जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, हे हजारदा सांगूनही, भारत सरकार गेल्या ६७ वर्षापासून हा प्रश्न सोडवू शकले नाही, यासारखी लाजिरवाणी गोष्ट जगात दुसरी कुठलीच नसेल.!
मसरत आलम नावाच्या दहशतवाद्याला त्याने केलेल्या देशद्रोहाबद्दल अटक केली तर फुटीरतावादी पिलावळीनी थयथयाट केला. निदर्शने, मोर्चा, हिंसक आंदोलने करून खोऱ्यातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न केले जे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे.
या फुटीरतावादी प्रवृत्तीच्या सापांची तोंडे बंद करण्याची वेळ आलेली असून जे काम या आधी झाले नाही ते काम या सरकारने तरी करून दाखवावे.
जम्मू व काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना स्थानबद्ध केल्यानंतर पाकिस्तानात काश्मीर मुक्त करण्याचे नारे दिले जात असून पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांच्या साथीने काश्मीरसाठी 'जिहाद' पुकारल्याची घोषणा मुंबईवरील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि लष्कर ए तोयबाचा संस्थापक व जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद याने शनिवारी केली आहे.
या अशा प्रवृत्तींच्या पाठींब्याने जर फुटीरतावादी गट काश्मीरमध्ये काम करत असतील तर त्या सर्वांना आता तिहार अथवा एखाद्या स्वतंत्र कारागृहात टाकण्याची वेळ आलेली आहे. तसेच जो देश जन्मापासून आपल्याला केवळ त्रास देत आला आणि आपण त्याचा त्रास सहन केला त्यालाही नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे.
स्वातंत्र्यासाठीचे हे आंदोलन येत्या काही आठवडय़ांत इतके तीव्र होईल की भारताला काश्मीर सोडून द्यावे लागेल, अशी दर्पोक्तीही हाफिज सईद याने केली.
हाफिज सईदला पाकिस्तानातून पकडून आणून अथवा त्याचा खात्मा करून त्याचे शीर भारतीय सीमेवर लटकावण्याची गरज आहे कि, ज्यामुळे दहशतवादी आणि फुटीरतावादी यांना जरब बसेल.
भारताला उघड उघड धमकी देणाऱ्या या हाफिज सईद व त्याला पोसणाऱ्या देशाला अस्तित्वहीन करण्याची गरज आहे. भारताला काश्मीर सोडून द्यावे लागेल म्हणणाऱ्या, हाफिज सईदला एकदाच सांगावेसे वाटते, बाबारे आम्ही जोपर्यंत शांत होतो तोपर्यंत तू जगलास. आमच्या नादी नको लागू कारण जो आमच्या नादी लागेल त्याची खांडोळी खांडोळी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत.
'जिहाद' हे प्रत्येक इस्लामी राष्ट्राचे कर्तव्य आहे. पाकिस्तान सरकार व लष्कराने काश्मिरी जनतेला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या जिहादमध्ये ते उतरतीलच, असेही हाफिज सईद म्हणाला.
काश्मिरी जनतेला जिहाद साठी पाठींबा देणाऱ्या पाकिस्तान लष्कराविरुद्ध व त्या देशाविरुद्ध भारतीय राज्यकर्ते केवळ निषेधच व्यक्त करणार कि, पाकिस्तानला त्याची लायकी काय आहे, हे दाखवून देणार हा खरा प्रश्न आहे.
देशात गेल्या ६७ वर्षात साठलेली घाण आपण साफ करणार आहोत, करत आहोत, असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी गेल्या ६७ वर्षापासून भारताला स्वतःच्याच भूमीसाठी झगडत ठेवणाऱ्या देशालाही सुपडा साफ करावे एवढीच अपेक्षा...!
जय हिंद...!

No comments:
Post a Comment