५ सप्टेंबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा वेध...!
***
***
लोकशाही आणि लोककल्याणाशी असलेली आपली निष्ठा आणि बांधिलकी सांगत आमआदमी पक्ष आणि पक्षाचे संस्थापक केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या राजकीय पावित्र्याचे प्रदर्शन संपूर्ण देशभर मांडले, सत्ताही मिळवली. मात्र आता याच पक्षाचा आणि त्यांच्या नेत्यांच्या कथित सज्जनपणाचा बुरखा टराटरा फाटला जात आहे. ज्या स्वच्छ, पारदर्शक आणि प्रामाणिक कारभाराचे स्वप्न दाखवून आमआदमी पक्ष सत्तेत आला त्याच पक्षातील लोकांच्या निरनिराळ्या भानगडी समोर येत आहेत. नुकतेच या पक्षाचे एक नेते आणि मंत्री संदीपकुमार यांना लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली. याच आरोपामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदावरही पाणी सोडावे लागले. दिल्लीच्या लोकांनी ’बावनकशी सोने’ समजून ज्यांना निवडून दिले, त्यांचेच पितळ यातून उघड पडल्याचे दिसून येते.
संदीपकुमार यांनी प्रथमआपण दलित असल्यामुळेच आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा कांगावा केला. मात्र त्यांची ही खेळीही काही उपयोगी पडली नाही. याच पक्षाच्या खेतानांनी, तर आपल्या मंत्र्याच्या बचावासाठी भारतरत्न महापुरुषांच्या खाजगी आयुष्याचाही वापर करण्याचा उद्दामपणा केला. मात्र, जो पक्ष साधनशुचितेचा गवगवा करून राजकारणात शिरला, त्याच पक्षातील नेते निरनिराळ्या आरोपांनी आणि गुन्ह्यांनी घेरण्याचे कारण काय? ज्या केजरीवालांनी आपल्या प्रत्येक उमेदवाराच्या पूर्वायुष्याची काळजीपूर्वक तपासणी आणि छाननी करूनच त्यांना तिकीट दिले जाईल, असे घोषित केले, त्याच पक्षात एकाहून एक सरस आरोप असणारे लोक सापडण्याचे कारण काय? राजकारणातील घाण साफ करण्यासाठी आपला अवतार झाल्याचे ज्यांनी कंठशोष करून सांगितले, त्याच पक्षात तीच घाण अंगावर घेऊन बागडणारे लोक कसे काय? हे प्रश्नही यानिमित्ताने येथे उपस्थित होतात. याचे कारण केजरीवाल यांचा अहंगंडच आहे. केवळ मी म्हणेल तेच खरे, तेच विश्वासपूर्ण असा दावा करणार्या केजरीवाल यांना खरे तर आपल्या पक्षात आपण कोणत्या लोकांचा भरणा केला आहे, ते तपासण्याची गरज आहे.
जेव्हा पक्षातील गैरकारभाराला योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी विरोध केला, तेव्हा त्यांना पक्षातून धक्के मारून हाकलण्यात आले. आताच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सिडीही जवळपास १५ दिवस केजरीवालांकडे पडून होती, तरी त्यांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. प्रकरण पुढे गेले तेव्हा त्यांनी संदीपकुमारला बडतर्फ केले. याचाच अर्थ या गैरकारभाराला केजरीवालांचीही संमती होती, असाच नव्हे काय? कदाचित या १५ दिवसांत दोघांत काही ’अर्थ’पूर्ण चर्चा झाली असण्याचीही शक्यता आहे आणि योग्य बोलणी न झाल्यानेच शेवटी सारे काही फिसकटून त्याची परिणती हकालपट्टीत झाली असेल. आता चौकशीनंतर सत्य जे काही आहे ते उजेडात येईलच, मात्र अशा प्रकरणातून केजरीवाल आणि कंपनीकडून लोकांचा भ्रमनिरास तर नक्कीच झाला. याआधीही याच पक्षाच्या नेत्याचे बनावट पदवीप्रकरण आणि एकाचे लाच प्रकरण उघड झाले होते. एवढेच नव्हे, तर ‘आप‘च्या १२ आमदारांवरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याच पक्षाच्या खासदाराने देशाच्या सुरक्षेशी खेळ करत संसदेचे चित्रीकरण केले, ज्यामुळे ‘आप‘ची मानही कायद्याच्या कचाट्यात अडकली.
साळसुदपणाचा आव आणून राजकारणातील ’हमाममे सब नंगे’ या उक्तीच्या नेमके उलट म्हणजे साफ-स्वच्छ असे आमचे वर्तन असेल, असा दावा करणार्या पक्षातच आरोपांनी घेरलेले लोक असावेत, हे त्यामुळेच लक्षणीय आहे. लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे सांगत आणि आम्ही इतरांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करत सत्तेत आलेल्या केजरीवाल आणि ‘कंपू’ने दिल्लीतील जनतेची तर दिशाभूल केलीच आहे, आताही हा पक्ष दुसरीकडे निवडणूक लढविण्याची, ती जिंकण्याची भाषा करत आहे. नुकतेच पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोपही याच पक्षातील एका नेत्यावर झाला. मात्र, कायमदुसर्याच्या डोळ्यातील कुसळ पाहण्याचेच कामकरणारे केजरीवाल आणि त्यांचा पक्ष संदीपकुमार प्रकरणाने चांगलेच अडचणीत आले आहेत, हेही खरे!
-- महेश पुराणिक

No comments:
Post a Comment