सदर लेख इतिहास अभ्यासक श्री. कौस्तुभ कस्तुरे यांचा आहे.
***
***
१६५६ च्या मार्च - एप्रिल मध्ये जावळी काबीज केल्यावर गडपति असणाऱ्या शिवछत्रपतींनी जावळीच्या पश्चिमेस प्रतापगड बांधला.
पुढे मार्गशीष शुध्द सप्तमीला अफजलखानाला भेटीला बोलावून त्याने पहिला वार करताच त्याचा कोथळा बाहेर काढला हे तर आता आपल्या इयत्ता ४थीतला विद्यार्थी सुध्दा सांगेल.

ऐन भेटीच्या वेळी नक्की काय घडले होते?
अफजलखानाच्या पोटातला कोथळा बाहेर काढला म्हणजे शिवछत्रपतींचा खांद्यावरील भाग खानाच्या पकडित असला पाहिजे आणि शिवछत्रपतिंनी पोटाच्या खालच्या बाजूने वार केल्यानेच कोथळा बाहेर लोंबू लागला .
आता वार कसा केला? काय काय वापरल असावं? वाघनखं? बिचवा? की तलवार??

वाघनखाने एवढी मोठी जख़म होणे आणि कोथळा बाहेर येणेे शक्य नाही.
हो त्याने आतडी बाहेर काढण्यास नक्कीच मदत झाली असावी.
पुरावे सांगतात की वाघनखे घुसवुन बिचवा (एकधारी लहान तलवार ) मारला आणि त्याचा कोथळा बाहेर काढला .

हं..आता मात्र आपल्याला फार सावधपणे पुढील इतिहासात शिरायचं आहे!
इथे येतो तो कृष्णाजी भास्कर! हां खानाचा वकील.
याच्या तपशीलात आता आपण शिरूया...
याच्या तपशीलात आता आपण शिरूया...
सभासद प्रत्यक्ष भेटीबद्दल काय लिहीतो ते पाहू -
“खानही उभा राहून, पला. राजियांची मुंडी कवटाळून खाकेखाले धरिली राजानाने आणि हातीची जमदाड होती तीचें मेण टाकून कुशिस राजेयाचे चालविली. तो आंगात जरिची कुडती होती त्यावरी खरखरली. आंगास लागली नाही. हे देखोन राजियांनी डावे हाताचे वाघनख होते तो हात पोटात चालविला. खानाने आंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करिताच खानाची चरबी बाहेर आली. दुसरा हात, उजवें हातचें बिचवियाचा मारा चालविला.ऐसे दोन वार करोन (महाराज), मुंडी आसडोन {हिसडा देऊन} चौथरियाखाली उडी घालोन निघोन गेले.
खानाने गलबला केला की, ‘मारिले! मारिले! दगा दिधला! बेगी {लवकर} धावा !!’
असे बोलताच भोयांनी पालखी आणिली आणि पालखीत घालून, (खानाला) उचलून चालविला.
इतकियात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारीले {कापले} आणि पालखीवाले भोयांस पाडिले. खानाचे डोचके कापिले {व} हाती घेऊन राजियाजवळ आला. इतकियात सैद बंडा पटाईत धावला. त्याने राजे जवळ केले. पट्ट्याचे वार राजियावरी चालविले. तो राजियाने जिऊ माहालियाजवळ हुद्दियाचा पट्टा होता तो घेऊन पट्टा वा बिचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले {अडवले}. पाचवे हातें राजियांस मारावे तो इतकियात जिऊ माहाला याणे फिरंगेने खांद्यावरी सैदबंडियासी वार केला. तो पट्टियाचा हात हत्यारा समेत तोडिला आणि खानाचे शीर समेत घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ माहाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.”

हा कृष्णाजी अनंत सभासदाने- महाराजांचा समकालीन- लिहीलेला वृत्तांत आहे. या सबंध वृत्तांतामध्ये खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी महाराजांवर वार केल्याचा अथवा महाराजांनी कृष्णाजीला मारल्याचा ओझरता उल्लेख नाही.
शेडगावकर भोसल्यांच्या बखरीतही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी महाराजांवर वार केल्याचा अथवा महाराजांनी त्यांना ठार मारल्याचा उल्लेख नाही.
शिवकालीन पुराव्यांमधील एक अत्यंत विश्वसनिय मानला जाणारा पुरावा म्हणजे जेधे यांची शकावली.
जेधे शकावली तर कृष्णाजी भास्करांना मारल्याचा किंवा त्यांनी राजांवर वार केल्याचा उल्लेख नाही.

शिवापूरकर देशपांड्यांच्या वहितील शकावलीमध्ये सुद्धा
“शके १५८१ विकारीनाम संवत्छरे मार्गसीर्ष शु॥ ७ गुरुवारी आठवे तासी प्रतापगडानजिक सिवाजीराजे यांणी आफजलखानासी येकांगी करून आबजलखान जिवे मारीला सिर कापिले ” असा उल्लेख असून यामध्ये कृष्णाजी भास्कराला मारल्याचा उल्लेख नाही.

अज्ञानदासाच्या पोवाड्याचा उल्लेख करणे गरजेचे आहे. हा पोवाडा अज्ञानदासाने, महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून राजगडावर आल्यावर लगेच जखमनाम्याच्या दरबारात महाराजांसमोर गायला होता. या पोवाड्यात अज्ञानदास शाहीर म्हणतो,
“अबदुलखान पुरा झाला । कृष्णाजी ब्राह्मण उठावला ॥ शिवाजी राजा बोलला । ब्राह्मणां, मारू नये तुजला॥
तुजशी मारता।शंकर हासेल आम्हाला॥ नाईकता ब्राह्मणे । हात दुसरा मारीला॥
ब्राह्मणा मारू नये तुला।
क्रिया शहाजीची आम्हाला॥
कृष्णाजी ब्राह्मणे ।
हात तिसरा टाकीला ॥
होईल ब्रह्महत्या भोसल्यांसी। शिवाजीने राखिला॥
कृष्णाजी ब्राह्मण मागे सरला।
सैद बंडू मोहरे आला ॥“

कविंद्र परमानंद नेवासकर यांचे “अनुपुराण" यालाच आपण 'शिवभारत' म्हणतो.
सर्वोच्च पुरावा!
यात परमानंदांनी जे वर्णन केले आहे ते असे-
“ब्राह्मणास शिवाजीराजा ठार मारणार नाही असे जाणून धनी अफजलखानाने त्या ब्राह्मणास युद्धात (त्या प्रसंगात) निविष्ट केले होते (शि.भा.-२१:४७).
तो ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतिने वागणार्या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही (शि.भा.-२१:४८).
अफजलखानाचे सैनिक तेथे पोहोचले नाहीत तोच त्याने ती तलवार शिवाजीराजावर हाणली (शि.भा.-२१:४९).
त्याने मारलेली ती तरवार त्या समयी शिवाजीराजाने आपल्या तलवारीने अडविली. आणि पट्ट्याने त्याच्या धन्याच्या डोक्याचेही तुकडे केले (शि.भा.-२१:४७)”.

परंतू या सार्या हकीकतीत कविंद्र परमानंदांनी कुठेही कृष्णाजी भास्करांना ठार मारले असा ओझरताही उल्लेख करत नाहीत. किंबहूना महाराजांनी त्यांस ठार केलेच नाही असंच यात म्हंटल आहे .
अफजलखानाच्या वधानंतर खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांना महाराजांनी आपल्या पदरी ठेऊन घेतले असावे जसे नाईकजी पांढरे, सिद्दी हिलाल, नाईकजी खराटे इत्यादी अनेक लोकांना ठेवले होते तसे.
हे कृष्णाजी भास्कर पुर्वी अफजलखानातर्फे वाई परगण्याचे हवालदार होते (भा.इ.सं.मं. त्रैमासिक वर्ष ७ मधील अफजलखानाचे पत्र).

वाईच्या उत्तरेला असणार्यातील एक कागद हा वेलवंडखोर्यातील डोहर देशमुख यांच्यातील तंट्याचा इ.स. १६६९-७० रोजीचा महजरनामा आहे.
या महजराच्या वेळी खुद्द महाराज उपस्थित होते. या कागदात कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख वेळवंड्खोर्यातील सुभेदार असा आहे.
दुसरा कागद हा तालुके चौल येथील देशमुख-देशपांडे, शेट्ये-महाजन यांना शिवाजी महाराजांनी इ.स. १५ नोव्हेंबर १६७१ रोजी पाठवलेल्या खरमरीत आज्ञापत्र उपलब्ध आहे
या दोन्हीही कागदांवर (महजरनाम्यावर आणि आज्ञापत्रावर) कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख सुभेदार असा आला आहे.
तिसरा कागद हा इ.स. १६७१-७२ चा जाबिता तह आहे, या तहाच्या अग्रभागी महाराजांची ‘प्रतिपच्चंद्रलेखेव’ ही राजमुद्रा तसेच शेवटी ‘मर्यादेयं’ ही मर्यादा मोर्तब आहे.
या तहनाम्यातही कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख आहे.

आता आपण इतिहास संशोधक काय म्हणतात ते पाहूया-
● यदुनाथ सरकार यांच्या
Shivaji and His Times मध्ये ते अफजल वधावर लिहिताना कृष्णाजी भास्कर याने तलवार उचलली त्याला शिवछत्रपतींनी मारला असा उल्लेख केलेला नाही.

● सेतुमाधवराव पगड़ी यांनी सुध्दा त्यांच्या 'शिवचरित्रात या संबंधी उल्लेख करत नाही.
● मराठी रियासत भाग २- 'शककर्ता शिवाजी' यात सुध्दा याचा उल्लेख नाही.
● Grant Duff याच्या 'मराठ्यांची बखर' यातही कृष्णाजीला मारल्याचा उल्लेख नाही.
● वा. सी. बेंद्रे यांनीच पहिल्यांदा हां मुद्दा लावून धरला होता की ,
"कृष्णाजी भास्करबाबत बराच गैरसमज झालेला आहे . कृष्णाजी भास्करने शिवछत्रपतिंना अफजलखानाच्या मनात कपट आहे हे सांगितले .
पुढे हां कृष्णाजी भास्कर जिवंत होता " असे ते आपल्या 'श्री छत्रपति शिवाजी महाराज' या ग्रंथात लिहितात.

मग अफजल वधानंतर जर कृष्णाजी भास्कर हां जिवंत असल्याचा पुरावा आहे तर मग
'कृष्णाजी भास्कर यांनी महाराजांवर हल्ला केला आणि नंतर महाराजांनी त्यांना ठार केले'

फक्त वाईनामा सांगतो की कृष्णाजीस मारले.
आता हा एक पुरावा ग्राह्य धरावा की इतर पुरावे ग्राह्य धरावे याबाबत इतिहास संशोधकांनी आम्हास मार्गदर्शन करावे.
(हा मागोवा घेत असताना ऐतिहासिक साधनाचाच वापर केला आहे. तरी याविरोधात काही प्रवाद असल्यास ते पुराव्यांसहित मांडावेत.
बाजारगप्पा आणि कथा-कादंबरी यांना स्थान नाही.)

बहुत काय लिहणे!
मर्यादेयं विराजते!
mahesh ji....kiti bhraman wada cha uddhar karta...thithe te brigradi ani ithe tumhi tumchi udhharachi vrutti ...je khar ahe te sanga na.. purave applyach gharche aslyagat detay,,,, prabhodhankar thakare bare tumchya pekshya,,,kadhich jati vaad kela nhi...ani ittar jaticha fakt bhramanana ch ka virod.. tyancha hindu dharmala virod nahi...fakt bramani ani brigradi vicharla virod ahe,,,vel ahe ata tari ittar jatina aaplya sobat ghya,,, nhitr itki himmat nhi ki hirvya saapala(muslim) samore ekte jau shakal... Jai Shriram Jai Maharashtra
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteवेडात मराठे वीर दौडले सात ...यामध्ये सातवा वीर मंजे कृष्णाजी भास्कर ....सात सरदारांनी शौर्य गाजवले तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४...आणि अफजल खान वध 10 November 1659.... यातून सर्व काही कळते जास्त सांगणे नाही.
ReplyDeleteइतिहासात 3 कृष्णाजी भास्कर होऊन गेले अगोदर इतिहास पूर्ण वाचा मग दुसऱ्याला सांगणे नाही बोका
Deleteपराकोटीच्या जातपात व वर्ण व्यवस्थेत हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व केंव्हाच लयाला गेले.ज्यांनी इतिहास लिहिला त्यावर काठ्याकुट किती दिवस..त्यापेक्षा ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्या विचार व कामगिरीची थोडी तरी कदर करा.थोडस बदला. यातच हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व व राष्ट्र अभिमान आहे.जय शिवराय
ReplyDelete