प्राण्यामध्ये कळपात राहणारे प्राणी अशी एक वर्गवारी असते. माणसेही अशीच असतात. माणूस देखील वेगवेगळे कळप करून राहतो. त्या प्रत्येक कळपाची वेगवेगळी जीवन शैली, संस्कृती आणि वैचारिक भूमिका असते. आपल्या कळपातील सदस्या व्यतिरिक्त इतरांबद्दल नेहमी संशय बाळगला जातो की, इतर व्यक्ती आपल्या विचारांना धक्का पोहचवेल किंवा धोका उत्पन्न करेल. म्हणून एखादी इतर व्यक्ती जर विशिष्ट कळपात गेली तर आणि त्याने जर वेगळा विचार मांडला की लगेच त्या व्यक्तीवर विशिष्ट कळपातील कर्तेधर्ते गुरकावतात. त्यांना आपल्या विचारांना धोका निर्माण झाल्यासारखे वाटते.
याच कळपाची आणखी एक मानसिकता असते. जसे की, आमच्या कळपाने जे सांगितले तेच सत्य, मग ते असत्या असले तरीही आणि त्याला काही पुरावे नसले तरीही केवळ ते सांगतायेत म्हणून त्यावर विश्वास ठेवायला हवा असा त्यांचा अट्टाहास किंवा दुराग्रह असतो. तसे हे सर्व कळप कितीही तत्वशुद्ध, तटस्थ, वस्तुनिष्ठ दृष्टीकोन असायला हवा असे सर्वांना सांगत असले तरी ते कळप मात्र नेहमी पूर्वग्रह दुषित दृष्टिकोनातूनच वागत असतात.
या कळपातील जे सदस्य इतरांवर टीका करतात किंवा इतरांचे दोष दाखवतात त्यांना आपले दोष दिसत नसतात आणि ते जर दाखवून दिले तर ते आपल्याला प्रतिगामी ठरवून मोकळे होतात. तसेच कळपातल्या सदस्या व्यतिरिक्त कोणी काही वेगळे बोलले तर ते कसे चुकीचेच आहे हे सांगण्यासाठी त्यांच्यात अहमहमिका सुरु असते.
या प्रकारचे अनेक कळप सध्या देश विदेशात कार्यरत आहेत. आणि महत्वाचे म्हणजे ते सर्व परस्पर विरोधी असून ही सारे सत्य, वस्तुनिष्ठ आणि तत्वशुद्ध देखील आहेत हे विशेष.
- महेश

No comments:
Post a Comment