दि. १५ जानेवारीच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा लेख...!
***
१९८९ ते १९९७ या काळात अकबर हाशमी रफसंजानी इराणचे राष्ट्राध्यक्ष होते. इराणमध्ये अमेरिकेचा पाठिंबा असलेली मोहम्मद रझा शाह पहलवी यांची सत्ता उलथविण्यासाठी १९७९ मध्ये अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या इस्लामिक क्रांतीत रफसंजानी यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. यानंतरच इराणमध्ये इस्लामिक प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले. असे असले तरी हाशमी रफसंजानी यांच्यावर त्यांच्या कडव्या राजवटीबद्दल भरपूर टीकाही झाली, याचमुळे कदाचित त्यांनी पुढे उदारमतवादी धोरण स्वीकारले.
इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर रफसंजानी इराणी राजकारणाचे बडे खिलाडी झाले, तरीही त्यांची कारकीर्द नेहमीच कधी लोकांच्या समर्थनाने गाजली, तर कधी विरोधाने भरलेली राहिली. कारण त्यांचे राजकारण वैयक्तिक विचारांवर आधारित नव्हे, तर ते उदारवादी विचारधारेवर आधारित होते. त्यांच्या राजकारणाचा हा एक महत्त्वाचा पैलू होता.
इराणी क्रांतीच्या यशस्वीतेनंतर सुरुवातीच्या दिवसांत रफसंजानी ‘इस्लामिक कॅन्सलटेटिव ऍसेम्ब्ली’चे अध्यक्ष झाले. या काळात त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात डाव्या विचारसरणीचा खंदा पुरस्कार केला. त्यामुळे इराणमध्ये डाव्या चळवळीच्या प्रसारात त्यांचा हात असल्याचे दिसते. यासंदर्भातील काही उदाहरणेदेखील देता येतील, जसे की, रफसंजानी यांनी ‘क्रांती मुजाहिदी’ संघटना आणि विशेषत्वाने डावा इराणी नेता बहजाद नबवी यांचे समर्थन केल्याचे प्रकरण असो किंवा १९८९ मध्ये इमामखुमैने यांनी एका पत्रात उपाध्यक्षाचे पद समाप्त करण्याची घोषणा केली होती, तसेच त्यामागचे कारणही उघड केले होते. मात्र रफसंजानी यांनी ते पत्र कधीही प्रकाशित केले नाही. याबाबत असेही म्हणता येईल की, ते पत्र प्रकाशित करण्याविषयी त्यांनी निभावलेली भूमिका संदिग्ध होती. त्याचबरोबर अंतरिमसरकारचे राष्ट्राध्यक्ष म्हणून बाजरगानच्या निवडणुकीत प्राध्यापक महदी बाजरगान यांच्यासोबत असलेले विशेष संबंध, तसेच इराणी क्रांतीत असलेली या दोघांची संदिग्ध भूमिका असो, या सर्वच वेळी रफसंजानी यांनी डाव्यांना पूरक अशीच भूमिका घेतली.
इमाम खुमैने यांच्या राजकीय कारकीर्दीत रफसंजानी डाव्या चळवळीचेे मोठे समर्थक होते, मात्र इमामखुमैने यांच्या मृत्यूनंतर रफसंजानी यांनी आपल्या भूमिकेत १८० अंशाचे परिवर्तन केले. याचवेळी रफसंजानी यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि विशेषत्वाने आर्थिक नीतीला टीकाकार आणि सरकारी संस्थांकडून विरोधाचा सामना करावा लागला. या काळात डाव्यांचा पूर्ण जोर रफसंजानी यांच्या आर्थिक विकासाच्या नीती आणि खाजगी क्षेत्राला दिल्या जात असलेल्या सवलतींना ज्या कोणत्याही प्रकारे शक्य असेल त्या प्रकारे विरोध करणे यावरच होता. या विरोधामागे डाव्यांचे म्हणणे होते की, खाजगी क्षेत्रामुळे सरकारी क्षेत्र संपुष्टात येईल.
परंतु, कोणत्याही टीकेपुढे न डगमगता रफसंजानी यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या नव्या पैलूंना आणि आपल्या नव्या विचारांना समाजात प्रस्थापित करण्यासाठी सर्वप्रकारच्या टीकेचा चतुराईने आणि कठोरतेने समाचार घेतला. रफसंजानी यांच्या या खेळीने इराणमधील जे खुशमस्करे टीकाकार आणि राजकीय विश्लेषक होते, ज्यांचे धोरण केवळ एक तर आमच्या समर्थनात अथवा विरोधात भूमिका घ्यावी असेच होते आणि ज्यांना मध्यममार्ग पसंत नव्हता, अशांना त्यांची जागा दाखवून दिली.
रफसंजानी यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ इराणच्या राजकीय युगातील प्रचंड उलथापालथीचा होता. ते राष्ट्राध्यक्ष असताना, शाहरूख फरीदून, अताउल्लाह मोहाजेरानी, अब्दुल्लाह नूरी या त्यांच्या जवळच्या लोकांनी देशाच्या संविधानातील कलम११४ हटविण्याचा जोरदार प्रयत्न केला. कारण या कलमानुसार एका राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ चार वर्षांचा होता, तसेच राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन कार्यकाळानंतर त्याला निवडणूक लढविण्याचा अधिकार नसेल. वरील सर्व लोकांची इच्छा होती की, हे कलमरद्द करून राष्ट्राध्यक्षाच्या मृत्यूपर्यंत त्यांनी त्या पदावर राहायला हवे; परंतु त्यांचा हा डाव देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या दूरगामी विचार आणि डावपेचांमुळे यशस्वी होऊ शकला नाही. खोमेनी यांनी स्पष्ट शब्दांत याचा विरोध केला. खोमेनी यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ‘इस्लामिक कॅन्सलटेटिव ऍसेम्ब्ली’चे अध्यक्ष असलेल्या अब्दुल्ला नूरी यांनी आपल्या भाषणात अयातुल्ला खोमेनी यांच्या भूमिकेविषयी वक्तव्य केले की, ’’अयातुल्ला खोमेनी यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष पदासाठी हाशमी रफसंजानी यांच्या दुसर्याल कार्यकाळानंतर अन्य कोणाही व्यक्तीने राष्ट्राध्यक्ष व्हावे. त्यांच्या या भूमिकेनंतर आता आणखी काही बोलण्याची आवश्यकता नाही आणि अशी कोणतीही आणीबाणीसदृश्य परिस्थिती नाही की, एक्स्पिजीएन्सी कौन्सिलला राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ वाढवावा लागेल.’’ यानंतर राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी आणि अन्य काही लोकांनी रफसंजानी यांच्या समर्थनार्थ भाषणेही दिली.
राष्ट्राध्यक्ष असताना रफसंजानी यांनी अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले. त्यांनी खाजगीकरणाचा पुरस्कार केला. रफसंजानी यांच्या प्रशासनाचे वर्णन आर्थिकदृष्ट्या उदारमतवादी, राजकीयदृष्ट्या हुकूमशहा आणि तत्त्वज्ञानाने पारंपरिक अशा प्रकारे केले जाते. रफसंजानी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात उच्च आणि मध्यमवर्गात लोकप्रिय होते. यामागे त्यांनी स्वीकारलेली आर्थिक उदारीकरणाची नीती आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी दिलेला पाठिंबा (खोमेनी राजवटीशी तुलना करता) हे घटक कारणीभूत होते.
१९८० ते १९८८ मध्ये झालेल्या इराण-इराक युद्धानंतर त्यांनी युद्धप्रभावित क्षेत्राच्या पुनर्उभारणीसाठी प्रयत्न केले. मात्र, देशाच्या ग्रामीण आणि युद्धग्रस्त भागात ज्या सोयी-सुविधा उभारण्याची नितांत आवश्यकता होती, तिथपर्यंत त्यांचे प्रशासन पोहोचू न शकल्याने रफसंजानी यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे ग्रामीण इराणी जनता, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गात रफसंजानी यांची लोकप्रियता घसरली.
खोमेनी सरकारच्या राजवटीत इराणच्या परराष्ट्र संबंधात शिथिलता आली होती. मात्र, रफसंजानी यांनी सत्ता हाती घेताच अरब राष्ट्रे आणि मध्य आशिया, कॉकेशस, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान आणि कझाकस्तान यांच्याशी संबंध सुधारण्यावर भर दिला. परंतु, त्यांचे प्रशासन चांगले आणि अंतर्गत शांततेसाठी प्रयत्न करणारे असले तरीही युरोपीय देश आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांत मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात सुधारणा करता आली नाही.
१९९१ साली झालेल्या पर्शियन गल्फ युद्धात त्यांनी इराक आणि अमेरिका या दोन्ही देशांना दोष दिला. असे असले तरी युद्धानंतर त्यांनी पश्चिमी देशांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. युद्धानंतर त्यांनी निर्वासितांना मदतदेखील केली. तसेच, इराकच्या युद्धग्रस्त भागात त्यांनी मदत म्हणून अन्न-धान्य, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि औषधे पाठविली, तसेच कुवेतमधील निर्वासितांना इराणमध्ये राहण्यासाठी छावण्यांची उभारणी केली.
पुढे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही म्हणजे १९९७ पासून ते २००५ पर्यंत महमूद अहमदी नेजाद इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकेपर्यंत रफसंजानी यांनी आपल्या शक्ती, राजकीय पकड आणि नेतृत्व क्षमतेला अशाप्रकारे शाबूत ठेवले की, त्यामुळे त्यांना राजकारणाचे पितामह समजले जाऊ लागले. याचदरम्यान एक्स्पिजीएन्सी कौन्सिल ज्याचे स्वतः त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोणी नावही ऐकले नव्हते आणि ज्याला माध्यमांतही कधी स्थान नव्हते, अशा घटकाचे अचानक सैन्याच्या तिन्ही विभागांच्या बरोबरीने एक स्वतंत्र स्थान निर्माण झाले. तसेच या माध्यमातून रफसंजानी इराणी जनतेसमोर पुन्हा एकदा देशाच्या सर्वोच्च अधिकार्याचच्या रूपात प्रकट झाले.
ही तीच वेळ होती, ज्यावेळी रफसंजानी यांचे डाव्या आणि उजव्या विचारधारांना सोबत घेऊन पुढे जाणारे राजकारण विफल झाले होते. जे डावे आतापर्यंत रफसंजानी यांच्या चेहर्याढकडे डोळे लावून असत आणि ज्यांचे पालन रफसंजानी यांनीच केले होते, त्याच डाव्यांनी रफसंजानी यांच्याविरुद्ध चळवळ सुरू केली. या चळवळीतून डाव्यांनी रफसंजानी यांना असेही सांगितले की, त्यांनी एकदा स्पष्ट करावे की, ते नक्की कोणाच्या बाजूने आहेत. डाव्यांच्या की, उजव्यांच्या? डाव्यांच्या या धोरणामुळे रफसंजानी यांचा एकप्रकारे राजकीय पराभवच झाला होता.
आठ वर्षांपर्यंत एक्स्पिजीएन्सी कौन्सिलचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर आणि खातमी सरकारच्या राजवटीनंतर रफसंजानी यांनी लगेचच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात कोणाचाही विजय न झाल्याने आणि अहमदी नेजाद व रफसंजानी यांच्यादरम्यान दुसर्या टप्प्यातील स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच दोन्ही खुर्दादी गटांच्या सर्व सदस्यांनी खुलेपणाने रफसंजानी यांचे समर्थन करणे सुरू केले.
दुसर्याा टप्प्यातील निवडणुकीत रफसंजानी यांची भूमिका आणि दुसर्याे बाजूला दोन्ही खुर्दाद गटांचे त्यांच्याप्रती जवळीक दाखविणे एवढे वाढले की, रफसंजानी आपल्या बोलण्यात अशा प्रकारचे शब्दप्रयोग करू लागले की, ज्यामुळे कोणालाही सहज समजेल की, दोन्ही खुर्दाद गट आणि स्वतः राष्ट्राध्यक्ष खातेमी हे रफसंजानींचीच भाषा बोलत आहेत. जे दोन खुर्दाद गट कालपर्यंत रफसंजानी यांच्याशी असलेल्या शत्रुत्वालाच आपला सर्वात मोठा मुद्दा मानत होते, ते आता त्यांना आपले होडके वाचविणारा नाविक समजू लागले; परंतु रफसंजानी यांच्या अशा भूमिकेमुळे त्यांचे समर्थकच त्यांच्यापासून दुरावले आणि त्यांनी मेहमूद अहमदी नेजाद यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
निवडणुकीत मेहमूद अहमदी नेजाद यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरच्या काळात रफसंजानी यांनी पुन्हा दोन्ही डाव्या आणि उजव्या विचारांवर पाय ठेवत राजकारण सुरू केले. पराभवानंतर कोणत्याही गटांशी संबंध नसल्याचा रफसंजानी यांनी दावा केला. त्यांची अशी इच्छा होती की, अहमदी नेजाद यांच्या सरकारमध्येही त्यांचे स्थान राजकारणातील पितामहाचेच असावे, पण निवडणुकीच्या काळात नेजाद यांचा त्यांनी केलेला विरोध या नव्या खेळीमध्ये मुख्य अडथळा होता. तरीही या खेळीमुळे रफसंजानी नेहमीच माध्यमांतील चर्चांच्या केंद्रस्थानी राहिले.
दरम्यानच्या काळात, रफसंजानींच्या एक्स्पिडीएन्सी कौन्सिलने सरकारच्या कामात अडथळा निर्माण केल्यामुळे सरकारमधील प्रमुखांनी कौन्सिलच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला. याचे कारण म्हणजे, एक्स्पिडीएन्सी कौन्सिलच्या माध्यमातून सैन्याच्या तिन्ही विभागांची हेरगिरी केली जाऊ लागली. तसेच कौन्सिलने कार्यकारी समितीच्या विरोधात एक कायदादेखील मंजूर केला व त्याचे समर्थनही केले. त्याचबरोबर सरकारवर टीकादेखील केली. या सर्वच गोष्टींमुळे एक्स्पिडीएन्सी कौन्सिल आणि सरकारचे संबंध अंधकारमय झाले. यानंतरही रफसंजानी यांनी इराणमधील अनेकानेक महत्त्वाच्या संस्थांचे प्रमुखपद भूषविले. इराणच्या अशा या उदारमतवादी नेत्याच्या मृत्यूनंतर मात्र तेहरानमधील रस्ते त्यांच्या अंतिमप्रवासात त्यांच्यावरील निष्ठेपायी गर्दीने फुलून गेले होते, हे नक्की.
पाकिस्तान म्हणजे अण्वस्त्रांचे दुकान
‘‘पाकिस्ताननेच इराणला अण्वस्त्र तंत्रज्ञानाची विक्री केली असून पाकचे अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांची भेट घेण्याचा मी दोन वेळा प्रयत्न केला, पण भेट झाली नाही. मात्र, पाकिस्ताननेच इराणला अणुबॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान विकले,’’ असे हाशमी रफसंजानी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याने बरीच खळबळ उडाली होती. तसेच त्यांनी या संदर्भात ज्या तारखा सांगितल्या, त्या पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांच्या सत्ताकाळातील होत्या. ए. क्यू. खान यांनी १९८६ मध्ये इराणच्या अणू प्रकल्पाचा दौरादेखील केला होता.
हाशमी रफसंजानी यांच्या आयुष्यातील घटनाक्रम
. अयातुल्ला हाशमी रफसंजानी यांचा जन्म २५ ऑगस्ट, १९३४ रोजी इराणच्या रफसंजान प्रांतातील बहरमान जिल्ह्यात एका श्रीमंत कुटुंबात झाला.
. १४ वर्षांच्या वयात ते कुमयेथील धार्मिक केंद्रात शिक्षण घेण्यासाठी गेले.
. येथेच त्यांचा परिचय अयातुल्ला बुरुजर्दी, अयातुल्ला अमामखामेनी आणि अयातुल्ला सय्यद मोक्किक मीर दामाद, अयातुल्ला मोहम्मद रेजा गुलपाएनागी आणि अयातुल्ला अयातुल्ला मोहम्मद हुसैन तबातबाई यासारख्या प्रसिद्ध आणि ख्यातीप्राप्त उलेमांच्या वर्गात प्रवेश घेतला.
. रफसंजानी यांनी इस्लामिक क्रांतीच्या सर्वच क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांना सात वेळा तुरुंगातही जावे लागले. याच दरम्यान त्यांना तब्बल साडे चार वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. तरीही तत्कालीन सत्तेविरुद्ध त्यांचा तीव्र संघर्ष सुरुच राहिला.
. हाशमी रफसंजानी यांनी अनेकदा इराणच्या संसदेचे म्हणजेच ‘मजलिस-ए-शुरा-ए-इस्लामी’चे सभापतीपद भूषविले. (२८ जुलै १९८० ते ३ ऑगस्ट १९८९) तसेच ते दोन वेळा इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी राहिले.
. रफसंजानी याचबरोबर लीडरशीप कौन्सिलचे सदस्य निवडण्यासाठी गठित केल्या जाणार्या९ विशेषज्ज्ञांच्या परिषदेचेही अध्यक्ष राहिले. (२५ जुलै २००७ ते ८ मार्च २०११)
. राष्ट्रीय हित समिक्षा परिषदेचे अध्यक्षपदही रफसंजानी यांनी भूषविले. (६ फेब्रुवारी १९८९ ते ८ जानेवारी २०१७)
. रफसंजानी यांनी देशात विविध सामाजिक सेवा उभारण्यातही महत्त्वाची भूमिका निभावली. जसे की, आझाद इस्लामिक विद्यापीठाची स्थापना.
. राष्ट्राध्यक्षाच्या रुपात त्यांनी इराणमध्ये राजकीय विकासापेक्षा अधिक आर्थिक विकासावर जोर दिला. रफसंजानी यांनी अनेक धार्मिक पुस्तके लिहिली, ज्यात ‘तफसीर-ए-रहनुमा’ या २० खंडातील प्रसिद्ध पुस्तकाचा समावेश आहे.
- महेश पुराणिक

. हाशमी रफसंजानी यांनी अनेकदा इराणच्या संसदेचे म्हणजेच ‘मजलिस-ए-शुरा-ए-इस्लामी’चे
. रफसंजानी याचबरोबर लीडरशीप कौन्सिलचे सदस्य निवडण्यासाठी गठित केल्या जाणार्या९ विशेषज्ज्ञांच्या परिषदेचेही अध्यक्ष राहिले. (२५ जुलै २००७ ते ८ मार्च २०११)
. राष्ट्रीय हित समिक्षा परिषदेचे अध्यक्षपदही रफसंजानी यांनी भूषविले. (६ फेब्रुवारी १९८९ ते ८ जानेवारी २०१७)
. रफसंजानी यांनी देशात विविध सामाजिक सेवा उभारण्यातही महत्त्वाची भूमिका निभावली. जसे की, आझाद इस्लामिक विद्यापीठाची स्थापना.
. राष्ट्राध्यक्षाच्या रुपात त्यांनी इराणमध्ये राजकीय विकासापेक्षा अधिक आर्थिक विकासावर जोर दिला. रफसंजानी यांनी अनेक धार्मिक पुस्तके लिहिली, ज्यात ‘तफसीर-ए-रहनुमा’ या २० खंडातील प्रसिद्ध पुस्तकाचा समावेश आहे.
- महेश पुराणिक

No comments:
Post a Comment