Saturday, 16 May 2015

त्यांना मुळापासून उखडून फेकायलाच हवे...!


इस्लामच्या नावाखाली जिहादची आरोळी देणाऱ्या जागतिक मुस्लिम संघटनांनी अमानुषतेचा कळस गाठला आहे. या तथाकथित शांतातावाद्यांनी रक्त मांसाचा सडा पाडला नाही असा एकही दिवस गेल्या काही वर्षात उजाडला नाही आणि उजाडतही नाही. निष्पाप, निरपराध, निरागस जीवांच्या रक्ताचा सडा पाडणे हा कसला धर्म, कसला जिहाद, कसली शांतता, हि कसली शिकवण.?

खरे म्हणजे हा तर अधर्मच म्हणायला हवा. पाकिस्तान, सिरीया, लिबिया, इराण, इराक आणि अजूनही कितीतरी देशात इस्लामी मुलतत्ववादी इतरांचे जीवन संपवण्याचा अमानुष, रानटी नंगानाच करत आहेत. हा संघर्ष मुस्लिम देशात मुस्लिम विरुद्ध मुस्लिम असाच मोठ्या प्रमाणत सुरु आहे, आणि जोडीला तेथील इतर धर्मियांना देखील निर्दयपणे ठार केले जात आहे. शिया आणि सुन्नी हा संघर्ष शेकडो वर्षापासून सुरु आहे. इस्लामी मुलतत्ववादी सुन्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या मुस्लिमाला मुस्लिम मानतच नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते सर्व काफिरच समजले जातात. आणि त्यांच्या मतानुसार काफिरांना मूळ इस्लाम कबुल केल्याशिवाय जगण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणून त्यांची राजरोस कत्तल करण्याचे एकमेव उद्दिष्ट या संघटनांनी आपल्या समोर ठेवले आहे.

'इसीस',  ‘जुन्दुल्लाह’ सारख्या इस्लामी कट्टरता वादी संघटना धर्माच्या नावावर अधर्मच करत आहेत. अत्यंत निर्दयीपणे डोक्यात गोळ्या घालून , महिलांना निर्दयपणे हालहाल करून, लहान मुलांना कापून, तुकडे करून, या संघटना त्याचे व्हिडीओ इंटरनेटवरून प्रसारित करण्याचे अमानवी चाळे करत आहेत.
इस्लाम जातपात मानत नाही, जातीभेद मानत नाही. इस्लाम हाच जगातील एकमेव सर्वसमावेशक धर्म आहे, असे डांगोरे इस्लामी अभ्यासक, इस्लामचे तत्त्ववेत्ते आणि मुल्लामौलवी नेहमीच पिटत असतात. हिंदूंची धर्मांतरे घडवण्यासाठीही अशा थापा मारल्या जातात. या सर्व थापाड्यांचे इस्लामी देशातील सुन्नी मुस्लिमा व्यतिरिक्त इतरांचे हत्याकांड यावर काय म्हणणे आहे, हेदेखील आता जगासमोर यायला हवे.

हिंदू धर्म जातीपातींमध्ये विखुरला गेला आहे, वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे नुकसान झाले हे खरेच, पण हिंदू धर्मातील जाती-पाती कधी अशा एकमेकांच्या रक्ताला चटावल्या नाहीत. एकमेकांच्या छाताडावर बसून आपल्याच धर्मबांधवांचे रक्त पिण्याचे क्रौर्य हिंदू धर्मात तरी कधी झालेले नाही. हिंदू धर्मातील जातीभेदावर बोट ठेवून धर्मांतरे घडवणार्‍या मुल्ला मौलवींनी आधी आपल्या बुडाखाली काय जळते आहे ते पाहावे.

मुळात शिया आणि सुन्नी हा संघर्षही काही नवीन नाही. (आता सुन्नी विरुद्ध इतर सर्व काफिर, त्यात हिंदू देखील आलेच) मोहंमद पैगंबरांच्या मृत्यूपासूनच हा रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष उद्या जगासाठी डोकेदुखी ठरू शकतो. भारतात देखील यांच्या पिलावळी आपले हातपाय पसरवण्यासाठी आतुर झालेल्या आहेत. भारतात देखील या धर्मांधांना असेच हत्याकांड करण्याची इच्छा आहे. अधून मधून त्यांचे हस्तक आपले विखारी दुर्विचार उधृत करून भारत अशांती माजवण्याचा प्रयत्न करतच असतात. या इस्लामी कट्टरता वाद्यांचा धोका वेळीच ओळखून दोन्ही पंथांतील धर्मांधांना नेस्तनाबूत करण्यासाठी जगभरातील देशांनी, भारतातील मुस्लिम संघटना तसेच राजकीय नेत्यांनी देखील पुढे येण्याची आवश्यकता आहे. वाढता इस्लामी दहशतवाद रोखण्यासाठी संयुक्त व्यूहरचना आखायला हवी. अन्यथा हा रक्तपात जगभर पसरेल.

केवळ मुस्लिम धर्मीय म्हणजे अल्पसंख्याक आणि त्यांच्या विरुद्ध बोलायचे नाही, अथवा शेपूट घालून बसायचे हे भारतीय राजकारण्यांनी टाळले पाहिजे. जे इस्लामी देशात सुरु आहे त्याचे लोण भारतातही पसरू शकते. हे संकट ओळखून कट्टरतावादी जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध आताच उपाय योजना करायला सुरुवात केली पाहिजे. या मानवी रूपातील अमानवांकडे मानवाधिकाराच्या  दृष्टीने पाहून देखील काही उपयोग नाहीच, कारण ते जर मानव असते तर त्यांनी इतर मानवांना संपवण्याचा प्रकार कधी केलाच नसत, ते अमानुष आहेत आणि त्यांच्याशी तसेच वागले तरच जगात मानवी समाजाचे अस्तित्व टिकेल, त्यांना (कट्टरता वादी) मुळापासून उखडून फेकायलाच हवे...!

<< संदर्भ -  सामना, अग्रलेख, १६/०५/२०१५ >>

No comments:

Post a Comment