शुगर कोटेड प्रचारतंत्र नावाचा एक प्रकार असतो, ज्याला शुद्ध मराठीत साखरपेरणी म्हणतात. यात प्रचार करणारा असा काही गोड, मधाळ, रसाळ बोलून आपला माल खपवतो की, ऐकणाऱ्याला कधी समजतही नाही की आपण आपलेच इमान समोरच्या व्यक्तीच्या हाती दिले आहे. अशा प्रकारे प्रचार करण्यात जगभर पटाईत असलेली जमात म्हणजे मिशनरी...! दीन दुबळ्यांचे तारणहार, पतितांचे पालनहार म्हणून हि मंडळी आपली दुकाने मांडून बसतात येशु देवाच्या नावाने...
जगात जिथे जिथे गरीबी, दैन्य, दारिद्र्य, रोगराई, अस्मानी संकटे येतात-असतात तिथे ही मंडळी जाऊन पोहचतात आणि आपला शुगर कोटेड प्रचार सुरु करतात.
भारतात आलेला पहिला प्रचारक मिशनरी ते आता पर्यंतचे सारे प्रचारक मिशनरी अशाच गोड, रसाळ बोलण्याने इथल्या समाजाला भुलवत राहिले. आणि त्याला गोंडस नाव दिले, मानवसेवेचे...! किती सुंदर शब्द आहे नाही, मानवसेवा, पण या सेवेमध्ये कोणता मेवा दडलाय हे जगाने कधी सांगितले नाही की कोणी त्याविरुद्ध बोलले तर त्याला जगूही दिले नाही.
लोकांच्या दुक्खावर पोसणारी हि मंडळी म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाणार्यातलाच प्रकार आहे.
भारतातील आदिवासी बहुल भाग, पूर्वोत्तर राज्ये, गोवा, केरळ, नागालैंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, बंगाल सारीकडे यांनी सुरुवातीला समाज सेवेच्या संस्था सुरु केल्या. रुग्णालये, शाळा, कृषी आधारित संस्था स्थापन केल्या. जनता जमू लागली की, कोणीतरी आलाय आपल्या कल्याणासाठी असे समजून. या सगळ्याचे मूळ कार्य काय तर मानवसेवा, पण याचं ध्येय कधी मानवसेवेच नव्हतंच हो... त्या खोटेपणाच्या आडून यांना आपला धर्म इथे वाढवायचा होता, पोसायचा होता...
जर तुम्हाला मानवसेवाच करायची असेल तर तिथे येशूची प्रतिमा, मूर्ती कशाला ठेवता मग.? येशूच्या मुर्तीविनही मानवसेवा करता येऊ शकते... समाज सेवा करायला धर्माची आवश्यकता कशाला हवी यांना... आजार बरे करायला बायबल मधील वाक्ये आणि प्रार्थना कशाला हवीत यांना... तर येशूची मूर्ती, प्रतिमा का ठेवायची, तर त्यामागे शास्त्र आहे... जनतेला सेवा तर द्यायची पण जनतेने विचारले की, ही प्रतिमा कोणाची आहे, तर यांनी सांगायचे हि प्रतिमा देवाची आहे... जनता विचारणार कोणता देव, मग हे सांगणार येशुबाप्पा... आणि सांगणार आम्ही या देवाच्याच आज्ञेने येथे तुमच्या कल्याणासाठी आलोय... जनता, अरे व्वा, म्हणजे तुम्हाला या देवाने पाठवले... तर मग हा देव किती सुंदर असेल... मग मिशनरी म्हणणार हो देव सुंदर आहे, देव प्रीती आहे, देव दयासागर आहे... जनता भुलणार... मग हे मिशनरी लगेच तथाकथित मानवसेवेच्या संस्थेत प्रार्थना गायला सुरुवात करणार... जनता आपल्यावर कृपा करणार्याची प्रार्थना ऐकून क्षणभर तिथेच घुटमळणार, मग रोज येणार, आणि ही मिशनरी मंडळी यांना एके दिवशी बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करवून घेणार...
हे असेच चालत आलेय आजपर्यंत सारीकडे... शुगर कोटेड प्रचार... मानवसेवेच्या नावाखाली... अज्ञानी, अडाणी, रंजल्या, गांजल्या जीवांच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या ख्रिस्ती जाळ्यात ओढणारी ही दयासागर मिशनरी मंडळी...
ख्रिस्ती धर्म हा काही भारतीय धर्म नव्हे... मग ख्रिस्ती धर्माचे अनुयायी भारतात कसे तयार झाले, कशी वाढत आहे ख्रिस्ती लोकसंख्या... अशाच प्रकारे, शुगर कोटेड प्रचाराच्या जोरावर... जर मानवसेवा एवढे एकच यांचे कार्य असते तर मिशनर्यांनी मानवसेवा करून पुन्हा त्यांच्या देशात जायला हवे होते, चर्चेस बांधून भारतमातेच्या जीवावर जगायला कशाला हवे... जगातील सर्वात पाताळयंत्री, बेरकी मंडळी म्हणजे मिशनरी लोकं... उगाच नाही ख्रिश्चन लोकसंख्या एक नंबर आहे, अशा प्रकारेच जमवली आहे सगळी लोकसंख्या...
शुगर कोटेड प्रचार हा यांचा प्रमुख भाग आहे प्रचाराचा, धाक दडपशाही, जबरदस्ती अशा प्रकारे देखील ख्रिस्त्यांचा धर्म प्रसार सुरूच असतो... त्यातही मागे नाहीयेत मिशनरी... दयासागर दयासागर दयासागर मिशनरी...!!!

No comments:
Post a Comment