जेष्ठ शिव चरित्रकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. एका सच्चा शिवराय भक्ताला, त्यांच्या कार्याला मिळालेला हा पुरस्कार उल्लेखनीय आणि समर्थनीय आहे. परंतु काही मंडळी बाबासाहेबांना हा पुरस्कार देण्यावरून स्वार्थी विरोध करण्यात मश्गुल आहेत. या मंडळींना ब्राह्मण समाजातील व्यक्तींचा विरोध करण्याशिवाय दुसरे कोणतेही विधायक काम नसल्याने हे लोक सध्या आदरणीय बाबासाहेबांना विरोध करत आहेत. परंतु शिवराय, राजमाता जिजाऊ आणि मराठा समाजाची जेवढी बदनामी या लोकांनी केली असेल त्याला तोडच नाही.
अवघ्या विश्वाला वंदनीय असणाऱ्या छत्रपति शिवरायांना याच लोकांनी एका जातीत बंदिस्त केले, हे कार्य समर्थनीय म्हणायचे काय.?
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र घराघरात पोचवले असे म्हटले जाते. आता सात समुद्रापार देखील जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग होत आहेत. परंतु ज्यांचे स्वार्थच इतरांवर टीका करण्यावर अवलंबून आहेत ते पुरंदरेंना विरोध करणारच. यांचा विरोध पाहून असे वाटते की, शासनाने महाराष्ट्र भूषणच नव्हे तर प्रत्येक पुरस्कार देताना या समाजद्रोही लोकांना विचारूनच पुरस्कार द्यायला हवा की काय.? यांचा विरोध हा सर्व ब्राह्मण समाजाला आहे. यांना ब्राह्मण समाजाने केलेले उत्तम कार्य कधीही दिसत नाही.
बाबासाहेबांच्या लिखाणावर यांनी केलेले आरोप हे केवळ जातीय द्वेषातून केलेले आहेत आणि त्यांना कोणताही संदर्भ नाही. हे लोक इतिहास वाचताना संदर्भासहित न वाचता केवळ जातीय द्वेषातूनच वाचताना दिसतात. तसेच यांचा आणखी एक अट्टाहास असतो तो म्हणजे, "आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा" अर्थात आम्ही जो कल्पनाविलास करून जातीय द्वेषातून इतिहास लिहू तोच सर्वांनी खरा मानावा. या लोकांशी कोणीही चर्चा करू शकत नाही. कारण हे आपल्या पुस्तकात कत्तली करण्याचेच आवाहन करतात. हि मंडळी कायम इतरांना आरोपी म्हणूनच पुढे आणतात, समोरील व्यक्तीवर कसलाही संदर्भ न घेत गलिच्छ आरोप करायचे, इतिहासाचे आणि राष्ट्र पुरुषांचे विकृतीकरण करायचे हाच एक कलमी कार्यक्रम यांनी आता पर्यंत केलेला आहे. यांची वृत्तीच मुळी हम करे सो कायदा अशी आहे त्यामुळे इथे मतभेदांना अजिबात किंमत नाही.
बाबासाहेबांच्या लिखाणातील कुणबिणी या शब्दामुळे कुणबी समाजाचा अपमान होतो असे हि मंडळी म्हणत आहेत. मात्र इतिहास, भाषा, ऐतिहासिक संदर्भ आणि त्या त्या काळातील सामाजिक परिस्थिती याची कसलीही माहिती असूनही मान्य न करणारी ही जमात सारे काही जातीय चष्म्यातूनच पाहताना दिसते. कुणबीण
या शब्दाचा अर्थ देह विक्रय करणारी स्त्री अशा अर्थाने वापरात होता. कुणबीण म्हणजे कुणबी जातीची स्त्री नव्हे. कुणबीण या कोणत्याही जातीतील समाजातील स्त्रिया असत. तसेच पुरंदरेंच्या लेखनात मुस्लिम द्वेष आहे असाही आक्षेप ही समाजद्रोही मंडळी घेत आहेत. परंतु बाबासाहेबांनी मुस्लिम द्वेष या पुस्तकातून दाखवलेला नाही तर शिवरायांचे शत्रू मुस्लिम होते म्हणून तो शत्रुविरोध आहे. आता शत्रू मुस्लिम असेल तर तो दोष बाबासाहेबांचा म्हणायचं काय.? ब्राह्मण समाजाचा उदो उदो या पुस्तकात केल्याचा आणखी एक अपप्रचार हि मंडळी करत आहेत मात्र या पुस्तकात ब्राह्मण समाजाच्या तत्कालीन दोषांवर भरघोस टीका केलेली आढळते.
बाबासाहेब पुरंदरे हे काही इतिहास संशोधक नाहीत असे त्यांनी स्वतः देखील सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी शिवचरित्र लिहिताना उपलब्ध ऐतिहासिक साधने, पुरावे, संदर्भ यांच्या सह हे पुस्तक लिहिले आहे, जर या समाज द्रोही लोकांना हे पटत नसेल तर त्यांनी स्वतः इतिहास संशोधन करावे. स्वतः खरा इतिहास लिहावा.
परंतु जे शिवराय आणि जिजाऊ साहेब यांचे नाव घेऊन विशिष्ट समाजातील स्त्रियांचा गलिच्छ भाषेत यथेच्छ अपमान करणारे व त्या समाजाच्या कत्तली करण्याचे उपाय सांगणारे इतिहास काय शोधणार. हे लोक केवळ आणि केवळ द्वेषच करतील.
जेम्स लेन प्रकरणी देखील बाबासाहेबांनी ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी प्रेसला पत्र लिहून लेनचे पुस्तक मागे घेण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे तो आरोप देखील निराधार आहे. तसेच लेनला पुस्तक लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी मदत केली असे जे सांगितले जाते ते खरे नाहीच. कारण लेनच्या पुस्तकात ब्राह्मण समाजावर देखील टीका केलेली आहे, आणि जर बाबासाहेब ब्राह्मणवादी असतील तर ते अशा पुस्तकाला कसे काय साहाय्य करतील.?
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की नव्वदी पार केलेल्या एका शिवभक्ताच्या वयाचा जराही विचार न करता केवळ जातीय द्वेषातून विरोध करणारे यातून शिवरायांचा देखील अपमान करत आहेत. समाज यांना आता विचारात नाहीच, आणखी काही दिवसात हि मंडळी देखील इतिहास जमा होऊन जातील हे निश्चित...!
अधिक माहिती येथे मिळेल:

1. http://sanjaysonawani.blogspot.in/2015/05/blog-post_6.html
2. http://harinarke.blogspot.in/2015/05/blog-post.html
3. http://jewatelte.blogspot.in/2015/05/blog-post_8.html
4. http://drabhiram.blogspot.in/2015/05/blog-post_6.html

No comments:
Post a Comment