमाणात कामात प्रामाणिक आहेत. याचे एक जिवंत उदाहरण माझ्यासमोर आहे. आमचे क्लास वन अधिकारी खूप मराठा धार्जिणे होते. त्यांचा ब्राह्मण कर्मचा-यांवर राग असायचा. परंतु ते त्यांच्या मागे कबुल करायचे कि खरोखर ब्राह्मण कर्मचारीच कामाचे आहेत. त्यांना भरल्या ताटावरून हाक मारली तरी कार्यालयात धावत येतात. आपले पाटील, देशमुख उगीच ठसन दाखवतात. याची परीक्षाही त्यांनी बरेचदा घेतली. तेव्हाचे ब्राह्मण कर्मचारी कसोटीत पास झाले.
८) ते इतरांसारखे आक्रमक कधीच होत नाहीत.
९) त्यांच्या सभासंमेलनात त्यांच्या उन्नतीवर चर्चा होते. दुसरा काय बोलतो काय करतो याच्या भानगडीत ते सहसा पडत नाहीत.
१०) मराठा समाजासारखी एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असत नाही.
११) काटकसरीने व्यवस्थित कुटुंब चालवण्याचा आदर्श त्यांच्याकडून घ्यावा.
१२) रसिकत्त्वाचे ते खरे धनी आहेत.
यानंतरही जर त्यांना आपण शिव्या देत असू तर त्याला करंटेपणच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य आहे असे म्हणतात. मुख्यमंत्रीही येथे मराठा समाजाचेच जास्त झाले. परंतु शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या येथे मागे राहिला तो मराठा समाजच. तथाकथित मराठा नेते मात्र आपल्या सोयीनुसार मराठा शब्दाचा अर्थ मराठी माणूस असा घेतात. परंतु जेव्हा आपल्या समाजाची उन्नती करायची असते तेव्हा, जातीची तरफदारी केलीच पाहिजे. त्यात वावगं काहीच नाही.

छत्रपति शिवाजी महाराजके जीवनमें ब्राह्मणोंका स्थान !


‘कुछ वर्ष पूर्व जेम्स लेन नामक विदेशी लेखकद्वारा छत्रपति शिवाजी महाराजकी जीवनीपर एक आपत्तिजनक पुस्तक लिखा गया । इस पुस्तकके कारण कलह निर्माण हुआ एवं ब्राह्मण समाजको आलोचनाका लक्ष्य बनाया गया । कुछ समय पूर्व ही पुणेमें जात्यंध मराठा संगठनोंने ब्राह्मणद्वेषकी सीमाओंको लांघकर लाल महलके दादोजी कोंडदेवकी प्रतिमा मध्यरात्रिमें हटानेका दुष्कृत्य किया ।
‘छत्रपति शिवाजी महाराजके जीवनमें ब्राह्मणोंका स्थान क्या था’, इस बातको यदि ऐतिहासिक प्रमाणोंके आधारपर देखा जाए, तो ‘छत्रपति शिवाजी महाराजके नामका उपयोग कर ब्राह्मण-ब्राह्मणेतर विवादमें वृद्धि करना’, यह बात ‘शिवाजी महाराजका क्रूर परिहास है’, यह ध्यानमें आएगा ! इस सूत्रके समर्थनार्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषद’की ओरसे प्रकाशित ‘समाज जागृति पुस्तिका’से चुना हुआ लेखन आगे प्रस्तुत किया है । भूतकालमें नहीं थी, इतनी हिंदु एकात्मताकी आवश्यकता वर्तमानमें निर्माण हुई है; अतः ऐसे समयमें हिंदुओंको विभिन्न जनजातियोंमें विभाजित करना उचित नहीं होगा, इसलिए यह लेख प्रसिद्ध कर रहे हैं ।
५ अ. छत्रपतिके जीवनकालमें उनके गुणोंका वर्णन करनेवाले पहले तीन कवि ब्राह्मण ही थे !
अ. ‘छत्रपति शिवाजी महाराजके जीवनकालमें उनके गुणोंका मुक्तकंठसे गान करनेवाले पहले कवि अर्थात समर्थ रामदासस्वामी ब्राह्मण थे । उस समय उनकेद्वारा किया वर्णन देखें –
‘यशवंत, कीर्र्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ।।
आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळाठायी ।।
या भूमंडलाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हाकारणे ।।
पूरे भारतमें भ्रमण करनेवाले समर्थ रामदासस्वामीको छत्रपति शिवाजी महाराज जैसा महान व्यक्ति नहीं मिला, यह बात महत्त्वपूर्ण है । छत्रपतिके मृत्युके पश्चात संभाजी महाराजको लिखे गए एक पत्रमें समर्थ रामदास स्वामीने ‘शिवरायाचे आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा प्रताप’, यही उपदेश किया ।
आ. छत्रपतिके जीवनकालमें उनके गुणोंका वर्णन करनेवाले कवि भूषण भी ब्राह्मण थे ।
इ. छत्रपतिकी सूचनानुसार संस्कृत भाषामें ‘शिवभारत’ नामक शिवचरित्र लिखनेवाले कवि परमानंद नेवासकर भी ब्राह्मण थे । इससे स्पष्ट होता है कि, महाराजके जीवनकालमें उनकी जीवनगाथा लिखनेवाले एवं महानता गानेवाले तीनों भी महत्त्वपूर्ण कवि ब्राह्मण थे ।
५ अ १. छत्रपति शिवाजी महाराजके साथ प्रखर एकनिष्ठा रखनेवाले ब्राह्मण!
१. छत्रपति शिवाजी महाराजका आग्रासे छुटकारा होते ही डबीर एवं कोरडे नामक महाराजके दो निष्ठावंत सेवकोंको औरंगजेबकी सेनाने बंदी बनाया । वास्तविक इन दोनोंने ही संभाजी महाराजको मथुरामें छिपाकर रखा था; परंतु उन्होंने यह बात अंततक औरंगजेबको नहीं बताई । अपितु लगभग दो माहतक औरंगजेबके कारागृहमें वे प्रतिदिन कोडेका प्रहार सहते रहे ।
२. ब्राह्मण व्यक्ति विश्वासू एवं एकनिष्ठ होते हैं, इस बातसे छत्रपति शिवाजी महाराज भलीभांति ज्ञात थे । सिंधुदुर्ग किलेमें छत्रपति शिवाजी महाराजद्वारा रखे गए जानंभट अभ्यंकर तथा दादंभट अभ्यंकरने मरते दमतक सिंधुदुर्ग किला नहीं छोडा था । छत्रपति शिवाजी महाराजके मृत्युके पश्चात औरंगजेबने सिंधुदुर्ग किला सर किया , उस समय ये दोनो भाई किलेमें मारे गए । ‘हम सिंधुदुर्ग छोडकर कहीं भी नहीं जाएंगे’, छत्रपति शिवाजी महाराजको दिए इस वचनका उन्होंने अंततक पालन किया ।
५ अ २. छत्रपति शिवाजी महाराजके जीवनकालकी संवेदनशील एवं अत्यंत महत्त्वपूर्ण घटनाओंके साक्षीदार भी ब्राह्मण ही !
१. छत्रपति शिवाजी महाराजको कोंडाणा किला जीतकर देनेवाले बापूजी देशपांडे ब्राह्मण थे ।
२. पुरंदर किलेपर फत्तेखानके साथ लडते हुए छत्रपति शिवाजी महाराजकी अत्यंत महत्त्वपूर्ण सहायता करनेवाले किलेदार निलकंठ सरनाईक भी ब्राह्मण थे ।
३. महाराजके गुप्तचर विभागके पहले प्रमुख गुप्तचर नानाजी देशपांडे ब्राह्मण थे । आगे इस स्थानपर बहिर्जी नाईक आएं ।
४. त्र्यंबकेश्वरके वेदमुर्ति ढेरगेशास्त्री महाराजके क्षेम हेतु भगवान शिवजीके पास अनुष्ठान करते थे ।
५. लालमहलपर छत्रपति शिवाजी महाराजद्वारा मारे गए छापेके समय जिस साहसिक चढाईकी रचना की गई थी, उसके प्रमुख चिमाजी देशपांडे ब्राह्मण थे ।
६. चिमाजीके पिता लाल महलमें जिजाबाईके यहां अनेक वर्ष सेवामें थे; इसलिए उन्हें लाल महलकी रचनाका सब ज्ञान था; जिस कारण इस चढाईका नेतृत्व उनके हाथमें था ।
७. अफझलखानको मिलने हेतु जाते समय छत्रपति शिवाजी महाराजने गाय एवं ब्राह्मणका पूजन करनेकी ऐतिहासिक जानकारी उपलब्ध है । यह विधी कथन करनेवाले प्रभाकर भट्ट महाराजके राजोपाध्ये थे ।’
छत्रपति शिवाजी महाराजका ब्राह्मणोंके प्रति उत्कट आदरभाव एवं स्पष्टक्तता !
१. ‘छत्रपति शिवाजी महाराजने मसजिदोंको अग्रहार (इनाम) प्रदान करनेके ४-५ पत्र उपलब्ध हैं । केवल इन पत्रोंके आधारपर महाराज सर्वधर्मसमभावी हैं, यह बात निश्चित करनेकी उतावली की जाती है; परंतु ब्राह्मणोंको अग्रहार प्रदान करनेके ८२ पत्र उपलब्ध हैं, तो उसके आधारपर ऐसा ही निष्कर्ष क्यों नहीं निकाला जाता ?
२. ८.९.१६७१ को तुकाराम सुभेदारको लिखे पत्रमें छत्रपति शिवाजी महाराजने लिखते हैं , ‘बापूजी नलावडेने कलह कर तलवार निकाली एवं अंतमें अपने ही पेटमें छुरा घुसेडकर जान दी । यह घटना हो चुकी । मराठा होकर ब्राह्मणपर तलवार ऊठाई । उसका परिणाम उसे प्राप्त हुआ ।’ इस पत्रमें छत्रपतिका ब्राह्मणोंके प्रति विद्यमान आदर तो सामने आता ही है, साथ ही समस्त सरदारोंको महाराजके इस स्वभावका ज्ञान होनेके कारण महाराजका कितना आदरयुक्त भय था, यह नलवडे प्रकरणसे ज्ञात होता है । अनेक सरदारोंमेंसे बापूजी नलवडे नामक मराठा सरदारने एक ब्राह्मणपर तलवारसे वार किया, किंतु उसके उपरांत उसे यह भय लगा कि, ‘महाराजको यह बात ज्ञात होनेपर महाराज हमें कठोर शासन करेंगे ।’ इस भयके कारण उसने अपने पेटमें छुरा घुसेडकर आत्महत्या की । राजनेताओंका इस प्रकारका धाक प्रजाजनोंपर होना चाहिए ।
३. लगभग ८-१० पत्रोंमें, ‘किसी विशिष्ट नियमका पालन हों’, इसलिए महाराजद्वारा गौ एवं ब्राह्मणोंकी शपथ लेनेके लिए बाध्य किए जानेके उदाहरण हैं ।
४. अनेक पत्रोंमें ब्राह्मण-भोजके प्रबंधका उल्लेख है तथा ‘यह सर्व व्यय धार्मिक खातेमें दिखाएं एवं उसके विषयमें किसी भी प्रकारकी काटछांट न करें’, ऐसी कठोर सूचना महाराज देते हैं (सन १६४८) । इससे उनकी ब्राह्मणोंके प्रति भूमिका स्पष्ट होती है ।
५. अधिकतर ब्राह्मणोंको भूमि पुरस्कारके रुपमें प्रदान करते समय महाराजद्वारा उनके योगदानका कृतज्ञतापूर्वक उल्लेख किया गया है, उदा. ३ अगस्त १६७४ को मुरारी त्रिमल विभुतेको पत्रमें छत्रपति शिवाजी महाराज लिखते हैं , ‘स्वामीके सिंहासनाधिष्ठित होते समय आपने स्वामीके साथ रहकर अत्यधिक सेवा की । महान पराक्रम कर स्वामीका अनुग्रह प्राप्त किया । आपके स्वामीकार्यका मोल जानकर आपसे संतुष्ट होकर आपके योगदानके लिए यह पुरस्कार ।’
६. ‘छत्रपति शिवाजी महाराजको हिंदवी स्वराज्यमें यश प्राप्त हो’, इसलिए जिजाबाई अनेक ब्राह्मणोंसे अनुष्ठान करवाती थी, ऐसा स्पष्ट उल्लेख १८ फरवरी सन १६५३ को वेदमुर्ति गोपाळ भटको लिखे पत्रमें हैं । महाराज लिखते हैं, ‘वेदमुर्ति प्रभाकर भटकी ओरसे स्वामीने मंत्र उपदेश संपादित किया । स्वामीको आपने अपने आभ्योदयार्थ सूर्यप्रित्यर्थ अनुष्ठान बताया ।’
५ आ. छत्रपति ब्राह्मणोंके अधीन नहीं थे !
ब्राह्मण व्यवस्थापकके हाथों हुई चूकके विषयमें १९ जनवरी १६७५ को लिखे पत्रमें महाराजने ब्राह्मण व्यवस्थापकको भी फटकारा है । महाराज लिखते हैं, ‘ऐसे चाकरको ठीक करना ही चाहिए । ब्राह्मण है, इसलिए उसे छूट कौन देगा ? इसके अतिरिक्त भी आपके विषयमें कोई अपराध प्रविष्ट होगा , तो आपको छूट नहीं मिलेगी ।’ इससे स्पष्ट होता है कि, छत्रपति शिवाजी महाराजके मनमें ब्राह्मण जातिके प्रति आदर भाव था, तब भी वे ब्राह्मणोंके अधीन नहीं थे; अपितु साथ ही ऐसे १-२ पत्रोंकी पूंजी कर छत्रपति शिवाजी महाराजके पीछे छिपकर ब्राह्मणद्वेष बढानेकी भी आवश्यकता नहीं है । ‘ब्राह्मणोंको नष्ट करना, यह ही जिनका जीवनव्रत है’, वे अवश्य ब्राह्मणद्वेष करें; परंतु ऐसा करते समय छत्रपति शिवाजी महाराजके नामका उपयोग कर उस महान विभूतिको कंलकित न करें ।
५ इ. छत्रपति शिवाजी महाराजको स्वयं ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ कहलवाते हुए संकोच नहीं होता, वहां उनके अनुयायी ‘गोब्राह्मण’ शब्दसे बातका बतंगड क्यों बनाते हैं ?
छत्रपतिके लगभग २०० पत्र उपलब्ध हैं । २०० मेंसे लगभग १०० पत्र उनकेद्वारा विभिन्न ब्राह्मणोंको कुछ ना कुछ दान दिए जानेके विषयमें अथवा अग्रहार दिए जानेके विषयमें हैं । मनुष्यका अंतःकरण जाननेके लिए पत्र एक अत्यंत मौलिक साधन है । विविध ऐतिहासिक घटनाओंमें छत्रपति शिवाजी महाराजने ब्राह्मणोंको अपने निकट किया । उनकी यह आस्था हमें उनके पत्रोंमें भी दिखाई देतीr है । महाराजको ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ कहनेसे कुछ लोगोंका सिर चकरा जाता है । परंतु इ.स. १६४७ में मोरेश्वर गोसावीको लिखे पत्रमें छत्रपति शिवाजी महाराज लिखते हैं, ‘ब्राह्मणका आतिथ्य अभ्यागतको पावन करता है । महाराज गोब्राह्मणके प्रतिपालक हैं । गौका प्रतिपालन करनेसे अधिक पुण्यकी प्राप्ति होती है ।’ जहां स्वयं छत्रपति शिवाजी महाराजको अपने आपको‘गोब्राह्मणप्रतिपालक’ कहलवाते हुए संकोचकी भावना नहीं होती, वहां उनके अनुयायी गोब्राह्मण शब्दसे बातका बतंगड क्यों बनाते हैं, यह बात ध्यानमें नहीं आती ।
प्राचार्य शिवाजीराव भोसले कहते हैं, ‘‘महाराजका उल्लेख कोई ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ नामसे करते हैं । मुझे इस उपाधिका आकर्षण लगता है । धरतीको समृद्धीका वरदान देनेवाला गोधन, साथ ही अपने तपोबलसे एवं अध्ययनसे समाजका स्तर ऊंचा करनेवाला ब्रह्मवेत्ता महाराजको रक्षणीय प्रतीत हुआ, इसमें कुछ भी अनुचित नहीं है, परंतु शब्दोंकी खींचातानी की जाती है । अर्थका विपर्यास किया जाता है । क्या वर्तमानमें मान्यताप्राप्त ‘दुधका महापूर’ अर्थात ‘धवलक्रांति’की संकल्पना तथा कठीनतम परीक्षाद्वारा अधिकारियोंका चयन, ये प्रक्रियाएं न्यूनाधिक मात्रामें गोब्राह्मणप्रतिपालनका स्मरण करवानेवाली ही नहीं है ? ईक्कीसवी शताब्दीमें ब्राह्मण शब्द विद्वत्ता, बुद्धिमानता, विज्ञाननिष्ठा एवं स्वतंत्रप्रज्ञाका वाचक हो जाए, तो कितना अच्छा होगा !’’
५ ई. छत्रपति शिवाजी महाराजकी सहायता करनेवाले ब्राह्मण एवं विद्रोही मराठा !
अ. शिवचरित्रमें शिवछत्रपतिके आसपास जो भी महत्त्वपूर्ण मंडली थी, उसमें अधिकांश ब्राह्मण थे ।
आ. बंगळुरूसे छत्रपति शिवाजी महाराजकी सहायताके लिए शहाजी महाराजकी ओरसे भेजे गए दादोजी कोंडदेव एक अत्यंत विश्वासू ब्राह्मण व्यवस्थापक थे ।
इ. छत्रपति शिवाजी महाराजके मंत्रिमंडलमें आठमेंसे सात मंत्री ब्राह्मण थे ।
ई. डबीर, कोरडे, अत्रे एवं बोकीलकाका ये महाराजके सभी अधिवक्ता ब्राह्मण थे ।
उ. अफजलखानका अधिवक्ता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण था, इसलिए आपत्ति उठाई जाती है; परंतु अफजलखानका अधिवक्ता ब्राह्मण था, उसीप्रकार छत्रपति शिवाजी महाराजका अधिवक्ता गोपिनाथपंत बोकील भी ब्राह्मण था ।
ऊ. ‘औरंगजेबकी सेनामें सहस्त्रों मराठा सरदार थे’, इस विषयमें मौन रखा जाता है ।
ए. प्रत्यक्षमें छत्रपति शिवाजी महाराजके अडतीस आप्तजन अफजलखानकी सेनामें खानकी सहायता कर रहे थे । छत्रपति शिवाजी महाराजको मिलनेके लिए अफजलखान आया, उस समय उसके गिने-चुने दस अंगरक्षकोंमें मंबाजी भोसले नामक छत्रपति शिवाजी महाराजके चाचाजी, तो पिलाजी मोहिते एवं शंकरजी मोहिते ये महाराजके दो चचेरे श्वशुर थे ।’
– श्री. सुनील चिंचोळकर (संदर्भ : अखिल भारतीय मराठा विकास परिषदकी ओरसे प्रकाशित , ‘समाज जागृति पुस्तिका’)

माती मऊ आहे म्हणुन...

गेले काहि दिवस माती मऊ आहे म्हणुन ती मुळाने खणण्याचा अट्टाहास काहि जण करीत आहेत. पण आता परीस्थिती अति झालं आणि हसु आलं याच्याहि बाहेर गेलीये. मुळात फक्त ब्राह्मण द्वेष हा एक आणि एकच अजेंडा काहि संस्थांकडुन अव्याहत राबवला जातोय. आणि त्याला कोणाचा राजकिय पाठिंबा आहे हे उघड-गुपित आहे.
तसा मूळातुन विचार करता ब्राह्मण समाजाने दलितांवर बरेच अत्याचार केले आहेत हा सत्य इतिहास आहे. पण सगळं खापर जे एकट्या ब्राह्मणांवर फोडलं जातय त्यात मात्र तथ्य नाहिये. उलट ब्राह्मण समाजापेक्षाहि काकणभर जास्त इतर वर्णांनी त्रास दिलाय. बर्‍याच दलित नेत्यांनी तसं स्पष्टपणे ऐकवले सुध्दा आहे. सध्या ब्राह्मणांवर गरळ ओकण्याचा जो काहि हिन प्रकार सुरु आहे तो शिसारी आणणारा आहे. फुले-आंबेडकर-शाहु-शिंदे यांनी देखिल इतक्या खालच्या थराला जाऊन ब्राह्मणांवर गरळ ओकली नव्हती. आणि तसे बघता यांचे काहि सहकारी अथवा यांना पाठिंबा देणारे काहि जण तर ब्राह्मणच होते. महात्मा फुलेंना शाळेसाठि जागा देणारे भिडेच होते. बालगंधर्व तर शाहुंच्या गळ्यातील ताईतच होते, इतके कि शाहुंचे उजवे हात समजले जाणारे जाधव प्रभुती देखिल --तुम्हांला बालगंधर्व जास्त जवळचे वाटतात !- असे हिरमुसुन म्हणताना दिसतात. शिंदे तर टिळकांच्या जवळच्या व नंतर तात्विक वादांमुळे दुर गेलेल्यांपैकी एक. महर्षी शिंदे यांनी सावरकरांवर त्यांच्या जात्योच्छेदनाच्या कार्यामुळे जाहिर स्तुतीसुमने उधळली होती. थोडक्यात सामाजिक-राजकिय अथवा तात्विक कारणांनी वरील प्रस्थापितांनी ब्राह्मणांवर कडक ताशेरे ओढले होते पण त्यांनी गरळ ओकली नव्हती. उलटपक्षी टिळक-शाहु वादात एका केस संबधी काहि अति गोपनीय कागद टिळकांपर्यंत पोहोचतील व टिळकांना त्यांचीच बाजु भक्कम करता येईल अशी व्यवस्थाच शाहुंने केल्याचा उल्लेख मिळतो. याबाबत प्रबोधनकारांनी शाहुंना प्रश्न विचारल्यावर -अरे तो(लोकमान्य टिळक) तिथे इंग्रजांशी एकहाती झुंज घेत असताना त्याच्या मार्गात कुटल्याहि कारणाने आम्हि का यावे?- असे उत्तर दिले. आणि आज त्याच टिळकांवर -लोकमान्य कसला भटमान्यच- असे एकेरी शेलकी विशेषण लावत हे फिरत आहेत. आणि अशी शेलकी-निर्बुध्द विशेषणे एकट्या लोकमान्यांवरच नव्हे तर -ब्राह्मण- असलेल्या प्रत्येकावर चिकटवत फिरत आहेत.
आता दादोजी कोंडदेव-समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक-राजकिय संबधांवर बोट ठेवण्यात येत आहे. तसा तर हा वाद जुनाच आहे. सुरुवात महात्मा फुल्यांनी केली. -गागाभट्ट व रामदासाने निरक्षर शिवाजीस गोड बोलुन फसविले!- अशी एक ओळ देखिल त्यांच्या लिखाणात सापडते. पण छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्ती निरक्षर मुळिच नव्हती व समोरचा गोड बोलतोय म्हणुन फसेल अशी तर नव्हतीच नव्हती. भारतात जे द्रष्टे झाले त्यापैकी एक असलेले शिवराय अश्या भुलथापांना बळि पडत असते तर स्वराज्य उभे राहिलेच नसते. महाराज काळाच्या फार पुढचा विचार करायचे. आणि महाराजांना माणुस ओळखता यायचा म्हणुनच -आम्हि महाराजांचे सेवक, तुझा कौल कोण घेतो? शिवशंभु आम्हांस हसेल!- असे म्हणत दिलेरखानावर दातओठ खाणारा मुरारबाजी पुरंदरावर स्वराज्यासाठी पडला. अशी माणसे गोळा करुन एकत्र आणणारे शिवराय गागाभट्ट व रामदास स्वामी यांना ओळखणार नाहित काय?
विषय निघालाच आहे तर सांगतो कि गागाभट्ट व शिवराय काहि राज्यभिषेकाच्या निमित्तानेच एकत्र आले नव्हते. तर त्याच्याहि आधी बरीच वर्षे म्हणाजे निदान ८-१० वर्षे आधी शेणवी समाज्याच्या निवाड्यात गागाभट्ट शिवाजीराजे जो निर्णय देतील तो मान्य करावा. असे विधान करतात. आता गागाभट्टांसारखा वेदशास्त्रसंप्पन दशग्रंथी ब्राह्मण एका जातीच्या निवाड्यात राज्याभिषेका आधीच राजांना न्याय देण्यास सांगतो म्हणजे गागाभट्टांना शिवरायांचे कार्य व त्यांची निर्विवाद योग्यता आधीच माहित होती असे दिसते. दुसरी गोष्ट – राज्याभिषेक झाल्यावरच राजाला अथवा त्या क्षत्रियाला ब्राह्मणांच्या सामाजिक-धार्मिक अथवा कौटुंबिक प्रश्नात निर्णय देता येत असे. गागाभट्टांना जर महाराजांना फसवायचे होते तर त्यांना राज्यभिषेक करवलाच कसा? कारण त्यांना ब्राह्मणसमाजाचे वर्चस्व अबाधित ठेवायचे होते तर कितीहि दक्षीणा दिली तरी त्यांनी महाराजांना राजेपद द्यावयास संमती दिलेच नसती. आणि कोटी रुपये दक्षीणा अथवा यांच्याच भाषेत सांगायच तर -लाच- हि गागाभटांसाठि मोठी गोष्ट नव्हती. काशी क्षेत्रीचा वेदोमुर्ती म्हंटल्यावर पैसा-मानमरातब-प्रसिध्दि हे त्यांना अज्जिबात नविन नव्हतं. ती दक्षीणा मिळणारच होती. यांचा अजुन एक आक्षेप असतो की -माझ्या हातुन काहि प्रमाद घडल्यास अथवा मी माझी राजाची कर्तव्ये पार पाडण्यात कसुर केल्यास, राजगुरु माझ्या मस्तकावर धर्मदंडाचा प्रहार करुन मला पदच्युत करतील!- अशी शपथ महाराजांना घ्यायला लावली होती. इथे त्यांना बामनी कावा वाटतो, पण जर महाराजांना प्रजेचा निवाडा करण्याचा हक्क असेल तर राजावर देखिल एखादा अंकुश असलाच पाहिजे. मुळात धर्मसत्ता व राजसत्ता यांना एकमेकांचा धाक नसेल तर राज्य टिकत नाहि. गावचा पाटिल झाला म्ह्णुन गावच बुडवावा का? ते तसे होऊ नये म्हणुन गेली हजारो वर्षे भारतातच नव्हे तर जगभर राजसत्ता-धर्मसत्ता एकमेकांना धरुन असतात. याचा अर्थ राजा वाईट असतो म्हणून नव्हे तर आअपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडतो अहोत की नाहि हे बघणारं कोणी असेल तर काम नीट होतं. इथे तर समाजाचा प्रश्न अहे. आणि एकट्या शिवरायांनाच नव्हे तर कुठल्याहि राजाला हि शप्पथ घ्यावीच लागायची.
दुसरा मुद्दा येतो समर्थ रामदासांचा. समर्थ रामदासांचे अध्यात्मिक कार्य प्रचंड आहे. ज्याकाळी दुष्काळ, कर्ज, रोगराई यांच्या बरोबरच सुलतानशाहिने जनता पिंजुन गेली होती तेव्हा जे संत जनतेला मानसिक आधार देऊन परमार्थाचा उपदेश करत होते त्यापैकिच एक रामदास स्वामी होते. पण सद्य कालात ते फक्त ब्राह्मण होते हा एक आणि एकच मुद्दा त्यांच्या कार्यावर पाणी फिरवण्यासाठी या संस्थांना पुरेसा आहे. रामदास आदिलशाचे हेर होते असे एकजण म्हणतो दुसरा तेच औरंगजेबाचे हेर होते असे म्हणतो. निदान आरोप करताना तरी एक काहितरी बोलावे?? पण मुळात आरोपच बिनबुडाचे असल्याने ह्यांची जीभ सैल सुटली आहे. इतकी कि समर्थांचे चारीत्र्य हनन करायला - आपल्या स्त्री शिष्यांबरोबर चाळे करणारा रंडिबाज रामदास असा गलिच्छ प्रचार हि मंडळी करीत आहेत. यांच्यातले काहि विकृत लोकं दुसरीकडे म्हणतात कि रामदास नपुंसक होते म्हणुनच त्यांनी लग्न केले नाहि आणि म्हणुनच ते मांडवातुन पळुन गेले होते. खरतर समर्थांचे कार्य किती मोठे आहे हे सर्वांनाच माहित आहे तरी त्याचे पुन: पुन: उच्चारण यासाठी करावे लागतेय कि आज गप्प बसलो तर यांच्या विकृत चाळ्यांना अजु चेव येईल. त्यामुळे हे झोपेचे सोंग घेतलेले जागे हॊणार नाहित हे माहिती असल्याने या बिनडोक लोकांकरीता नव्हे तर समाजाला यांचे ढोंगी बुरखे फाडुन दाखवण्यासाठी हा प्रपंच आहे. पुन्हा समर्थांबाबत सांगायचे झाले तर समर्थ जर शत्रुचे हेर असते अतवा भ्रष्ट चारीत्र्याचे असते तर सातार्‍यासारख्या अतिमहत्वाच्या टिकाणचा किल्ला महाराजांनी समर्थांना मठ बनवायला कशाला दिला असता? उलटपक्षी स्वराज्याच्या आसपासहि रामदासांना फिरकु दिले नसते. कींवा रामदास हिन चारीत्र्याचे असते तर महाराजांनी अश्या गुन्हेगारांचे हातपाय कलम करायचा कडक नियम बनवला होता. असे असताना राज्याभिषेका नंतर थोड्याच दिवसांनी समर्थ स्वत: प्रतापगडावर ठोसर घराण्याचा नवस फेडण्यासाठी येऊन गेल्याचा उल्लेख आहे. व त्यावेळी प्रतापगडाच्या किल्लेदारास समर्थांची योग्य ती काळजी घेतली जावी व त्यांना कसलहि कमी पडु देऊ नये अश्या आशयाचे पत्र महाराजांनी लिहिल्याचे समजते. तिच गोष्ट सज्जनगडाची. अजुन एक गंमतीचे गोष्ट भिक्षा हा रामदासींचा किंवा संन्याश्यांचा धर्म आहे. दासबोधात तर भिक्षेवर एक वेगळे प्रकरण रामदासांनी सांगितले आहे ते मुळातुन वाचण्यासारखे आहे. असो, तर भिक्षा या गोष्टिवरुन यांनी तुकाराम महाराज व रामदास यांना एकमेकांसमोर उभे केले आहे. पण याचा अर्थ यांची बुध्दी कमी तरी आहे किंवा हे मुद्दाम तसे करत आहेत. कारण रामदासंची भिक्षा व तुकारामांची भिक्षा यांत फरक आहे. तुकाराम भिक्षा हा शब्द भिक या अर्थाने वापरतात. तर समर्थ कोरड्या अन्नाची भिक्षा हा समाजाच्या प्रत्येक घरा पर्यंत जाण्याचा आणि देवकार्याचा प्रचार करण्याचे उत्तम साधन समजतात. बाकिचे जाऊदे ज्या बुध्दाचे हे लोक गोडवे गाताना ब्राह्मणांवर टिका करतात त्या बुध्दाने देखिल भिक्षा मागावी असेच सांगितले आहे. ह्या दोघांचे जर पटत नसते तर ते एकमेकांना भेटलेच नसते. तुकाराम महाराज व रामदास स्वामी एकमेकांना भेटल्याचा स्पष्ट उल्लेख आहे इतकेच नव्हे तर रामदासांनी तुकारामाची स्तुती करताना -धन्य धन्य तुका वाणी। धन्य धन्य तुझी वाणी।- असे एक पद लिहिले आहे तर रामदासांनी जे अकरा मारुती थापन केले त्यापैकी एका मारुती साठी तुकारामांनी अभंग लिहिला आहे. या शिवाय शिवराय निधन पावल्यावर -शिवरायाचे आठवावे रुप। शिवरायाचा आठवावा प्रताप- हे पत्र त्यांनी शंभुराजांना लिहिलेच होते कि. खुद्द महाराजांना त्यांनी -श्रीमंत योगी- आणि -जाणता राजा- अशी योग्य पदवी देऊन एक दीर्घ पत्र लिहिले होते जे आज प्रत्येक मराठी माणसासाठी शिवरायांचे जिवंत शब्दचित्रच आहे.
आता आपण दादोजी कोंडदेवांबाबत बोलुया. यांचे म्हणणे आहे कि दादोजी शिवरायांचे गुरु नव्हते. ठिक आहे ते गुरु नव्हते असे मानले तरी म्हणुन दादोजींचे शिवरायांच्या आयुष्यातले स्थान कमी होत नाहि. शिवरायांनी पंतांना खुप आदराने वागविल्याचे अनेक पत्रावरुन समजते. जेम्स लेनने जे विकृत लिखाण केले ते केवळ कचर्‍यात टकण्याच्या लायकिचे आहे हे १००% सत्य. पण जेम्स लेनने जो विकृतपणा केला त्याचे सगळे दोष ते दादोजी कोंडदेवांचे चरीत्र आणि शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना देतात. मुळात अजुन एक गोष्ट समाजातील लाखो लोकांना माहित नाहि कि हे पुस्तक प्रकाशित होताच शिवराय-जिजाऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव यांच्यावर जे अतिविकृत लिखाण लेनने केले त्याविरुध्द बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, मेहेंदळे या आणि अश्या जेष्ठ इतिहासकारांनी ऑक्सफर्ड प्रेसला पत्र लिहुन त्याविरुध्द निषेध नोंदवला होता आणि त्याचाच परीणाम म्हणजे ऑक्सफर्ड प्रेसने -आम्हि त्या पुस्तकाचे सर्क्युलेशन ताबडतोब थांबवले आहे!- असा उलट लेखी निरोप यांना कळवला होता. हे सगळे घडत असताना या बेशिस्त संस्थेचे नेते काय विड्या फुंकत बसले होते का? यांना जाग आली तोवर बाबासाहेबांनी कारवाई करुन बघा मी केले मी केले असे अवडंबर माजवले नाहि. तरी यांनी काहिहि जाणुन न घेता किंवा माहित असुनहि मुद्दामच भांडारकर फोडले कारण यांना काहितरी खुसपट काढायचेच होते ते त्यांना मिळाले त्यातुन शिवराय-जिजाऊसाहेब हा तर प्रत्येक मराठी माणासाचा मानबिंदु ! मग काय विचारता? भांडारकरच्या निमित्ताने बाबासाहेबांवर - ब्राह्मणांवर गरळ ओकायला सुरुवात झाली. सुदैवाने समाजातील ९८% लोकांनी बाबासाहेब असे करुच शकत नाहित असा सार्थ विश्वास बाबासाहेबांवर दाखवला. त्यामुळे यांची गोची झाली. यांनाकोणे विचारीनासे झाले. करायचं काय आपली चुल तर जळत राहिली पाहिजे त्यात इंधन काय? बाबासाहेब किती दिवस पुरणार? हा प्रश्न यांना पडला मग मराठा आरक्षणासाठी हे गाड्या जाळत सुटले. कुणबी मराठा एक आहेत मराठा समाजाला अरक्ष्ण द्या म्हणुन आंदोलने करु लागले. कुणबी समाजाने त्याला विरोध केल्यावर तर अजुनच चेकाळले आहेत. शिवाय उलटपक्षी बर्‍याच मोट्या मराठा समाजाचे आणि विशेषत: आजच्या तरुण पिढीचे म्हणणे आहे -कशाला हवेय आरक्षण? आमच्या मनगटात ताकद आहे, स्वत:ची विचार शक्ती आहे!- त्याने ह्यांच्या समोरचे प्रश्न अजुनच कठिण होत आहेत. तरी साप-साप म्हणु भुई धोपटण्याचे काम हे इमाने-एतबारे करीत आहेत. हीच ताकद त्यांनी समाज एकत्र कसा येईल याकरीता लावली तर महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे भले होईल.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायच झालं तर त्यांच्याच नावाने हि ब्रिगेड सुरु आहे. आणि संभाजीराजांना बामनांनी त्रास दिला अशी हाकाटि देऊन समाजात गैर समज पसरवला जात आहे.
महाराजांना एकट्या ब्राह्मणांचाच त्रास झाला होता का? शंभुराजांना पकडुन देणारा गणोजी शिर्के कोण होता? आणि शंभुराजां बरोबर अखेरपर्यंत राहणारा कवी कलष कोण होता? हे बघा आधी. इथे कोणा एका जातीवर मला टिका करायची नाहिये पण एकट्या ब्राह्मणांनी हे केल नाहिये हे सांगताना काहि दाखले देण भाग आहे.
अजुन एक मुद्दा शिवराय काय किंवा शंभु राजे काय यांच्या विरुध्द अफझलखानाच्या अथवा औरंग्याच्या मागे कंबरेला शोभेच्या तलवारी लावुन, आणि अपल्या षंढ मिश्यांना पिळ भरत स्वराज्या विरुध्द उभे राहणारे कोण होते याची यादि बघा आधी. मग ठरवा कि बामणाने चुक केलीये कि या ब्रिगेडच्या पुर्वजांनी? एक मुरारजगदेव काय सापडला शहाजीराजां विरुध्द मोहिम लढणारा, हे भोसल्यांशी सात जन्माचे वैर सांगणार्‍या घोरपडे-सावंतांना विसरले? शहाजी राजांची अफझलने कॊणाच्या मदतीने धिंड काढली होती? हे सांगतात जसवंतसिंहाला स्वत: ब्राह्मणांनी सहस्त्रचंडि करायला मदत केली होती जेणे करुन शिवाजी राजाचे तळपट होईल आणि परत बामनांची सत्ता येईल म्हणुन, पण असे होम-हवन करुन कोणी जिंकत असतं तर महाराजांनी राजगड-रायगडावर राजसुर्य आणि अश्वमेधच करायला हवे होते ना? ब्राह्मण तिथेहि आले असते. हेच म्हणतात दक्षिणेच्या पैशावर हि फुकटि लोकं वाढतात म्हणुन. गागाभट्टाने घेतली होती १ कोट रुपये दक्षीणा वगैरे वगैरे.. मुळात आपण काय बोलत आहोत हेच यांना समजत नाहि. ब्राह्मणांनी जे चांगलं केलय त्या बद्दल हे हरामखोर लोक एक चकार शब्द काढत नाहित उलट झालच तर त्याचे अति विकृत लिखाण करतात.
ह्या लोकांना एकतर स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे. मागे आपण काय बोललो होतो काय लिहिलं होत हे साफ विसरतात. एकदा म्हणातात अफझलखानाच्या नावाचा वापर करुन संघ-विहिंप हि लोकं मराठा(हिंदु पण नाहि बर का!) आणि मुस्लिम समाजातील दरी वाढवत आहेत, आणि नंतर मानसिक संतुलन बिघडल्यागत बरळतात कि अफझलखानाचा वकिल कृष्णाजी भास्कर या बामनाने महाराजांवर तलवार चालवली होती, आता समाजाला कृष्णाजी भास्कराच्या त्या क्रुष्णकृत्याचा विसर पडावा म्हणुन हे प्रतापगडावरील अफझलाच्या कबरीला विरोध करीत आहेत आणि अफझलखानाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत वगैरे वगैरे. आता शेंबडे पोर तरी यावर विश्वास ठेवेल का? आधी सिद्दी जौहराला कोण मदत करत होतं त्यांची नावे बघा. फाजलखानाला जावळीच्या जंगलातुन वाट शोधायला कोणी मदत केली ते बघा. विशाळगडाला मोर्चे लावुन शिवरायांना अडवणारे कोण होते त्यांची नावे बघा दिसतोय एक तरी बामन?
टिळकांवर चिखलफेक करताना -फक्त भटमान्यच- असे विशेषण लावले जाते, बहुदा -लाल-बाल-पाल- ह्या त्रयीने काय घडविले होते हे यांना ठाऊक नसावे. बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव टिळकांनीच सुरु केला होता. टिळकांना इंग्रजस सरकारने हवापालटासाठी मंडालेयात पाठवले नव्हते हे देखिल यांना माहित नसावे. टिळकांना ६ वर्षांची शिक्षा झाली तेव्हा लाखो गिरणी कामगारांनी मुंबईत ६ दिवसांचा संप केला होता जो भारतात इंग्रजां विरुध्द कामगारांनी केलेला -पहिला संप- होता. ते भटमान्य असते तर हे झाले असते का? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सर्व भारताचे -तिलक महाराज- झाले बंगालचे -बडेदादा- झाले ते कसे? काहितरी आचरटागत लिहायच कि झालं??? यांनी भांडारकर फोडल्यावर जेव्हा यांच्या उपद्रवी कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले होते तेव्हा एखाद्या दुकानदाराने दुकानाचे अर्धे शटर तरी खाली केले होते काय? आपण कोण आहोत? गल्लीच्या पलीकडे आपल्याला कोणी ओळखतो का? आपला पगार किती आपण बोलतो कीती? याचा विचार न करता फक्त बरळत रहायचं इतकच यांना येतं. हे शिवश्री खेडेकर सर, नरके सर अश्या थाटात लिहितात कि हे कोणा गुरुदेव रविंद्रनाथांबद्दल, लिओ टॉल्स्टॉय बद्दलक किंवा मार्क्स बद्दल सांगत असावेत.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याबद् दल लिहिताना तर यांनी किळसवाणे लिहिले आहे. -संडासवीर सा(डि)वरकर- हि यांची भाषा आहे. सावरकरांनी जे जात्योच्छेदनाचे काम केलेय त्या बद्दल यांना काहिहि घेणे देणे नाहिये कारण ते फक्त ब्राह्मण होते. इतके तर हे कृतघ्न आहेत.
अजुन एक जहरी अपप्रचार यांच्याकडुन केला जातो कि शिवाजी महाराजांचे खरे शत्रु म्हणाजे ब्राह्मणच. शिवाय त्यांच्या वेबसाईटवर महाराज एका ब्राह्मणावर तलवार चालवुन त्याचे शीर उडवत आहेत असे दाखवण्यात येते. पण या मुर्खांच्या एक गोष्ट लक्षात येत नाहि या चित्राचा परीणाम म्हणजे ब्राह्मण महाराजांचे नव्हे तर महाराजच ब्राह्मणांचे शत्रु होते असा अत्यंत चुकिचा संदेश समाजात अपोआप पसरवला जातोय. महाराजांचे शत्रु जण ब्राह्मण असते तर महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ६ ब्राह्मण कसे? अग्र्याहुन सुटका करुन घेताना नऊ वर्षाच्या आपल्या पोटच्या पोराला एका ब्राह्मण कुटुंबातच का ठेवले? आग्र्याहुन सुटका झाली तेव्हा पाठीमागे जे दोन ब्राह्मण फुलादखानाला मिळाले त्यांचे केवळ अमानुष हाल केल्यावरहि महाराज कसे निसटले या बाबत त्यांनी अवक्षरहि काढले नाहि. पुढे ते सुटुन आल्यावर महाराजांनी त्यांचा फार आपुलकिने सत्कार केला होता. संभाजीराजां बरोबर शेवटपर्यंत कोण होता? कवी कलशच ना? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातली -थोरली मसलत- म्हणजेच दिल्लीवरचा हक्क बाजीरावानेच प्रस्थापित केला ना?
इतकी विकृत विचारसरणी वापरताना ते दुसर्‍या बाजुला आपले म्हणणे मांडण्यासाठी शिवराय, संभाजीराजे, आंबेडकरांचे नाव घेतात हे अजुन क्लेषदायक आहे

हिंदु धर्मावरील पुरोगामी संकट

मित्रांनो हिंदु धर्मावरील पुरोगामी संकट दुर करण्यासाठी हा मेसेज सर्वत्र शेअर करा ...🙏
आजकाल हिंदु धर्मात फुट पाडण्या साठी खुप पाउल उचलली गेली आहेत..
आणी परदेशातुन आर्थीक मदत घेणारया खुप संघटणा अस्तित्वात
आल्या आहेत..
त्यांचे कार्य आहे हिंदु समाजात ब्राम्हणद्वेष वाढवुन नास्तिक वाद पसरवणे व हिंदु धर्मीयांचा देवावरील विश्वास उडवुन त्याना धर्मांतरीत करणे......
यांना माहीत आहे ब्राह्मण संपला म्हणजे हिंन्दु संपवायला वेळ नाही लागणार..ब्राह्मण आणी कर्म कांड संपवायचा हे यांचे ध्येय आहे.
आधुनिक पुरोगामी लोकांपासून सावधान !!!!!!!हिंदुत्ववादी मित्रांनेा ,
इंटरनेटवरती आपल्याला अनेक लोक भेटतील जे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात. आपण अंधश्रद्धा , वाईट चालीरीती यास विरोध करतो असेही सांगतील. तर तसे खरे आहे काय ? तर तसे बिलकुल नाही. स्वतःला पुरोगामी म्हणणारी हि मंडळी खरेतर नास्तिक व हिंदुद्रोही असतात. ज्यांना देवाचे अस्तित्व मान्य नाही त्यांच्यासाठी सर्व श्रद्धा अंधश्रद्धाच आहेत , सर्व चालीरीती वाईटच आहेत. ह्यांना सगळीकडे "बामणी कावा " दिसतो
.
उदाहरणार्थ एका तथाकथित पुरोगामी माणसाने मला सांगितले "मंदिरात देव नाही, तर बामणाचे पोट असते ". आता ह्या लोकांना मंदिरातील ब्राह्मण पुजारी दिसतो पण मंदिराबाहेरील फुले विकणारा माळी , नारळ विकणारा वाणी , देवपुजा साहित्य विकणारा कासार ,पेढे विकणारा गवळी , तर काही ठिकाणी धार्मिक पुस्तके विकणारा ब्राह्मणेतर माणूस का दिसत नाही ? बहुतांश ठिकाणी देवाचे पुजारी म्ह्णुन गुरव या इतर मागासवर्ग (OBC)या प्रवर्गात मोडणारया पुजारी यांची नेमणुक केलेली असते.तुळजापुर येथील भवानी देवीचे पुजारी हे वंशपरंपरागत मराठा समाजाचे आहेत.बिरोबा देवाचे पुजारी धनगर समाजाचे आहेत.मरीमाता देवीचे पुजारी मातंग समाजाचे असतात.खडोबाचे गोंधळी हे गोंधळी समाजाचे असतात.नवनाथांचे पुजारी गोसावी समाजाचे असतात.म्हणजे हिंदु धर्मात सर्व जातींचे लोक विविध देवतांचे पुजारी म्हणुन ह्जारो वर्षांपासुन आनंदाने कर्तव्य बजावत आहे.मग मंदिरांवरती ब्राह्मण तसेच ब्राम्हणेतर जाती या सर्वांचेच पोट अवलंबून नाही का ? मग देवामुळे फक्त ब्राम्हणांचे पोट भरते हा खोटा प्रचार कशासाठी करताय ? यांना ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद लाऊन हिंदू धर्मात फुट पाडायची आहे. धर्म सुधारणा करायची नसून धर्म बुडवायचा आहे.
हे लोक म्हणतात कि सर्व ग्रंथ ब्राह्मणांनी लिहिलेले आहेत. परंतु श्रीमत रामायणाचे लेखक महर्षी वाल्मिकी हे पूर्वी "वाल्या कोळया " म्हणजे ब्राह्मनेतरच होते. श्रीमत रामायणामध्ये श्रीरामचंद्र ह्या क्षत्रियाने रावण ह्या ब्राह्मणाचा वध केला. जर लेखक अप्रामाणिक ब्राह्मण असता तर त्याने "एका क्षत्रियाने ब्राह्मणाचा वध केला" हे चित्र दाखविले असते का ? महर्षी व्यासही पराशर मुनी व सत्यवती या कोळीणीचे पुत्र होते. म्हणजे तेही ब्राह्मणेतरच! त्यांना अठरा पुराणे तसेच महाभारताचे लेखक मानले जाते. अशावरून रामायण, महाभारत, अठरा पुराणे या ग्रंथाचे लेखक ब्राह्मणेतर आहेत. ब्राह्मण समाजाने तर या सर्व ग्रंथांचे जतन केले आहे.
खरे धर्मसुधारक तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम , संत नामदेव , संत गोरा कुंभार , संत रोहिदास, समर्थ रामदास , संत चोखामेळा , संत नरहरी सोनार , संत एकनाथ इ. संत मंडळी होती . त्यांनी खरी भक्ती शिकवून लोकांचे प्रबोधन केले .लोकाना भक्तीमार्ग शिकविला.त्यांना देवावर विश्वास होता म्हणून धर्म सुधारणा घडून आली.
आजकाल पुरोगामी या शब्दाचा हिंदुद्वेष करुन दुसरया धर्माच्या दाढ्या कुरवाळणे असा वास्तविक अर्थ रुढ झालाय .
हे लोक सांगतात ब्राह्मण लोक स्रीयांवर अत्याचार करतात..
आज मला सांगा ब्राह्मण मुलींईतके स्वातंत्र्य कोणाला आहे....अजुन ब्राह्मण स्रीला कधी कायम ङोक्यावर पदर घेतलेली बघीतलिये का...
य़ांच्या कडे कोणी पाहुणे आलेत तरी स्रीयांना हॉल मध्ये येण्यास परवानगी नसते..
सर्वात कमी पोलीस कंप्लेंट असतिल तर ब्राह्मण पति पत्नींच्या...नाहीतर इतर जातीतील स्त्रीमुक्तीवाल्या बायका खोट्या तक्रारी देउन नवरा ,दीर ,सासु,सासरा ,ननंद यांची अक्षरश पोलिस स्टेशनला धिंड काढतायत आजकाल...हा खोटारडेपणा इतका वाढलाय की अखेर सुप्रिम कोर्टाला खात्री केल्याशिवाय नातेवाइकांवर गुनहे दाखल करु नका असा पोलिसाना आदेश द्यावा लागला.
आजकालचे ब्राह्मण हे कोणाच्या न घेण्यात न देण्यात...
कोणत्याही प्रकारची सवलत, आरक्षण नसतांना खुप सारे ब्राह्मण गरीबीच्या परीस्थीतित आपले दीवस काढताय...
जर गुणवत्ता असुनही ही कुठे नोकरीला लागु शकत नाही तर कर्मकांड हाच पर्याय..तोही हिंन्दु धर्म वाढी साठी महत्वचाच..
मृत्यु , जन्म, लग्न ब्राह्मणा शिवाय विचार करुन बघा?...
कोणाची शांती करुन कोणाला आशेचा कीरण द्वीगुणीत होत असेल तर..?
ब्राह्मणांना त्रास देवुन फक्त हिंन्दु धर्म संपेल दुसर काहीही होणार नाही..आणी य़ांना माहीत आहे की सर्वात सोपे टार्गेट ब्राह्मणच आहेत...3% समाज ...
म्हणुन ईतर 50% समाजाला यांच्या विरुध्द भडकवायच आणी आपले काम सोपे करायचे..कारण 3% समाजाचा वोट बॅंकेवर पण फारसा फरक पडत नाही...
हिंन्दु समाजाचा क्षात्रवृत्तीने आधारस्तंभ असणारयस मराठा जातीला ब्राम्हणांविरुध्द भडकविण्याचे कारस्थान चालु आहे.ब्राम्हण संपविले व मराठा हिंदुधर्म विरोधी बनविले की इतर जाती सहज इतर धर्माच्या दावणीला बांधायचे षडयंत्र चालु आहे.
त्यासाठी सर्वांचेच दैवत असणारया शिवरायांचे नाव घेवुन हे लोक धुर्तपणे भावनिक खेळ खेळत आहेत.......
ब्राह्मणां विषयी अगदी कोणीही सहज वाइट बोलुन जाते ही फँशनच झाली आहे..कारण ब्राम्हणाना जातीवरुन शिविगाळ केली तरी ॲट्रासिटि कायदा लागत नाही.पण काही विशिष्ट जातींबद्दल त्यांच्या जातीचे साधे नाव घेतले तरी खबरदार ! तुम्हाला तुरुंगात बसावे लागेल !!यालाच म्हणतात पुरोगामी देशातील कायद्यापुढील समानता !!!
अशा प्रकारे हिंदु धर्म तोडायला निघालेले पुरोगामी लोक दुसरयांच्य मनात हीरो बनु पाहत आहेत...
कृपया विचार करा...
नंतर वेळ निघुन गेलेली असेल...
नाहीतर जन्म झाल्यावर कुंडलि काढायला कोणी नसेन....
लग्न कबूल है कबूल है म्हणुनच काझीकडुन लावावी लागेल..मंगलअष्टकांचा तो पवित्र ध्वनि ऐकु सुध्दा येणार नाही...
घरातले कोणी मेल्यावर अग्नी पंचतत्वात नाही तर ..
फादर ला बोलवुन किंवा मौलानाला बोलवुन मातीत दफन करावा लागेल....
हिंदुनो विचार करा व तथाकथित आधुनिक पुरोगामी संघटनां पासून सावधान रहा .......!!!!!!!!!"
ह.भ.प. व्यंकटेश महाराज सोनवणे
संगमनेरकर 📞 9922747144

Thursday, 3 March 2016

गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवराय - आक्षेप नि खंडण


सध्या महाराष्ट्रात काही विकृत विचारांच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे आणि तमाममराठ्यांचा इतिहास नासवण्याचा एककलमी कार्यक्रमहाती घेतला आहे. परंतु, ज्या छत्रपतींमुळे आम्ही आज जिवंत आहोत, त्यांच्या इतिहासाचे होणारे विकृतीकरण आम्ही जागच्या जागी बसून पाहू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांच्या कारस्थानी वृत्तीचा बुरखा फाडणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक वादग्रस्त मुद्दा (जो याच विकृत लोकांनी केला आहे.) म्हणजे शिवरायांची गोब्राह्मणप्रतिपालक ही बिरुदावली. या समाजद्रोही मंडळींकडून या शब्दावरुन प्रचंड काहूर माजवले जाते आणि शिवराय कसे गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते हे सांगण्याची अहमहमिका लागते. अशा लोकांकडे खरे तर लक्ष देऊ नये असे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी शेकडो वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे. तुकोबाराय म्हणतात,
‘‘तुका म्हणे भय न धरी माणसी!
ऐसीयाचे विषी करिता दंड!
तुका म्हणे सत्य सांगे!
येवोत रागे येतील ते!
गुण अवगुण निवाडा!
म्हैस म्हैस रेडा रेडा!
हा तो निवाड्याचा ठाव!
खर्‍या खोट्या निवडी भाव!
अंगे उणे त्याचे बसे टाळक्यात!
तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी!
धक्का खवंदासी लागतसे!
टाका तार्किकाचा संग!
पांडुरंग नित्य स्मरा हो !
भूंकती ते द्यावी भूंको!
आपण ते शिको नयें!‘‘
- जगदुरु तुकोबाराय
परंतु तुकोबाराय पुढे असेही म्हणतात की,
’’मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास|
कठीण वज्रास भेदूं ऐसे|
भले तरी देऊ कासेची लंगोटी|
नाठाळाचे माथी हाणू काठी|’’
***
 आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया, गोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज! येथे सर्वप्रथमआम्ही स्पष्ट करु इच्छितो की, सदर लेखाचा उद्देश सद्य काळातील ब्राह्मण जातीला श्रेष्ठ ठरविण्याचा अजिबात नाही. केवळ इतिहास वस्तुनिष्ठपद्धतीने मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे.
 शिवभारतकार कविंद्र परमानंद आपल्या ग्रंथात म्हणतो, तसे ः ’प्रणिपत्य प्रवक्षामिमहाराजस्य धिमत:
चरितं शिवराजस्य भरतत्स्येव भारतम!’ अशी आमची भावना-धारणा आहे.
  शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे, आमचा मंत्र आहे. शिवाजी या नावाच्या केवळ उच्चराने अख्खा महाराष्ट्र एक होतो. तो होऊ नये म्हणून त्यांच्या नावावर जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुरु आहे. शिवाजी महाराज हे गोब्राह्मणप्रतिपालक होते किंवा नाही हा वाद मुद्दामपुन्हा पुन्हा उकरून काढण्यात येतो, नि जातीपातीचे राजकारण केले जाते.शिवाजी महाराज खरेच गोब्राह्नणप्रतिपालक होते का? की ही ब्राह्मणांनी स्वत:साठी केलेली खेळी आहे? नक्की गौडबंगाल काय आहे हे? हे शोधण्यासाठीच केलेला हा अट्टहास आहे, अन्य काही नाही!
गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे नक्की काय?
छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते किंवा नाही हे पहायच्या आधी आपण गोब्राह्मणप्रतिपालक, गाय, ब्राह्मण म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे समजुन घेऊया.
गो म्हणजे गाय ही हिंदुधर्मात पवित्र नि पुज्य नि अवध्य मानली गेली आहे. वेदांमध्ये १३९ वेळा गाईसाठी ’अघ्न्य’ म्हणजे अवध्य असा शब्द आला आहे. म्हणजेच वेदांत गोहत्या कुठेच नाही, तरीही काही दीडशहाणे वेदांतल्या काही श्लोकांचा चुकीचा अर्थ काढून वेदांत गोहत्या आहे असे प्रतिपादन करतात. त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रस्तुत लेखाचा विषय नि उद्देश नाही. त्यामुळे वेदांवरील टीकेचा विषय तुर्तास बाजूला ठेऊ.
वेदांमध्ये गायीला अवध्य, पवित्र आणि पूज्य मानले आहे आणि वेद हे हिंदुंचे आद्य-वंद्य-ग्रंथ आहेत. शिवाजी महाराज हिंदुपदपातशहा, हिंदु धर्मरक्षक, हिंदु धर्माभिमानी होते, त्यामुळे त्यांनी स्वतःला गाईंचे संरक्षक नि प्रतिपालक म्हटले तर त्यात पाप ते काय? पोटात गोळा यायचे कारण काय? अर्थात तुमच्या सेक्युलरी दृष्टीला मुस्लिमांची अतिकाळजी असल्याने तुमच्या पोटात दुखणार हे खरेच. गायीबद्दल तर डॉ. आंबेडकरांसारखा नास्तिक नि हिंदु धर्मावर टीका करणारी व्यक्तीदेखील गोहत्या करु नका असे त्यांच्या Untouchables - who were they या ग्रंथात सांगतात. आंबेडकर म्हणतात,
’’जर आपण गायींची हत्या केली तर आपण आपल्या कृषीविकासाशी तडजोड केल्यासारखे होईल. म्हणूनच की काय आपल्या पूर्वजांनी हेतु:पुरस्सर गोहत्येवर बंदी घातली होती.’’ परंतु सोयीपुरते आंबेडकरांचा वापर करणारे याकडे डोळेझाकच करतील.
आता ब्राह्मण म्हणजे काय हे पाहूया. (पुरोगामी-सेक्युलर-विकृतांचा आवडता विषय)
ब्राह्मण कोणाला म्हणावे याचे शास्त्रात जे संदर्भ दिले आहेत ते खालीलप्रमाणेः
’’यो ब्रह्म जानाति स ब्राह्मण:!
जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण!’’
म्हणजे जो प्रत्यक्ष ईश्वराला जाणतो, त्याचा अनुभव घेतो, त्याचा साक्षात्कार अनुभवतो किंवा तो जाणण्यासाठी काटेकोर नियमांचे पालन करतो तो ब्राह्मण! ब्रह्म जाणण्यासाठीच्या आचारसंहितेचे जो काटेकोर पालन करतो, तो ब्राह्मण!
समर्थांनी दासबोधात हेच सोप्या पद्धतींत सांगितले आहे,
’’करिती ब्रह्मनिरुपण! जाणती ब्रह्म संपूर्ण!
ते चि जाणावे ब्राह्मण! ब्रह्मविद्!’’
दशक ६.४.२४
हे ब्रह्मनिरुपण किंवा ब्रह्म जाणणे म्हणजेच आत्मज्ञान होय. समर्थ म्हणतात
’’जयांसि झाले आत्मज्ञान! ते चि थोर महाजन!
वेदशास्त्रे, पुराणे! साधु-संत बोलिले!’’
दशक - ६.४.१९
ब्रह्म म्हणजेच ईश्वरास जाणणे म्हणजेच आत्मज्ञान! ब्रह्म पर्यंत पोहोचून त्याविषयी म्हणजे विश्वामागच्या किंवा पलीकडील विश्वातीत रुपाची लोककल्याणार्थ उकल करणारे ते ब्राह्मण.
आता ही स्थिती प्राप्त होण्यासाठी काय गुणसंपदा किंवा आचारसंहिता आवश्यक आहे, ती श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी खालीलप्रमाणे सांगितली आहे,
’’शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जमेव च!
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम!’’
शम, दम, तप, शुचिता, शांती, सरलता, ज्ञान, आत्मज्ञान आणि वेदांच्या प्रमाणत्वावर निष्ठा ही स्वाभाविक ब्रह्मकर्मे किंवा ब्राह्मणाचे गुणकर्म होय.
आता अशा समाजास मार्गदर्शक असणार्‍या आचारसंपन्न व्यक्तीचा आदर्श असणे वाईट काय आहे? अशा व्यक्तींचे संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य नव्हे काय? आजही आपण आपल्या समाजातल्या विविध स्तरांवरच्या लोकोत्तर पुरुषांची काळजी घेतो, मग ते वैज्ञानिक असोत किंवा समाजसुधारक असोत किंवा तत्वज्ञ किंवा कोणीही मार्गदर्शक असोत. आपण त्यांची सुरक्षा करतोच. त्यांना आजच्या भाषेत झेड प्लस सुरक्षा देतो मग ते कोणत्याही जातीचे का असेनात. मग शिवछत्रपतींनी त्याकाळी अशा विद्वान नि ज्ञानी नि चारित्र्यसंपन्न अशा काही ब्राह्मणांचे प्रतिपालन केले असेल तर त्यात बिघडले कुठे? याचे पाप ते काय? किंवा यात जातीयवाद तो काय? यात ब्राह्मणांची दादागिरी आहे काय?
(वरील सर्व विवेचन वेदांत-शास्त्रांत ब्राह्मण म्हणजे कोण, यावर आधारित आहे. सद्यकाळातील जन्मजात जातीव्यवस्थेत ज्यांची जात ब्राह्मण आहे, पण ते शास्त्रांत सांगितलेल्या निकषांत बसत नसतील, त्यांचा याच्याशी काहीह संबंध नाही, त्यांच्यासाठी गोब्राह्मणप्रतिपालक हा शब्द योजलेला नाही. त्यात मीही आलो.)
आता पुरावे, कारण हे या बिरुदावलीवर टीका करणारे पुराव्यांची मागणी नेहमीच करतात आणि ते दिल्यावर नाकरतातसुद्धा!
हो महाराज गोब्राह्मणप्रतिपालकच होते! हे घ्या पुरावे! ऐतिहासिक साधनांच्या सहाय्याने केलेला हा चिकित्सक प्रयत्न!
 सर्वप्रथमआपण समकालीन पुरावे पाहु. ते खालीलप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक असल्याचा पुरावा-
नलावडे नावाच्या नाईकवाड्याने प्रभावळी सुभेदाराच्या ब्राह्मण सबनिसाशी भांडण करून त्याच्यावर तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिला.
 हे समजल्यावर शिवछत्रपतींंनी ८ सप्टेंबर, १६७१ च्या पत्रात सुभेदार तुकोरामयांस पत्र लिहिले. त्या पत्रात महाराज काय म्हणतात पाहा,
’’नलावड्याने मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली, याचा नतीजा तोच पावला.’’
संदर्भ - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८, क्रमांक २४ चे पत्र.
आता समकालीन नि विश्वसनीय अशा शिवभारतातले पुरावे-
शिवछत्रतींच्या इतिहास साधनांत शिवभारत हे समकालीन साधन असल्याने ते प्रमाण मानले जाते आणि या बाबतीत सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. याचे कारण असे की, कविंद्र परमानंद नेवासकर या कवीने हे शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिले. त्यामुळे हे शिवचरित्र शिवरायांनीदेखील वाचले असेलच. आणि जर त्यात काही वावगे लिहिले असते तर महाराजांनी नक्कीच त्याचा कडलोट केला असता, त्यामुळे शिवभारत विश्वसनीय मानले जाते. दुसरी गोष्ट हे शिवचरित्र जरी अफझल खानाच्या वधापर्यंत असले तरीही ते शिवछत्रपचींंच्या समोरच लिहिले गेले असल्याने अतिशय चिंतनीय आहे.
शिवभारतकार कवींद्र परमानंद हे सुरुवातीलाच म्हणतात की, आपण हे काव्य शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहीत आहे आणि त्यांची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आल्याने परमानंदांनी या ग्रंथात शिवजन्माची नि अफझलखान वधाची अशा फक्त दोनच तारखा दिल्या आहेत, ज्या इतर साधनांशी ताडून बघता अचुक जुळतात. यावरूनच परमानंदांना शिवचरित्राची जवळून माहिती असल्याचे खात्री पटते. अफझलखान प्रकरणात आणि आग्रा प्रकरणातही परमानंद शिवछत्रपतींंबरोबर होते, याचा पुरावा आहे. आता गोब्राह्मणप्रतिपालकत्वाचे त्यातले पुरावे सविस्तर पाहु-
’’देवद्विजगवां गोप्का दुर्दान्तयवनान्तक:!’’
(अध्याय १, श्लोक १५)
जो देव, द्विज म्हणजे ब्राह्मण आणि गवां म्हणजे गाईंचे रक्षण करणारा आणि दुर्दम्य यवनांचा काळ किंवा अंत असा (राजा शिवाजी)
’’देवानां ब्राह्मणानां च गवां च महिमाधिकम!’’
(३९ वा श्लोक)
देव ब्राह्मण आणि गायीचा महिमा याचे वर्णन आहे.
त्याकाळच्या स्थितीचे वर्णन करताना परमानंद म्हणतात,
’’न वेदा अप्यधीयन्ते नाभ्यर्च्यन्ते द्विजातय:!
म्लेंच्छधर्मो प्रवर्धन्ते हन्यते धेनवोSपि!’’
वेदांचे अध्ययन सुटले आहे नि ब्राह्मणांचा सत्कार बंद झाला आहे, म्लेंच्छधर्म वृद्धी पावत आहे आणि गाईंचीही हत्या घडत आहे.
(अध्याय -५, श्लोक - ४० ते ४२)
अफझलखान वधात परमानंद स्वत: शिवछत्रपतींबरोबर होते. त्या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन करताना शिवछत्रपतींच्या मुखातले उद्गार सांगताना परमानंद म्हणतात,
’’सुराणां भूसुराणांच सुरभीणां च पालनम!’’
देवांचे, ब्राह्मणांचे आणि गाईंचे पालन करण्यासाठीच.
शिवभारतात आणखी अनेक ठिकाणी शिवरायांना उद्देशून परमानंदांनी गोब्राह्मणप्रतिपालक असा शब्द उच्चारला आहे. तरीदेखील काहीजणांना परमानंद ब्राह्मण असल्याने त्यांनी ते कपटाने लिहिल्याचे वाटत असेल तर आपण आणखी काही पुरावे पाहु-
आता प्रत्यक्ष परमप्रतापी छत्रपती श्रीशंभुराजे महाराजांबद्दल काय म्हणतात ते पाहु.
संभाजी महाराजांनी जे संस्कृत दानपत्र लिहिले आहे त्यातील पुरावे,
बाकरेशास्त्रींना दिलेले संस्कृत दानपत्र - दि. २४ ऑगस्ट, १६८०.
’’सुरुवातीला शंकराला नमस्कार, सदुरुला नमस्कार, ब्रह्मा विष्णु महेशांना नमस्कार, गंगा, सरस्वतीला नमस्कार! पद्मासनात जो स्थित आहे, कामकलास्तोत्र जो सहा प्रहर रोज पठण करतो, तो शंभुराजा असा मी-
शिवरायांचे वर्णन करताना शंभुराजे म्हणतात,
’’शिवराय हे शंकराचे अवतार, वेद, शास्त्र, स्मृति, आगम, पुराण यांचे जाणकार, जो सदाशिवस्वरुप आहे, देवब्राह्मणप्रतिपालक, सर्व देवालयांचे संरक्षण करण्यासाठी ज्याने आपला जीव खर्च केला, म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंच्छांना धराशायी ज्यांनी केले, ज्याने ताम्र नि तुर्क यांना जर्जर करून सोडले, कल्की अवताराप्रमाणे, हिंदुधर्माचा जीर्णोद्धार ज्याने केला, अफझलखानास बिचवा चालवला नि ज्याचे नृसिंहासमान शरीर रक्ताने माखले असा तो माझा पिता!’’
आता वरील शंभुछत्रपती स्पष्टपणे शिवरायांना देवब्राह्मणप्रतिपालक म्हणतात. आणखी काय पुरावा हवाय? तरीदेखील काहीजणांना अजुनही आक्षेप असेल (कारण जे शंभुराजे स्वतःच्या पित्याचे असे वर्षन करतात, त्यावरही आक्षेप घेणारे महाभाग या भूमीत निपजले आहेत)तर हे खालील पुरावे पहा-
 शंभुराजेकृत बुधभूषणमआणि ब्राह्मण (बुद्धभूषण नव्हे तर बुधभूषण! नाही तर काही टाळके विचित्र उच्चार करण्यात पटाईत आहेत.)
 पुन्हा एकदा हे सांगणे आवश्यक आहे की, ब्राह्मण हा कर्माने नि आचरणाने ब्राह्मण ठरतो, जन्माने नव्हे. म्हणून तर शंभुराजे स्पष्टपणे बुधभूषणमग्रंथात खालीलप्रमाणे सांगतात,
’’अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत:!
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्मणश्चैव विरुद्ध्यते!’’
खालील ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात-
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किंवा त्यांच्याकडून अडविला जातो.
’’ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति!
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति!’’
३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिंसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.
’’नैतान्स्मरनति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति!
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत!’’
७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्‍यांचा तो मत्सर करतो.
आता बुधभूषणममधील हा पुढचा पुरावा ः अध्याय - ३, श्लोक १२ ते १४
’’दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च!
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च!’’
दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवावा.
’’ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु:!
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता!’’
ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादी स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.
शंभुराजे स्वत:बद्दल म्हणतात,
धर्मपरंपरेने चालणार्‍या दाशरथी रामाप्रमाणे जो आहे, शिवयोग्याप्रमाणे ज्याने कपाळावर भस्म लावले आहे, द्विज आणि देवता यांचा आशिर्वाद, सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मणाला जो दान, धन नि भूमी दान देतो, तो कोटी कल्पांतापर्यंत शिवलोकांत सन्मान पावतो.
यापेक्षा आणखी काय पुरावा हवाय?
आता काहीजण अजुनही आक्षेप घेतील की शिवरायांनी स्वत:ला गोब्राह्मणप्रतिपालक का म्हटले नाही? त्याला आमचे उत्तर-
कुणाचे नाव घेऊ नये याची शास्त्रात जी यादी आहे, त्यात स्वत:चे व गुरुचे नाव घेऊ नये, असे सांगितले आहे.
  ’’आत्मनामगुरोर्नामनामानि कृपणस्यच!
श्रेय:कामानु गृह्णय्यात ज्येष्ठापत्य कलत्रयो:!’’
मी मी म्हणु नये, थोडक्यात स्वत:चे कौतुक करू नये, गुरुचे नाव घेऊ नये, कंजुस माणसाचे नाव घेऊ नये, ज्येष्ठ पुत्राचे आणि बायकोचे नाव घेऊ नये असे शास्त्र सांगते.
शिवाजी महाराजांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणून फारसे मिरवले नाही. त्यामुळे ते छत्रपतीच नव्हते असे म्हणणे जसे मुर्खपणाचेच ठरेल तद्वतच स्वत:ला गोब्राह्मणप्रतिपालक असे मिरवणेही तितकेच अप्रस्तुत वाटते. पण तरीही वर उल्लेखिलेल्या नलावड्याच्या पत्रातून हे स्पष्ट होतेच आहे. याउपरही काहीजणांना शंका असेल तर अशा लोकांची विकृतबुद्धी त्यांची त्यांची त्यांनाच लखलाभ असो, हो आम्ही मात्र त्यांच्या विकृतीचा बुरखा संदर्भासहित फाडूच.
’’प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपदपादशाह, हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदुकुलभूषण, अखंडलक्ष्मीअलंकृत महाराजाधिराज श्रीमंत श्री शिवछत्रपती महाराज की जय!!!’’
  (पुण्यात असताना नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालयात शिवभारत मिळाले होते, तेव्हा ते वाचले होते. -तुकारामचिंचणीकर, विवेकराव सोनावणे, शिवरामकार्लेकर, नितीन बाळपाटकी, राजेश महोश्वरी-)

Wednesday, 2 March 2016

विचारधन या पुस्तकातील "छत्रपति संभाजी महाराज" यांच्या आक्षेपहार्य मजकुराबद्दलचा .......

 श्री गोळवलकर गुरूजी (आरएसएस द्वितीय सरसंघचालक )यांच्या विचारधन या पुस्तकातील "छत्रपति संभाजी महाराज" यांच्या आक्षेपहार्य मजकुराबद्दलचा .......
त्याबद्दल "सत्य तथ्य आणि मिथ्य" ........
कालवपरवा गुरुजींच्या विचारधन या पुस्तकातील काही (मुद्दाम निवडक) पानांचे फ़ोटो सोशल मीडिया वर प्रासारित करुण संघ किती शिवशंभु द्रोही आहे असा दाखवन्याचा प्रयत्न केला गेला..निव्वळ भावनिक विषयाला हात घालून मराठा ब्राम्हण वाद आणखीन किती चिघळता येईल याची पुरेपूर काळजी या मंडळी नि घेतली .....
त्यात ते आरएसएस चे हिंदुत्वादी आणि जातीने ब्राह्मण मग काय
पुरोगामी.....
ब्रिग्रेडी........
इतिहासाची माहिती नसनारे आणि माहिती करुण घ्यावी अस सुधा न वाटनारे लगेच हातधुवून मागे लागले....!!
काय करणार काही लोकांचा तो आवडीचा आणि पोटतिड़किचा धंदा आहे ...
असो ....
आता त्यातील पड़ताळा पाहू..
प्रथम पुस्तकचि पहिली आवृति आली ती 13 ऑगस्ट 1971 साली
प्रकाशक :- हरी ना. दात्ये .
309 शनिवार पेठ ,पुणे
©मराठी संस्करण ,हिंदुस्थान साहित्य ...
प्रथम आवृत्ति :- 13 ऑगस्ट 1971
मुद्रक :- वि ग माटे
विश्वकर्मा मुद्रणालय (प्रा) लि.
405 नारायण पेठ ,पुणे..
आता श्री . गोळवलकर गुरूजी यांचा जन्म (19 फेब्रुवारी 1906 ) आणि मृत्यु ( 16 मे 1970)
( तत्पूर्वी 3 वर्षापासून कर्करोगाने ते त्रस्त होते )
आता त्यांच्या स्वतंत्र्याच्या , सामाजीक कार्याचा आणि देव देश धर्म यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घ्यायचा झाल्यास कदाचित दिवस मोजता येणार नाहीत...
मूळ मुद्दा कड़े वळु
( छत्रपति संभाजी महाराजांवर प्रथम बखर लिहिली ती " मल्हार रामाराव चिटनिस या बखर काराने ( शंभु राजांच्या मृत्युच्य तब्बल 122 वर्षाणि )
महाराजांच्या बदनामिचि सुरुवात यानेच केलि ...
( हां मल्हार राव बाळाजी आवजी यांचा पनतू होता , हे बाळाजी आवजी याना आणि आणखी तिघाना संभाजी महाराजांनी स्वराज्याशि गद्दारी केलि म्हणून हातीच्या पायाखाली दिल होता त्याचा इतिहास सर्वश्रुत आहे )
1960 पर्यंत हीच साधन उपलब्ध होती महाराजांच व्यक्तिमत्व वाचायसाठी ...
श्री. गोळवलकर गुरूजी यांनी विचारधन मधील लिखाण 1949 च्या दरम्यान एक व्यक्तिमत्व आणि चारित्र या वरुण संभाजी महाराजांवर लिखाण केल ( एक पत्रक काढल होत तत्कालीन वर्तमान पत्रात ) विचारधन च्या लेखकाने नंतर ते पत्रक जस च्या तस शहानिशा करता विचारधन या पुस्तकात वापरला ...
( 1960 पर्यंत महाराजांचा खरा इतिहास माहीत नव्हता , तत्कालीन साधन जी होती त्याचा अभ्यास करुण त्यांनी गोलवलकर गुरूजीनि लिखाण केल , मान्य आहे चूक झाली असेल पण गुन्हा नाही आणि शिवशंभु द्रोह नाही )
महाराजांचा खरा इतिहास शोधून काढला तो इतिहासाचार्य श्री. वा . सी . बेंद्रे यानी....
शंभुराजे चा खरा इतिहास
शोधन्याच काम त्यानंतर
""""वा सी बेंद्रे(ब्राह्मण)"""""
यांनी केले
"""1918 ते 1958""""
अस 40 वर्ष त्यांनी
देशात परदेशात विविध साधनाचा, मोडीदस्तऐवज,
पत्रव्यवहार अभ्यासुन त्यांनी
1960 च्या सुमारास पहिल खरा इतिहास आणि शंभुचरित्र समोर आणल.
शंभुराजेची खरी समाथी वढु बुद्रुक येथील ती ही यांनीच शोधून काढली..
आणि
1933 साला पर्यन्त इब्राहिमखान याचा फ़ोटो हा
छत्रपती शिवराय
यांचा आहे अस समजून लोक पूजत होते .
पण
""""वा सी बेंद्रे (ब्राह्मण)""""
यांनी प्रथम छत्रपती शिवरायांचा फ़ोटो ही शोधला आणि प्रसारित ही केला बर का ..?
पुढे याच
"""वा सी बेंद्रे(ब्राह्मण)"""च्या
शंभुचरित्रा वरुण.
इथे ओशाळला मृत्यु
रायगड़ला जेव्हा जाग येते
ही नाटके...
प्रा.कानेटकर (ब्राह्मण)
यांची नाटके रंगमनचावर आली आणि शंभुराजे च खर रूप समाजासमोर आल.
त्यानंतर.....!!!
श्री शिवाजी सावंत यांची
""""""""छावा""""""""
ही कादंबरी आली.
त्यानंतर
डॉ कमला गोखले(ब्राह्मण)
यांनी .........
""""""शिवपुत्र संभाजी"""""
हा ग्रन्थ आला आणि त्यांनी
वा सी बेंद्रे च्या शंभुचरित्राचा अभ्यास करुण पीएचडी ही केलि.....
यावरून अस समजते की
गोवळेकर गुरूजी नी
"""मल्हार रामराव चिटनीस"""
च्या बखरीवरुण लिखाण केले आहे.......
तेच साधन त्यांना त्यावेळी उपलब्ध झाले म्हणून ही चूक झाली आहे....
जात बघुन लिहलेला इतिहास समोर आणु नका.
सत्यता पडताळा
महाभागानो त्यांनी जे लिहल त्याची जाहिरात
पुरोगामी नो.....
ब्रिग्रेडी नो.......
तुम्ही करता म्हणजे तुम्ही त्या
"""मल्हार रामराव चिटनीस"""
च्या वंशातील आहात .
असच तुम्ही जेम्स लेनच इंग्लिश मधील लिखाण मराठीत घरोघरी पोहचवल....!!!
जरा लाज वाटू दया
तरुण शिवशंभु भक्तांची
दिशाभूल करू नका.
शिवभक्तानो नेहमी तुम्ही सत्य असत्य काय हे नेहमी जाणून घेवून पोस्ट पुढे पाठवत जावा
ही नम्र विनंती..
आर्ध्या हाळकुंडाने पिवळ होयची सवय लागलेले ( बी ग्रेडि) आणि फटिक ढोंगी शिवप्रेमी ब्राम्हण द्वेषी राजकारण करुण भावनिक मुद्दुयला हात घालून हिंदुत्वाला अडचणीत आनायचा प्रयत्न तर चुकून करु नका ...
उगाच जातीचा आधार घेऊन देव देश धर्म आणि महापुरुषांशि विद्रोह करु नका ....
निव्वळ विरोधाला विरोध म्हणून आपली वांगी भाजु नका ....
सत्य जानून घ्यायची तळमळ ठेवा .. आणि सत्य आहे ते मान्य करा ....
पूर्वग्रह दूषित असलेल्याणी तर उगाच बैल गेला आणि झोपि केला अस करुण
याला आपला डोक्याचा बाजार करु नका ....
बहुत काय बोलने , आपण सुज्ञ आहात् ....
शेवटी काय बूड़ते हे जन ना देखवि डोळा मन कळवळा हिंदू जनासी .....
शब्दलेखन ::----
©महेश(विकी) राऊत.
श्री.आनंदराव जाधव.