दि. २६ डिसेंबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा
वेध...!
***
बंगालमधील दंगल
पश्चिम बंगालमध्ये
दंगल भडकल्याची, कट्टर धर्मांधतेची
बातमी तर नेहमीच येत असते. त्यातून तेथील भयानक परिस्थितीचा भीतीदायक
अंदाजही लावता येतो. आताची घटना ही बंगालची राजधानी कोलकातापासून
केवळ २८ किमी दूर असलेल्या धुलागड येथील बालीजीपोर गावातील आहे. या गावात ईद-ए-मिलादच्या दिवशी
धर्मांधांनी आपल्या माजोर्या वृत्तीचे दर्शन घडवत शिवमंदिर उद्ध्वस्त
केले. त्यानंतर गावात दंगल भडकली, ज्यात
हिंदूंच्या घरांना आगी लावल्या गेल्या, दगडविटांचा मारा करण्यात
आला, घरात घुसून लुटालूट-तोडफोड केली.
एवढेच नव्हे तर हिंदूंच्या घरांवर देशी बॉम्ब फेकण्यापर्यंत या धर्मपिसाटांची
मजल गेली. मात्र एवढे होऊनही नोटाबंदीवर गल्ली ते दिल्ली कल्ला
करणार्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तोंडातून याविषयी
चकार शब्दही निघाला नाही किंवा सरकारमधील कोणा मंत्र्यानेही याप्रकरणी तोंड उघडले नाही.
उलट मतांच्या आणि तुष्टीकरणाच्या लाळघोट्या राजकारणाची सवय लागलेल्या
ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंग्रेसचा गुलशन मलिक नामक स्थानिक नेताच यामागे असल्याचे
चव्हाट्यावर आले. दंगलीमुळे असुरक्षित झालेल्या हिंदूंनी जेथे
आश्रय घेतला ती मंदिरे आणि हिंदू समहटी संस्था नष्ट करण्याची धमकीही त्याने दिली.
देशभरातील गळाकाढू पुरोगामी आणि अहिंदूंवर अन्याय झाल्याच्या कंड्या
पिकवून फक्त तेव्हाच बाहेर पडणारी सेक्युलर वटवाघुळेही या घटनेनंतर चिडीचूप झाली.
नोटाबंदीमुळे हिंदूंना त्रास झाल्याची भंपकबाजी करणारे केजरीवाल,
जेएनयु-हैदराबादमध्ये पर्यटन करणारे राहुल,
जातीय राजकारणावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजणारे माया-मुलायम, ओवेसी आणि पुरस्कारवापसी करणारा कथित बुद्धिवाद्यांचा
चमको कंपूही या घटनेनंतर चिडीचूप बसला. बालीजीपोर घटनेत तब्बल
६० पेक्षा अधिक परिवारांनी आपल्या गावातून पलायन केले. तरी देशात
असहिष्णुता वाढल्याची बतावणी करणारे चंदेरी दुनियेतील कचकडे आणि राईचा पर्वत करणारे
बोलघेवडे यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला राजी नाहीत. एरवी
अहिंदूंना खरचटले तरी ऊर बडवून घेणारे पोपट आता साधी टिवटिव करतानाही दिसले नाहीत.
त्यामुळे आता तरी या सर्व हिंदूविरोधकांचा खरा चेहरा सर्वांनीच ओळखणे
आवश्यक आहे. तसेच ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी
आहे, त्या पोलिसांनीही दंगलखोरांवर ताबडतोब कारवाई न केल्याने
धर्मांधांचे मनोबल वाढले, अशा अधिकार्यांवरही
आता कारवाई व्हायला हवी, हीच सामान्य हिंदूंची अपेक्षा आहे.
वाली कोण?
बालीजीपोर येथील घटनेनंतर दंगलीचे
लोण इतरत्रही पसरले पण याची कोणाला खबरही नाही. गुजरात, मुझफ्फरनगर आणि दादरीतील दंगल आणि
हिंदूंविरोधात आघाडी उघडणारे बोलभांड बंगालमधील दंगलीनंतर कुठल्या मातीत चोच खुपसून
बसले आहेत? हेही जनतेसमोर आले पाहिजे. बिहारमधील
लालूप्रसादांच्या राजवटीला जंगलराज म्हटले जायचे, तसेच ममता सरकारचेही
दंगलराज नामकरण व्हायला हवे, पण दंगल करणारे धर्मांध मुस्लीमआणि
दंगलग्रस्त हिंदू असल्याने तमामपुरोगामी मुखंडांना सगळे काही मंगलच मंगल भासत असावे,
त्यामुळेच ही जमात ’अगा काही घडलेचि नाही’च्या आविर्भावात मूग गिळून बसली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने
तर याआधीच ममता सरकारच्या दाढी कुरवाळू राजकारणाला फटकारले होते, मात्र तरीही त्यातून धडा न घेणार्या हेकेखोर ममता नोटाबंदीवर
मात्र हाहाकार करतात. हे कुठले लक्षण मानायचे? यातून केवळ पश्चिमबंगालच नव्हे तर देशभरात चुकीचा संदेश जात असून हिंदूंना
हा देश सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होण्याचा धोका आहे. ज्याला
तृणमूल कॉंग्रेससारख्या पक्षांच्या वर्तणुकीने खतपाणीच मिळत आहे.
तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या
अनेक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटना आणि बांगलादेशी घुसखोरांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे
आरोप याआधी झाले, आता
तर अशा घटनांतून हे आरोप सिद्धच होतात. बांगलादेशींची मतपेटी
सुरक्षित करण्याची तर ममता बॅनर्जी आणि तृणमूलची ही चाल नाही ना याचीही आता चौकशी व्हायला
हवी. याच घटनेचा तपास करण्यासाठी भाजप खासदारांचे प्रतिनिधी मंडळ
बालीजीपोर गावी गेले, मात्र त्यांना तेथे जाण्यास पोलिसांकडून
मज्जाव करण्यात आला. देशातील खासदारांना पीडितांना भेटू दिले
जात नसेल आणि राज्य सरकारही हिंदूंना लाथाडत असेल तर त्यांनी कोणाकडे पाहावे?
पश्चिमबंगाल सरकार यालाच लोकशाही म्हणते का?
हिंदूंवर आणि त्यांच्या नेत्यांवर हल्ल्याच्या घटना
केवळ बंगालमध्येच नव्हे तर केरळ आणि उत्तर प्रदेशातही घडल्या. केरळात तर कित्येकांची हत्या करण्यात
आली. येथील कम्युनिस्ट सरकारही हिंदूविरोधाची भूमिका कायम ठेवते.
मात्र धर्मनिरपेक्षतेची जपमाळ ओढणारे मानवाधिकाराचे म्होरके याकडे सोयीस्कर
दुर्लक्ष करतात. या सर्व गोष्टींमुळे हिंदूंनी एकाच छत्राखाली
एक होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते.
- महेश पुराणिक

No comments:
Post a Comment