पर्णालपर्वतग्रहणाख्यानाच्या चौथ्या अध्यायात "अत्यंत आनंदित झालेल्या पंधरा कवींनी आणि त्यांनी वाढवलेल्या ब्राह्मणांनी मोठ्या प्रेमाने गायलेली आपली कीर्ती सावकाशपणे ऐकत ऐकत महाराज (म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ) पालखीतून उतरले "असा उल्लेख येतो , बहुदा ही शिवस्तुती म्हणजेच अनुपुराण / शिवभारत असावे कारण कवींद्र परमानंद हे इसवी सन १६६४ साली गागाभटांना राजापूर येथे भेटल्याचा उल्लेख आहेच ,तसेच शिवभारतात शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना "जो राजगडचा अधिपती जो पृथ्वीवर राज्य करत आहे "असे शब्द वापरले आहेत. इथे शिवाजीमहाराजांना रायगडचा अधिपती म्हटलेले नाही ,तसेच पर्णालपर्वत ग्रहणाख्यान मध्ये १६७२चा प्रसंग रंगवताना शिवस्तुतीचा उल्लेख याला पूरक आणि योग्य ठरतो. थोडक्यात शिवभारत हे इसवी सनाच्या १६७४ पूर्वी रचले गेले असे म्हणावयास पुरावे मिळतात.
इसवी सन १६७४ लक्षात घेण्याचे कारण म्हणजे ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे , आणि यात ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला असा जावईशोध अनेक जणानी लावला ,आणि त्याचे कारण पृथ्वीवर क्षत्रिय नसल्याने ब्राह्मणांनी त्याला विरोध केला असे सांगितले जाते (अर्थात तसा कोणताही पुरावा आजपर्यंत उपलब्ध नाही ), आता शिवाभाराताची कालनिश्चिती ही १६७४ च्या पूर्वी आहे हे वर सांगितले आहे ,आता याच शिवभारताच्या ५ व्या अध्यायाच्या श्लोक संख्या ३४ पासून पुढे पृथ्वीमाता ब्रह्मदेवाला आपले गाऱ्हाणे सांगत असून यात पृथ्वीची तत्कालीन परिस्थिती मांडली आहे ,आता श्लोक ४० पासून ४३ मध्ये हे हृदयद्रावक वास्तव लिहिले आहे ,त्यात स्पष्ट उल्लेख आहे "क्षत्रिय लयास चालले आहेत ". आता काविन्द्रानी इथे चालू वर्तमान काळ वापरला असून ,क्षत्रियांची ताकद क्षीण होत चालली आहे असे म्हटले आहे ,अन्यथा त्यांनी क्षत्रिय पृथ्वीवर नाही असे म्हटले असते , परंतु तसे त्यांनी म्हटलेले नाही.
त्यामुळे या पुराव्यांवरून सहज सिध्द होते की , पृथ्वीवर क्षत्रिय नव्हते म्हणून ब्राह्मणांनी राज्याभिषेक करावयास विरोध केला या आरोपात तथ्य नसून ,तो निव्वळ जावईशोध असेच म्हणावे लागेल
शिवराम कार्लेकर ,पुणे
संदर्भ :- शिवभारत
पर्णालपर्वतग्रहणाख्यान
पर्णालपर्वतग्रहणाख्यान
No comments:
Post a Comment