" कुणबीण : मराठेशाहीतील स्त्री-गुलाम "
' कुणबी ' हा शब्द व्यवसायवाचक आहे . म्हणजे शेती करणारा तो कुणबी . पण हा शब्द जातीवाचकहि आहे . म्हणजे महाराष्ट्रात ' कुणबी ' नावाची जात आहे . उदा. मराठा कुणबी , कोकणी कुणबी , खानदेशी कुणबी , गुजराथी कुणबी वगैरे . या कुणब्याची बायको म्हणजे कुणबीण असा सरळ अर्थ होऊ शकतो . पण मराठेशाहीच्या कागदपत्रांत ' कुणबीण ' हा शब्द या अर्थाने येत नाही . तो ' स्त्री-गुलाम ' या अर्थाने येतो . या ' कुणबिणी ' चा कुणबी जातीच्या स्त्रियांशी काही संबंध नाही , हे ध्यानात घेतले पाहिजे .
जगाच्या पाठीवरील जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृतीत ' गुलामगिरी अथवा दास्यत्व ' याची पद्धत आढळते . मध्ययुगातही ती मोठ्या प्रमाणावर चालू राहिली . आधुनिक काळखंडात स्वत:ला सुसंस्कृत समजणार्या युरोपियनांनी आफ्रिका खंडातील लाखो , करोडो , निग्रोंना श्वापदांप्रमाणे पकडून त्यांचा अमेरिकेत व्यापार केल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे . हिंदुस्थानात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुलामांचा व्यापार होत नव्हता , हे खरे . पण गुलामगिरीची पद्धती राजरोसपणे ब्रिटीशांची सत्ता स्थिर होईपर्यंत चालू होती , हेही तितकेच खरे .
महाराष्ट्रापुरते सांगायचे झाल्यास पुरुष गुलामांपेक्षा स्त्री गुलामांची संख्या मोठी होती ; किबहुना स्त्री गुलामांची खरेदी-विक्री झाल्याच्या नोंदी जशा मराठी कागदपत्रांत अनेक मिळतात , तशा पुरुष गुलामांच्या मिळत नाहीत . पुरुष गुलामांना ' पोरगे ' असे म्हणत आणि त्यांचा जन्म स्त्रीगुलामांच्या म्हणजे कुणबिणींच्या पोटीच झालेला असे . अशा पोरग्यांच्या नोंदी मात्र मिळतात . असे पोरगे आपल्या आईबरोबर विकले जात आणि ते मात्र गुलाम समजले जात . पण त्यांची पुढची पिढी मात्र गुलाम समजली जात नसे . कुणबिणींचा व्यापार करणारे चारण , हेडे हे लोक असत . ते कुणबिणी जशा विकावयास आणत , तशा प्रकारे गुलाम विकावयास आणल्याच्या नोंदी मिळत नाहीत .
मराठी कागदपत्रांत कुणबीण , बटीक ह्या दोन्ही संज्ञा समान अर्थानेच वापरलेल्या दिसून येतात .
( मराठेशाहीचे अंतरंग - डॉ जयसिंगराव पवार )
कुटुंबातील दासी व्यभिचारिणी झाली की तीला बटिक अथवा कुणबीण म्हणत. पेशवाईच्या काळात राजे-रजवाडे, सरदार, श्रीमंत पुरुष आपल्या पदरी कुणबीणी अथवा बटकी बाळगत. पुर्वी दुष्काळ पडला म्हणजे माणसे हलाखीने आपली मुलेबाळे विकत. प्रत्येक सुखवस्तु माणसाकडे कुणबीण ही असायचीच, अशी प्रथा होती. परदेशी लोक भारतात आल्यावर त्यांनीही बटीक बाळगल्या आहेत. म्यलेटने ६५ रुपयांना एक कुणबीण खरेदी केली होती असा उल्लेख आहे. बटकी किंवा कुणबिणी राजेरजवाड्यांना व सरदारांना नजराना म्हणुनही दिल्या जात. हेडे-चारण ई. लोकांचा बटकी विकायचा व्यवसाय असे. (संदर्भ: भारतीय संस्कृती कोश, खंड दुसरा, पान ४५) येथेही कुणबिण कोणत्या एखाद्या विशिष्ट जातीची असे असा उल्लेख नाही.
"शेतकऱ्यांच्या बायका पुरूषांच्या बरोबरीने कामे करीत. मध्यम वर्गातील काही जातीच्या किंवा घराण्यातील स्त्रियांना अर्थार्जनासाठी बाहेर पडता येत नसे. देवांगना, गणिक वगैरे वर्ग समाजात होते. तमाशातही भाग घेत. वाघ्या-मुरळी सर्व महाराष्ट्रात आढळत. कुणबिणी बाळगण्याची चाल महाराष्ट्रात होती."
संदर्भ : मराठी विश्वकोश, http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=1&limitstart=
"राज्यांतील अठरा मोठीं खातीं. यांच्या वर्गीकरणाचे तीन प्रकार आहेत, ते असे ( मोलस्वर्थ व क्यांडी यांच्या कोशाप्रमाणें. ) : ( १ ) उष्टर; खबुतर; जनान; जवाहीर; जामदार; जिकीर; तालीम; तोफ; थट्टी; दप्तर; दारू; दिवान; नगार; पील; फरास; वंदी; मोदी; शिकार-असे अठरा खाने. ( २ ) तोप-पील; उष्टर; फरास; शिकार; रथ; जामदार; जवाहीर; जिराईत; नगार; दारू; वैद्य; लकड; इमारती; मुदबख; कुणबिणी; खाजगत; थट्टी येणेंप्रमाणे- ( ३ ) खजिना दफ्तर; जामदार; पील; जिराईत; अंबर; फरास; मुदबख; नगार; सरबत; आवदार; शिकार; तालीम; दारू, उष्टर; बकरे; तोप; तराफ.
(संदर्भ: केतकर ज्ञानकोश. http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1520-2012-10-22-07-21-32
अदिकल – अंबलवासी जातिसमूहापैकीं एक वर्ग-हे मूळचे ब्राह्मण आहेत असें म्हणतात; परंतु भद्रकालीच्या देवळामध्यें उपाध्यायाचें काम केल्याकारणानें व मांस आणि दारू यांचे नैवेद्य दाखविले म्हणून ते भ्रष्ट झाले. ते यज्ञोपवीत धारण करितात, क्षुद्र देवतांच्या देवळांमध्ये उपाध्यायाचें काम करतात, व दुसरीं देवळांतलीं कामें करतात. लग्न आणि वारसा या बाबतींत ते मक्कत्तयम नियमांप्रमाणें वागतात. ते वृद्धि व सुतक दहा दिवस पाळतात. दहा गायत्रीमंत्र जपतात; त्यांच्याच जातीचे लोक त्यांची भिक्षुकी करितात. त्यांच्या बायकांस आदियम्मा असें म्हणतात. नम्बुद्रि बायकांसारिखे दागिने या वापरतात पण बाहेर जातांना त्यांच्यासारखी ताडाची छत्री घेत नाहींत व त्यांचेप्रमाणें नायर कुणबीण बरोबर नेत नाहींत. [ Castes and Tribes of S. India. Census Report – Travancore (I9II) ]
http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1592-2012-10-23-05-13-48
"ह्याशिवाय गुलामांचाही एक वर्ग होता. अनैतिक गुन्हे केलेल्या किंवा बेवारशी स्त्रिया, मुले, पुरूष इत्यादींना गुलाम समजत. पैकी स्त्रीला कुणबीन म्हणत. ती चांगल्या आचरणाने गुलामीतून मुक्त होई. शिवशाहीत व पेशवाईत २ ते २५ रूपयापर्यत कुणबीण विकत मिळे. त्या वेळी हिंदुस्थानात गुलामांची चाल होती.
संदर्भ : http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10393-2012-07-19-09-14-43?showall=&start=18
संत कान्होपात्राला बेदरच्या बादशहाने आपली ’कुणबीन" बनवायचा प्रयत्न केला होता. तो फसला. कान्होपात्रा कुणबी जातीची नव्हती.
संदर्भ: http://medievalsaint.blogspot.in/2014/03/saint-kanhopatra.html
वरील बाब पाहता कुणबिणी/बटीक ही एक संस्था होती, त्यात विशिष्ट जातीच्याच स्त्रीया असत असे कोठेही दिसत नाही. वेश्या आणि कुणबिणीतील पहरक हा कि कुणबीण ही विकत घेतलेली स्त्री असायची. आपत्तीमुळे स्वत:हुन विकणे, विकले जाणे, पळवुन नेवुन विकणे असे प्रकार होत होते. कुणबिणी विकत घेणारे ऐपत असणारे सर्वच समाजघटक होते. एकाच विशिष्ठ जातीचे लोक कुणबिणी बाळगत असेही दिसत नाही. किंबहुना कुणबिणी बाळगणे ही तत्कालीन प्रतिष्ठेची बाब होती. शिवकालातही कुणबिणींच्या विक्र्या होत असेही दिसते. किंबहुना ही संस्था जगभरची आहे.
आता प्रश्न हा पडतो कि कुणबीण हा शब्द आला कोठुण? "कुणबी" या कृषीवलघटकाशी हा स्त्रीवाचक शब्द आल्याने कुणब्याच्या बायका-पोरीच कुणबिणी बनत असत असा अवमानकारक अर्थ निघणे व संताप येणे स्वाभाविक आहे. पण खरेच तसे आहे काय हे कुणबिण या शब्दाबाबत दिल्या गेलेल्या माहितींत कुणबिणी या कुणब्याच्या बायका असत असा निर्देश कोठेही नाही.
* गुलाम अथवा कुणबिणी कशा केल्या जात ?
रियासतकार सरदेसाई यांनी संपादित केलेल्या पेशवे दप्तराच्या आठव्या खंडात प्रस्तुत विषयावर एक अत्यंत महत्वाचा कागद प्रसिद्ध केला आहे . १८ व्या शतकात अनेक राज्ये हिदुस्थानात , विशेषत: दक्षिणेत , उदयास आली . त्यांच्यात एकसारख्या लढाया , लष्करी मोहिमा , मुलखाची लुटालुट होत असे . धारवाडचा कागद सांगतो की -
" लढाईत कोणी पुरुषास धरीत नाहीत व गावगना लुटीचे समईहि कोणी पुरुषास धरीत नाहीत . गावगना लुटीचे समई बायकास अगर मुलीस मात्र धरून आणितात . परंतु सलुकाने देत नाहीत . बायका व मुली लुटून आणिल्या त्या कुणबिणी होतात . त्यास देशी आल्यावर विकतात . पुरुष कोणी सलुखाने बोलीकरिता देतात अथवा मातबर पाहून बोली धरून आणितात . हे काही गुलामसारखे नव्हेत . बोलीच्या खंडाचा यैवज आल्यावर सोडतात " .
( पेशवे दप्तर , खंड ८ , पृ.३२ )
यावरून स्पष्ट होते कि परचक्राच्या वेळी गावेच्या गावे लुटली जात , त्यावेळी स्त्रियांना व मुलींना पकडून त्यांना गुलाम म्हणून विकले जाई . पुरुषांना खंडणीच्या लोभाने पकडले जाई . खंडणी भरली कि त्यांची सुटका होई .
याशिवाय एखाद्या स्त्रीवर बदकर्म केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास तिला सरकारमार्फत ' कुणबीण ' केले जाई . धारवाडचा कागद म्हणतो -
" शुद्र वगैरे नीच जातीची स्त्री छिनाल्यास सापडली असता , तिच्या भ्रतारास आगर तिजला दंड द्यावयास सामर्थ्य नसल्यास , विशेष प्रसिधीच्या ग्रहस्ताची नसल्यास , क्वचित कोठे येखादा मक्तेचा मामलदार कुणबीण करून कोठीत ठेऊन कोणास देत होता अथवा विकीत होता . यास शास्त्र नाही . जुलमाने कुणबीण करितात . शास्त्रांत कुणबीण करावी आसे नाही . काही दंड काही प्रायश्चित आसे आहे . त्यात दंडायैवजी कुणबीण करतात जुलमाने ."
( पेशवे दप्तर , खंड ८ , पृ.३२ )
त्याकाळी भयंकर दुष्काळ पडत . हजारो , लाखो माणसे अन्नाविना तडफडून मरत . अशा वेळी आईबाप आपली मुलेमुली विकत असत . अशी मुले मुली विकत घेणार्याच्या घरी गुलाम म्हणून राहत असत . अशा मुली मोठ्या झाल्या कि त्या कुणबिणी म्हणून घरीदारी काम करत .
( मराठेशाहीचे अंतरंग - डॉ . जयसिंगराव पवार )
* कुणबिणींचे दोन प्रकार : खासगी आणि सरकारी
समाजातील प्रतिष्ठीत लोक आपल्या घरकामासाठी बाजारातून एखादी गृहोपयोगी वस्तू आणावी , त्याप्रमाणे कुणबीण विकत आणत असत .
सरकारी कुणबिणी म्हणजे सरकारच्या मालकीच्या अथवा सरकारच्या ताब्यात असणार्या कुणबिणी .
* गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता ?
गोविंद पानसरे आपल्या ' शिवाजी कोण होता ? ' ह्या पुस्तकात Sarkar J.N . Shivaji and his times ,P.365 हा संदर्भ वापरून लिहितात -
" त्या काळात हिंदू व मुसलमान , राजेरजवाडे , इनामदार यांचा लढाईस जाताना जनानखाने , कुणबिणी व कलावंतिणी बरोबर नेण्याचा रिवाज होता . परमुलखातल्या स्त्रियांना बटकिणी बनवण्याचा अन भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता . त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता कि ,
" मोहिमेस जाताना कुणीही बटकिणी , कुणबिणी अगर कलावंतिणीस बरोबर घेऊ नये . कुणाही स्त्रीस बटकीण बनविता कामा नये . "
( गोविंद पानसरे - ' शिवाजी कोण होता ?' - तिसावे पुनर्मुद्रण २०१२ - पृ . १५ )
* डॉ . एस एन सेन यांनी १९२८ साली लिहिलेल्या The Military System of Marathas या ग्रंथात " ब्राउटन , Letters From a Maratha Camp , pp.-112-13 " हा संदर्भ वापरून पेशव्यांच्या लष्करी मोहिमे बद्दल सांगताना लिहितो -
" खाजगी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्याबरोबर त्यांच्या बायका आणि कुणबी , तसेच नर्तिका , जादुगार , वेश्या असत . "
सध्या काही समाजद्रोही मंडळी मराठा समाजाच्या स्त्रिया म्हणजेच कुणबिणी असा अर्थ घेऊन मराठा स्त्रियांना कुणबिणी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यातून ते आपल्याच समाजातील स्त्रियांचा, आपल्या पूर्वजांचा अपमान करत आहेत, बदनाम करत आहेत. तसेच महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यामुळे विरोध करत असून, बाबासाहेबांना मराठा विरोधक आणि ब्राह्मण वाद पूजक ठरवत आहेत. तरी मराठा समाजाने स्वतःच स्वतःच्या स्त्रियांचा या समाजद्रोही मंडळींच्या नादाला लागून अपमान करून घेऊ नये, आणि आपण ९६ कुळी, क्षत्रिय कुलवंत आहोत याचे भान ठेवून आपल्या स्त्रियांचा आणि पूर्वजांचा सन्मान करावा हि अपेक्षा.
<< या लेखातील संशोधन आणि लेखन हे श्री. संजय सोनवणी आणि श्री. राहुल रांजणगावकर यांनी आपल्या ब्लोग वर केलेले आहे. अधिक माहितीसाठी वाचकांनी खालील ब्लोगला भेट द्यावी हि विनंती. त्यांच्या लिंक येथे देत आहे.>>
1. http://sanjaysonawani.blogspot.in/2015/05/blog-post_7.html
2. http://jewatelte.blogspot.in/2015/05/blog-post_8.html

He tya Avhadla sanga..
ReplyDelete