Friday, 29 April 2016

हिंदूंना धार्मिक कट्टरतेपेक्षा स्वतःच्या रक्षणाची कट्टरता हवी

तृप्ती देसाई, त्यांचे महिला मंदिर गाभारा प्रवेश आंदोलन आणि नंतरचे हाजी अली आंदोलन यावर बराच गोंधळ माजलेला आहे. हिंदूंचे म्हणणे असे आहे की जशी मुस्लिमांनी कट्टरता दाखवली तशी आपणही दाखवायला हवी होती. तृप्ती देसाईला मंदिराबाहेर रोखायला हवे होते, आपली एकी कमी पडली असेही म्हणत आहेत. परंतु हिंदूंना खरोखर धार्मिक कट्टरतेपेक्षा आज स्वतःच्या रक्षणाची कट्टरता हवी आहे. आता तृप्तीच्या आंदोलनावर कट्टरता-कट्टरता असा जप करणारे यावेळी काय करतात? १. अयोध्या राम मंदिर- आज अयोध्येत श्रीरामचंद्र एका तंबूत आहेत. ते दृश्य पाहिले की हाताच्या मुठी आपोआप वळतात, डोळ्यात खदिरांगार अन मुखी जय श्रीराम ही गर्जना आपसूक उमटते. या इथे हिंदूंच्या खऱ्या कट्टरतेची आवश्यकता आहे. आज ८५ कोटी हिंदूंनी राम मंदिरासाठी कट्टर होऊन आंदोलन केले तर क्षणार्धात सरकारसह सर्वांना झुकावे लागेल अन राम मंदिराची निर्मिती सुरु करावी लागेल. पण इथे आपण आपली कट्टरता दाखवत नाही. २. काश्मिरी पंडित- काश्मिरी पंडितांना जेव्हा हाकलून दिले, तेव्हा आपली कट्टरता कुठे होती? बरं ते जाऊ द्या. आज तरी आपण त्यांना पुन्हा काश्मिरात घरे मिळावीत यासाठी कुठले आंदोलन केले आहे काय? मग यावेळी या पंडितांच्या रक्षणार्थ किंवा पुन्हा काश्मिरात पुनर्वसन करण्याप्रित्यर्थ हिंदूंनी कट्टरता दाखवली काय? जर दाखवली असती तर एव्हाना काश्मिरी पंडित त्यांच्या प्रदेशात सुखावंगे आयुष्य जगले असते. ३. स्वतंत्र राष्ट्र- काश्मीरसह केरळ मध्येसुद्धा कधी कधी फुटीरतावाद्यांना आपले वेगळे राष्ट्र असावे, याची हुक्की येते. आणि या औलादी नागरिक व प्रशासनाला वेठीस धरतात. आपण भारताला हिंदूंचा देश किंवा काही जण हिंदुराष्ट्र म्हणतात. त्या राष्ट्रात काश्मीरसह केरळही येतो. आणि जे देश फुटून स्वतंत्र झाले तेही येतात. मग या हिंदू राष्ट्रीय प्रश्नावर आपण आपली कट्टरता का नाही दाखवत? इथे आपण का कमी पडतो. ४. हिंदूंवर होणारे अन्याय आणि धर्मांतरण- एखादा हिंदू सण असेल, श्रावण महिन्यात कावडी घेऊन जाणारे असोत किंवा गोहत्या असो, या प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांवर आपली कट्टरता कुठे जाते? अनेक कावडीवाल्यांवर हल्ले होतात, तेव्हा आपण कट्टर होऊन त्याचा प्रतिकार करतो का? गोहत्येचा आपण प्रखर विरोध करतो का? आज देशातील प्रत्येक राज्यात, शहरात, खेड्यात हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले जाते. पूर्वोत्तर राजे असो किंवा महाराष्ट्र सारीकडे राजरोस धर्मांतरे चालू असतात, तेव्हा हिंदूंनी कधी विरोध केलाय का? तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू समुदायाबाबत. तिथेही अनन्वित अत्याचार होतात हिंदूंवर तेव्हा आपली कट्टरता कुठे जाते? ५. नागरिकत्व- बांगलादेशी घुसखोरांना देशात लगेच नागरिकत्व दिले जाते आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना तंबूत किंवा कुठेतरी दिवस कंठावे लागतात. तेव्हा या विरोधात हिंदूंची कट्टरता कुठे जाते? ६. समान नागरी कायदा या मुद्यावर सुद्धा हिंदूंची कट्टरता दिसत नाही. ७. झंडूबामसेफ-बिग्रेडी हे सदैव हिंदूंना शिव्या घालण्याचे काम करतात, त्याचाही हिंदूंनी कधी कट्टर होऊन प्रतिकार केलेला नाही. ***** या प्रश्नावर खरे म्हणजे कट्टर होण्याची आवश्यकता आहे, महिलांच्या मंदिर गाभारा प्रवेशावर नाही. आणखी एक, काही म्हणतील की यातील काही मुद्दे न्यायालयात आहेत. मान्य, पण संघटनेच्या ताकदीपुढे सर्वांना झुकवण्याची शक्ती आपण निर्माण केली पाहिजे. © महेश पुराणिक

Sunday, 24 April 2016

कन्हैया नावाचे साम्यवादी खेळणे

कन्हैया कुमारच्या उदयाने देशातील गलितगात्र झालेली अनेक धेंडे हुरळून गेली आहेत. कित्येक वर्षांत ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वाने काही करता आले नाही किंवा जनतेच्या मनात स्थान मिळवता आले नाही त्यांना आता कन्हैया आपला मसीहा वाटत आहे. कन्हैया जे बोलतो त्याला तरुणाईचा वाढता प्रतिसाद मिळता असल्याचे दिसत आहे, त्यामुळे पुढील निवडणुकीत कन्हैया कुमारमुळे आपल्या पक्षाचे सरकार यावे यासाठी त्याला पाठींबा देण्याचीही सध्या अहमहमिका सर्व पक्षात लागली आहे. परंतु कन्हैया काय बोलतो, त्याची घडण कोणत्या वैचारिक धारेत झाली आहे याचे कोणालाही कसलेही घेणे देणे नाही. केवळ त्याच्यामुळे आपल्याला सत्तेचा मलिदा खायला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा झाली आहे. याआधी ज्यांनी साम्यवादाला विरोध केला तेही कन्हैयाच्या मुखी असलेले साम्यवादाचे नाव ऐकून आनंदाने डोलत आहेत. अहिंसा आणि साम्यवाद : कन्हैया कुमार त्याच्या भाषणात अहिंसेचा कैवारी असल्याच्या थाटात बोलत असतो. परंतु साम्यवादी नेत्याला (?) आपल्या विचारधारेने जगात जेवढी हत्याकांडे आणि हिंसा केली असेल तेवढी कोणीही केली नसेल, याचीही माहिती नसेल काय? रशियन राज्यक्रांती मध्ये ३० लक्ष नागरिकांची हत्या करण्यात आली. चीन मध्ये साम्यवादी राजवटीने ६५ लक्ष नागरिकांची हत्या केली. व्हिएत्नाम मध्ये १० लक्ष, उत्तर कोरिया मध्ये २० लक्ष, कंबोडिया मध्ये २० लक्ष, पूर्व युरोपीय राष्ट्रात १० लक्ष, दक्षिण अमेरिकेत १.५ लक्ष, आफ्रिकेमध्ये १०.७ लक्ष, अफगानिस्तान मध्ये १.५ लक्ष आणि इतर साम्यवादी चळवळीत १० हजार पेक्षा जास्त नागरिकांची हत्या करण्यात आली. डॉ. आंबेडकर आणि साम्यवाद : आंबेडकरांचे नाव घेऊन साम्यवाद खपवू पाहणाऱ्या कन्हैयाला कदाचित आंबेडकरांचा साम्यवादाला असलेला प्रखर विरोध माहिती नसावा किंवा माहिती असूनही तो आपल्या स्वार्थासाठी आंबेडकरांचा आणि साम्यवादाचा संबंध लावत असेल. पण आंबेडकरांची साम्यावादाबाबत असलेली भूमिका सर्वांसमोर आणणे आवश्यक आहे. 'मी कम्युनिस्टांशी संबंध ठेवणे सुतराम् शक्य नाही. मी कम्युनिस्टांचा वैरी आहे. कम्युनिस्ट हे आपल्या राजकीय ध्येयसिद्धीसाठी कामगारांना राबवीत असतात.’ (धनंजय कीर कृत डॉक्टरांचे चरित्र – पान ३०८) ‘बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे. ज्या बौद्ध राष्ट्रांनी साम्यवादाचा स्वीकार केला, त्यांना साम्यवाद म्हणजे काय हे समजत नाही. रशियन साम्यवाद उद्देश रक्तरंजित क्रांती घडवून आणणे हा आहे… रशियाच्या जाळ्यांत उडी घेणाऱ्या आग्नेय आशियातील राष्ट्रांनी सावधगिरी बाळगावी… दारिद्र्य सर्वत्र आहे व पुढेही राहील. रशियातही दारिद्र्य आहे. मानवी स्वातंत्र्याचा बळी देण्यासाठी दारिद्र्याची सबब सांगू नये.' रशियाकडे पाहा, तो राष्ट्रीय स्वातंत्र्यदानाचे आमिष दाखवून लोकांना घशांत घालीत आहे… रशियाने स्वतंत्र केलेल्या देशात गुलामगिरी येते. त्यापासून स्वातंत्र्य येत नाही…! साम्यवाद व लोकशाही एकत्र नांदू शकणार नाहीत असे आंबेडकरांचे मत होते. कारण साम्यवाद म्हणजे अरण्यातील वणवा आहे. जे जे त्याच्या मार्गात येईल, त्याचा विध्वंस करीत, स्वाहा करीत तो जातो. त्या वणव्याचा आसमंतात असणाऱ्या देशांना मोठा धोका उत्पन्न झाला आहे. भारत, मोदी राजवट आणि कान्हैयाचे प्रश्न : कन्हैया कुमार त्याच्या भाषणात रोजगाराची मागणी करतो, त्याचवेळी आमचा विरोध भांडवलशाहीला आहे असेही म्हणतो. सध्या देशात कारखाने, कंपन्या अर्थात भांडवलशाही शिवाय रोजगाराची निर्मिती होऊ शकत नाही हे निखळ सत्य आहे. कारण साम्यवादाच्या परिभाषेत देशातील सर्व उद्योग सरकारने करावेत अशी अपेक्षा असते. पण, आज देशातल्या सरकारी उद्योगांची अवस्था पहिली तर ते शेवटच्या घटका मोजत असल्यासारखे दिसतात. कारण ते उद्योग चालवायला सरकारकडे पैसा नाही. उद्योग चालत नाही त्यामुळे त्यातील कामगारही बेरोजगार होणार. त्यामुळे रोजगार हवा असेल आणि देशाच्या विकासासाठी पैसा हवा असेल तर भांडवलशाही आवश्यक आहे, त्याशिवाय रोजगार निर्मिती होऊ शकत नाही. देशातील अनेक प्रश्न हे गेल्या ६५-७० वर्षातील आहेत, त्यामुळे २ वर्षांच्या मोदी राजवटीमध्ये ते सर्व प्रश्न सोडवले जाण्याची अपेक्षा करणे मुळातच अयोग्य आहे. कारण आपला देश काही जपान, इटली किंवा जर्मनी सारकाही पिटुकला देश नाही तर खंडप्राय देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तेवढा वेळाही द्यावा लागेल. जन धन योजना, स्टार्ट अप, स्टेण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया या योजनेतून सरकार आपले काम करत आहे. चीन आणि अमेरिकेला मागे टाकून यावर्षी भारताने तब्बल ६३ अब्ज डॉलर ची गुंतवणूक खेचून आणली आहे. यातून रोजगारनिर्मिती होणारच आहे. ज्या गावांना विजेची सोय नव्हती तिथेही वीजजोडणी देणे सुरूच आहे. कन्हैयाने त्याच्या भाषणात शिक्षणावरील खर्च कमी केल्याचे म्हटले आहे. पण, आयआयटीमध्ये SC-ST मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला नाही. तसेच देशातील शैक्षणिक संस्थेत सरकार आपल्या विचारांच्या लोकांना बसवत असल्याचेही कन्हैया आपल्या भाषणात म्हणाला. जेव्हा सरकार बदलते त्यावेळी आपल्या विचारांची माणसे सर्वत्र नेमली गेली आहे, हा या देशाचा इतिहास आहे. आणि जनतेने मोदिना त्यांची विचारसरणी पाहूनच निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांच्या विचारांचीच माणसे नेमली जाणार हे उघड आहे. तरीही त्याला विरोध करणे हेच खुळेपणाचे लक्षण होय. - महेश पुराणिक

हिंदुत्वाच्या स्वाभिमानाचे स्फुल्लिंग

हिंदू समाजात हिंदुत्वाचा स्वाभिमान निर्माण होऊ नये यासाठी गेल्या 50 हुन अधिक वर्षापासून पद्धतशीर प्रयत्न सुरु आहेत. याचसाठी हिंदु बांधवांमध्ये अपराधीपणाची भावना (गिल्टी फीलिंग) न्यूनगंड तयार करून त्यांना स्वाभिमानी न होऊ देण्यासाठी किंवा बैकफुट वर ठेवण्यासाठी धर्मद्रोही फेक्युलर किंवा फुरोगामी लोक्स विविध मार्गांचा वापर करत आहेत/असतात. यातील महत्वाचा मार्ग म्हणजे किरकोळ घटनांना जास्तीत जास्त महत्व देऊन त्याद्वारे हिंदू धर्म आणि समाज किती असहिष्णू अथवा वाईट आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करणे. अगदी अलीकडील काही घटना वा उदाहरणे पाहिलीत तरी ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येईल. जवखेडा, दादरी किंवा तृप्ती प्रकरण असो. जवखेड्यातील घटना ही सवर्ण हिंदूंनी केलेली कृती असे ठरवून काही तथाकथित लोकांनी हिंदूंना दोष देण्यास सुरुवात केली, पण चौकशी अंती ते कौटुंबिक प्रकरण होते हे निष्पन्न झाले. त्यानंतर दादरी प्रकरणी सुद्धा उत्तर प्रदेश सरकारने तपास कामात हस्तक्षेप केला. परंतु अखलाख च्या घरी असलेले मांस हे गोमांस असल्याचे नंतर उघड झाले. तसेच तृप्ती देसाई प्रकरण, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसेल. पण, त्यावरून मोठे काहूर माजवले गेले आणि धर्माला शिव्या द्यायला सुरुवात केली, इतर लोकांनी. मात्र, हिंदू धर्मात आज घडीला स्त्रियांना जेवढे स्वातंत्र्य आहे तेवढे दुसऱ्या धर्मात खचितच असेल. तरीही यात हिंदूंना वाईट ठरवण्याचे प्रकार सुरूच आहेत. काल परवा जळगावात झालेली घटना देखील तशीच. क्रियेला प्रतिक्रिया तशी ही घटना झाली, पण कित्येक लोकांनी लगेच धर्मांध शक्ती वगैरे म्हणत हिंदूंना दोष देण्यास सुरवात केली.
वरील सर्व घटना या अलीकडच्या काळातील आहेत, याआधीही असे प्रकार वर्षानुवर्षे होत आलेत. मग ते काही संघटनांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न असोत किंवा माध्यमांनी केलेले प्रयत्न असोत, प्रत्येकवेळी हिंदू समाज अथवा धर्म किती नालायक आहे, हेच पाखंड सिद्ध करण्याची या लोकांची अहमहमिका चालू असते. या सर्वांचा परिणाम असा होतो की, कित्येक हिंदू ह्या लोकांच्या गोबेल्स नितीला बळी पडतात आणि धर्मविरोधक होऊन धर्मद्रोह्यांच्या कळपात सामील होतात. त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊन हिंदू असण्याचा न्यूनगंड तयार होतो. आणि हेच धर्मद्रोह्यांना हवे असते. परंतु आता हिंदूंनी ह्या लोकांच्या दुष्ट आणि धर्माला नष्ट करण्याच्या सुप्त हेतूलाओळखून याविरोधात संघटितपणे पुढे यायला हसे. तसेच, या लोकांचे मुद्दे खोदून काढायला हवेत.
अशा लोकांत सध्या बीग्रेडी, बामसेफी आणि कान्हूलाल सारखी पिलावळ जास्त पुढे आहे, तरी ह्यांना विरोध करायलाच हवा आणि हिंदुत्वाच्या स्वाभिमानाचे स्फुल्लिंग प्रत्येक हिंदुमनात प्रज्वलित करायलाच हवे.
- महेश पुराणिक