Wednesday, 29 April 2015

शिवरायांचे खरे शत्रू...!


आजकाल समाजद्रोही आणि इतिहासद्रोही संघटनांचे भलतेच पेव फुटले असून तद्दन विकृत, खोटा आणि दिशाभूल करणारा इतिहास पुस्तकांच्या व व्याख्यानांच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या माथी मारण्याचा क्रूर प्रकार ही लोकं करत आहेत. वास्तविक इतिहास, त्यातील सत्यता पडताळून न पाहता केवळ द्वेषाच्या आधारे विशिष्ट जातीसमुहाला टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध बहुजन समाजाला भडकवण्याचा हा प्रकार आपल्या सर्वांच्या प्रयत्न व सहकार्याने हाणून पाडण्याची आज खरे म्हणजे आवश्यकता आहे. कृष्णाजी भास्कर या अफझलखानाच्या वकीलापासून शिवरायांचे सर्व विरोधक हे ब्राह्मण असल्याचे सांगण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. परंतु ज्या ब्राह्मण योद्ध्यांनी शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली त्या बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, शिवरायांचे वकील बोकील, अष्टप्रधान मंडळातील ब्राह्मण मंत्री, शिवरायांचे स्वप्न साकार करणारे थोरले बाजीराव पेशवे, या सर्वांचे कर्तृत्व ही लोकं विसरून जाताहेत, आता यांना हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे की, शिवरायांचे खरे विरोधक हे ब्राह्मण नसून स्वकीयच होते.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेला ज्या मोरे, घोरपडे, गायकवाड, भोसले घराण्यांनी विरोध केला त्याबद्दल कोणी सरसकट मराठा समाजाला नावे ठेवत नाहीत त्याच प्रकारे सर्व ब्राह्मण समाजाला स्वराज्य विरोधक ठरवण्याचा अधिकार या समाजद्रोह्यांना कोणी दिला.?
अफझलखानाला फितूर झालेल्या मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, राजाजी घाटगे, केदाराजी खोपडे, खंडोजी खोपडे, बजाजी निंबाळकर या स्वकीयांमुळे संपूर्ण मराठ्यांना शिवराय विरोधक मानायचे काय.?
अफझलखान शिवरायांच्या कुलस्वामिनी तुळजापूर भवानी मंदिरातील मूर्तीची विटंबना करताना शांत बसलेले मराठे शिवरायकुलविरोधक म्हणायला हवेत का.?
शाहिस्तेखान स्वराज्य उध्वस्त करायला चाल करून आला त्यावेळी फितूर झालेला जसवंतराव कोकाटे नक्कीच शिवरायांचा मित्र नव्हता, म्हणजे मराठे शिवारांचे शत्रू होते असा त्याचा अर्थ होतो का.?
आपल्या स्वार्थासाठी आणि लालचीपनापायी दाभोळसारख्या वतनासाठी औरंगजेबाला फितूर होऊन आपल्या सख्या मेहुण्याला छत्रपती शंभूराजे यांना औरंग्याच्या ताब्यात देणारे गणोजी शिर्के तर मग छत्रपती संभाजी राजांचे हत्यारेच मानायला हवेत ना.?
स्वराज्य राजधानी रायगडचे दरवाजे उघडे टाकून महाराणी येसूबाई व शंभुपुत्र शाहू यांना औरंग्याच्या ताब्यात देणारे सूर्याजी पिसाळ काय मग स्वराज्य हितचिंतक होते का.?
आजकाल दलित तथा बुद्धांना आपलेसे करणारे ग्रामीण भागात सावकारी व पाटीलकीच्या जोरावर दलितांवर अत्याचार करणारे कोण आहेत.? मग कसले आलेय तुमचे बहुजन ऐक्य.?
 जेम्स लेन नावाच्या हरामखोर माणसास कृतज्ञता म्हणून पुस्तक अर्पण करणारे पुरुषोत्तम खेडेकर कोण आहेत.?
 जेम्स लेनने वास्तविक १५ लोकांचे आभार मानले असता केवळ १४ लोकांचा उल्लेख करणारे व १५ वा माणूस मुसलमान असल्याने त्याचा उल्लेख न करणारे लबाड लोक कोण आहेत.?
 छत्रपती शिवरायांना आपल्या पोवाड्यात दगलबाज व लुटारू म्हणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना शिवरायांच्या रांगेत बसविणारे कोण आहेत.? (महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. तरी त्यांच्या कार्याविषयी माझ्या मनात कसलाही द्वेष नाहीये. किंवा अपमानाचा उद्देश नाहीये.)
 ब्राह्मण समाजाविषयी तद्दन खोटे विकृत, वेडसर, बेजबाबदार, दिशाभूल करणारे लेखन व व्याख्यान देणारे कोण आहेत.?
 स्वामी समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, स्वातंत्र्यवीर सावरकर, थोरले बाजीराव पेशवे यांच्याविरुद्ध खोटा लबाडीचा विकृत आणि बदनामीकारक प्रचार करणारे कोण आहेत.?
 ब्राह्मण समाजातील घरातील स्त्रियांचा कामवासनेसाठी एखादा मराठा समाजातील माणूस पुरुष वेश्या म्हणून ठेवलेला असतो असे पुस्तकात लिहून ब्राह्मण स्त्रियांची व मराठा पुरुषांची बदनामी करणारा आणि ते पुस्तक जिजाऊ प्रकाशन या नावाने प्रसिद्ध करणारा पुरुषोत्तम कोण आहे.?
 जिजाऊच्या नावाने प्रकाशन संस्था काढून खोटारडी, विकृत, वेडसर पुस्तके प्रकाशित करून प्रत्यक्ष जीजामातेच्या शिकवणुकीचा अपमान करणारा कोण आहे.?
 शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक असताना तसेच गो-ब्राह्मण प्रतिपालक असताना त्यांची प्रतिमा मुसलमान धर्मरक्षक अशी करणारा कोण आहे.?
वरील घटना मधून एवढेच जाणवते की, खोटा, विकृत, वेडसर, कामुक इतिहास व मराठा समाजातील पुरुष आणि जिजामाता यांच्या विचारांचा अपमान करणे हेच एकमेव उद्देश या समाज द्रोही मंडळींचे आहे. यातून ते आपल्या आराध्य दैवतांची तर बदनामी करत आहेतच सोबतच संपूर्ण मराठा समाजाला एका हीन पातळीवर आणता आहेत. अशा प्रकारच्या विकृत लेखनाने शिवराय तथा महापुरुषांचा पराभव ही मंडळीच करत आहेत, हे आता तरी बहुजन समाजाने समजून घ्यायला हवे. या महापुरुषांचे स्वतःला वंशज म्हणवणारे शिवरायांचे कार्य कर्तृत्व झाकोलाण्याचा प्रयत्न करत असून अखिल विश्वाला मार्गदर्शक असणाऱ्या राजाला केवळ विशिष्ट जाती समूहापुरते मर्यादित करून त्यांची भव्यता खुजी करण्याचा प्रयत्न हे लोकं करत आहेत.
शिवरायांचे शत्रू हे केवळ एका समाजातील नव्हते तर ते सर्व समाजात कमी अधिक प्रमाणात होते. त्यामुळे ब्राह्मण समाज शिवराय विरोधक होता ही बतावणी करून काहीही साध्य होणार नाही कारण सत्यमेव जयते हेच सत्य आहे. शिवराय विरोधक हे कोण्या एका जातीचे नव्हते तर शिवराय विरोधक ते होते, ज्यांच्या निष्ठा औरंगजेब, निजाम अथवा शिवरायांव्यतीरिक्त इतर ठिकाणी होत्या...तेच खरे शिवराय विरोधक होते, कोणतीही जात नव्हे... आणि हा इतिहास कोणी कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी समाज द्रोह्यांच्या या  भूलथापांना कोणीही बळी पडणार नाही, यात किंचितही शंका नाही. कारण भावनिक मुद्द्यावर किंवा द्वेषाच्या आधारे जमवलेले कार्यकर्ते आणि समाज बांधव जेव्हा स्वतः सत्याचा पडताळा करतील तेव्हा या समाज द्रोही मंडळींना पाळता भुई थोडी होईल हे निश्चित.

6 comments:

  1. खूप मस्त लेख. कृपया संदर्भासाठी सांगा "खेडेकरच कोणतं पुस्तक? जेम्स लेन ला अर्पण केलं आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम लेख आहे पण कृपया खालील काही गोष्टींचे संदर्भ आणि तपशील दयावे ज्याने लेखाची विश्वासहार्यता वाढेल .
    १) जेम्स लेन नावाच्या हरामखोर माणसास कृतज्ञता म्हणून कोणते पुस्तक अर्पण केले होते पुरुषोत्तम खेडेकर याने ?
    २) ज्योतिबा फुलेंनी कोणत्या पोवाड्यात छत्रपती शिवरायांना दगलबाज व लुटारू म्हटले ?
    ३) "ब्राह्मण समाजातील घरातील स्त्रियांचा कामवासनेसाठी एखादा मराठा समाजातील माणूस पुरुष वेश्या म्हणून ठेवलेला असतो" असे ज्या पुस्तकात लिहिलेले आहे त्या पुस्तकाचे नाव सांगा .

    ReplyDelete
  3. पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेले आणि जेम्स लेन याला अर्पण केलेल्या पुस्तकांचे नाव आहे शिवरायांच्या बदनामीची केंद्रे

    ReplyDelete