Friday, 29 April 2016
हिंदूंना धार्मिक कट्टरतेपेक्षा स्वतःच्या रक्षणाची कट्टरता हवी
तृप्ती देसाई, त्यांचे महिला मंदिर गाभारा प्रवेश आंदोलन आणि नंतरचे हाजी अली आंदोलन यावर बराच गोंधळ माजलेला आहे. हिंदूंचे म्हणणे असे आहे की जशी मुस्लिमांनी कट्टरता दाखवली तशी आपणही दाखवायला हवी होती. तृप्ती देसाईला मंदिराबाहेर रोखायला हवे होते, आपली एकी कमी पडली असेही म्हणत आहेत. परंतु हिंदूंना खरोखर धार्मिक कट्टरतेपेक्षा आज स्वतःच्या रक्षणाची कट्टरता हवी आहे. आता तृप्तीच्या आंदोलनावर कट्टरता-कट्टरता असा जप करणारे यावेळी काय करतात?
१. अयोध्या राम मंदिर- आज अयोध्येत श्रीरामचंद्र एका तंबूत आहेत. ते दृश्य पाहिले की हाताच्या मुठी आपोआप वळतात, डोळ्यात खदिरांगार अन मुखी जय श्रीराम ही गर्जना आपसूक उमटते. या इथे हिंदूंच्या खऱ्या कट्टरतेची आवश्यकता आहे. आज ८५ कोटी हिंदूंनी राम मंदिरासाठी कट्टर होऊन आंदोलन केले तर क्षणार्धात सरकारसह सर्वांना झुकावे लागेल अन राम मंदिराची निर्मिती सुरु करावी लागेल. पण इथे आपण आपली कट्टरता दाखवत नाही.
२. काश्मिरी पंडित- काश्मिरी पंडितांना जेव्हा हाकलून दिले, तेव्हा आपली कट्टरता कुठे होती? बरं ते जाऊ द्या. आज तरी आपण त्यांना पुन्हा काश्मिरात घरे मिळावीत यासाठी कुठले आंदोलन केले आहे काय? मग यावेळी या पंडितांच्या रक्षणार्थ किंवा पुन्हा काश्मिरात पुनर्वसन करण्याप्रित्यर्थ हिंदूंनी कट्टरता दाखवली काय? जर दाखवली असती तर एव्हाना काश्मिरी पंडित त्यांच्या प्रदेशात सुखावंगे आयुष्य जगले असते.
३. स्वतंत्र राष्ट्र- काश्मीरसह केरळ मध्येसुद्धा कधी कधी फुटीरतावाद्यांना आपले वेगळे राष्ट्र असावे, याची हुक्की येते. आणि या औलादी नागरिक व प्रशासनाला वेठीस धरतात. आपण भारताला हिंदूंचा देश किंवा काही जण हिंदुराष्ट्र म्हणतात. त्या राष्ट्रात काश्मीरसह केरळही येतो. आणि जे देश फुटून स्वतंत्र झाले तेही येतात. मग या हिंदू राष्ट्रीय प्रश्नावर आपण आपली कट्टरता का नाही दाखवत? इथे आपण का कमी पडतो.
४. हिंदूंवर होणारे अन्याय आणि धर्मांतरण- एखादा हिंदू सण असेल, श्रावण महिन्यात कावडी घेऊन जाणारे असोत किंवा गोहत्या असो, या प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांवर आपली कट्टरता कुठे जाते? अनेक कावडीवाल्यांवर हल्ले होतात, तेव्हा आपण कट्टर होऊन त्याचा प्रतिकार करतो का? गोहत्येचा आपण प्रखर विरोध करतो का? आज देशातील प्रत्येक राज्यात, शहरात, खेड्यात हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले जाते. पूर्वोत्तर राजे असो किंवा महाराष्ट्र सारीकडे राजरोस धर्मांतरे चालू असतात, तेव्हा हिंदूंनी कधी विरोध केलाय का? तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू समुदायाबाबत. तिथेही अनन्वित अत्याचार होतात हिंदूंवर तेव्हा आपली कट्टरता कुठे जाते?
५. नागरिकत्व- बांगलादेशी घुसखोरांना देशात लगेच नागरिकत्व दिले जाते आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना तंबूत किंवा कुठेतरी दिवस कंठावे लागतात. तेव्हा या विरोधात हिंदूंची कट्टरता कुठे जाते?
६. समान नागरी कायदा या मुद्यावर सुद्धा हिंदूंची कट्टरता दिसत नाही.
७. झंडूबामसेफ-बिग्रेडी हे सदैव हिंदूंना शिव्या घालण्याचे काम करतात, त्याचाही हिंदूंनी कधी कट्टर होऊन प्रतिकार केलेला नाही.
*****
या प्रश्नावर खरे म्हणजे कट्टर होण्याची आवश्यकता आहे, महिलांच्या मंदिर गाभारा प्रवेशावर नाही.
आणखी एक, काही म्हणतील की यातील काही मुद्दे न्यायालयात आहेत. मान्य, पण संघटनेच्या ताकदीपुढे सर्वांना झुकवण्याची शक्ती आपण निर्माण केली पाहिजे.
© महेश पुराणिक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment