संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी चळवळी किंवा इतर पुरोगामी व तथाकथित सेक्युलर मंडळी आजकाल ब्राह्मण समाजाबद्दल आणि हिंदुत्व वाद्यांबद्दल जे अनेक गैरसमज पसरवत आहेत त्यातून हे लोक हिटलर नीती अवलंबत असल्याचे दिसते.
अगदी हेमंत करकरे, नरेंद्र दाभोळकर आणि आता गोविंद पानसरे यांच्या मृत्युनंतर जे काही आरोप झालेत ते सर्व ब्राह्मण समाज आणि हिंदुत्व वाद्यांवरच झाले आहेत. परंतु यातील एकही आरोप करणारी व्यक्ती, संस्था, संघटना कोर्टात मात्र गेली नाही. केवळ पुरावे असल्यासारखे आणि आपणच न्यायाधीश असल्यासारखे यांनी हिंदुत्व वाद्यांना गुन्हेगार ठरवून टाकले आहे. तसेच ब्रिगेड कडून जो काही अप प्रचार ब्राह्मण समाजाबद्दल चालू आहे तो देखील बिनबुडाचा आहे. याच संदर्भात ब्राह्मण समाजाची माफी देखील खेडेकरांनी मागितली आहे. मात्र यांचे बगलबच्चे काही सुधारताना दिसत नाहीयेत. एकूणच समाजातील वातावरण हे द्वेषाचे आहे आणि अनेक जन विशिष्ट समाजातील तरुणांची ब्राह्मण समाज व हिंदू धर्माबद्दल चिथावणीखोर भाषा वापरून माथे भडकवत आहेत. यांच्या जवळ समाजाच्या उत्कर्षासाठी कोणताही ठोस कार्यक्रम नसून केवळ विद्वेषाच्या आगीवर आपली राजकीय पोळी भाजण्याचा यांचा डाव आहे.
ज्या ब्राह्मणी संकटावर मागल्या दशकात पुरोगामी पिंड व पाखंड पोसला गेला आहे, ज्या ब्राह्मणी संकटावर ब्रिगेड उभी राहिली आहे, ज्या ढोंगा आधारे हि मंडळी विशिष्ट समाजातील सामान्य जनतेची माथी भडकवत आहेत आणि केवळ विद्वेषाचा प्रचार, प्रसार करत आहेत त्याची नाळ केवळ हिटलरशीच जोडली जाऊ शकते. कोणत्याही सभा, अधिवेशनात, संघटनेत, पुस्तकात किंवा अन्यत्र कुठेही चाललेल्या ब्राह्मणवादी बागुलबुवाचे वर्णन हिटलर छान करतो.
एकदा हिटलरला विचारण्यात आले, की ज्य़ु जमातीचा संपुर्ण नि:पात करण्यात यावा असेच तुझे मत आहे का? त्यावर त्याने दिलेले मत डोळ्यात अंजन घालणारे आहे. तो म्हणाला, ‘ छे छे, ज्य़ु नावाचा कुणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्य़ु नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल, असा कोणीतरी हाडामासाचा, खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा शत्रू नसेल तर लोकांना चिथावता येत नाही. केवळ अमुर्त कल्पना पुढे करून ही गोष्ट साध्य होत नाही.’
यातून हिटलरने हेच सांगितले आहे की चळवळ उभी करण्यासाठी (अर्थात आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी) कोणीतरी आपला विरोधक आहे, आणि त्याचे जिवंत असणे आपल्या विनाशाला कारणीभूत आहे असा काल्पनिक शत्रू उभा करावा लागतो आणि त्याच्या अनुषंगाने सामान्य जनतेला चिथावणी द्यावी लागते. तरच चळवळीचे अस्तित्व टिकून राहू शकते. आणि समाज ही अशा चिथावणीला बळी पडतो.
यावरून असेच दिसते की ब्रिगेड किंवा पुरोगामी अथवा दांभिक सेक्युलरांनी उभारलेला ब्राह्मणी बागुलबुवा हा केवळ आणि केवळ त्यांच्या राजकीय स्वार्थासाठीच उभारलेला असून त्याचे सत्यात अस्तित्व कुठेच नाहीये.
(((((पोस्ट मधील काही भाग हा संदर्भासाठी वापरला आहे, भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉग वरून.)))))

No comments:
Post a Comment